नेहमी प्रमाणे आज वाचन करीत असताना त्याचां कानावर पावलांचा आवाज एकु आला. मान थोडी वर करीत त्यांनी पाहीले तर नीलम त्याचांकडे येत होती.
"नमस्ते मॅडम! येऊ का?" नीलमने भीतभीतच विचारले
"ये, ये, बसना आज तू लवकर कशी आलीस? शाळा भरायला अजून बराच वेळ आहे बघ."
"होनं बाई मी तुम्हाला मुद्दामच भेटायला आले. थोडं सागांयचं आहे. सांगू?"
"अगं सांग की! माझी परवानगी कशाला पाहीजे?"
"मॅडम तो दहावीतला भगत आहेनं तो माझ्या ओळखीचा आहे. तो मराठी शिकविणाऱ्या देशपांडे सरांबद्दल खुप सांगत होता. नाटक साहित्य चित्रपटांची त्यानां बरीच माहिती आहे असे म्हणत होता. सर रोज पार्ल्याहुन शाळेत येतात. देशपांडे सर 'ग्रेट' आहेत असेही भगतने सांगीतले. आणी....आणी..." इथे नीलम घोटाळली.
"आणी काय? ते लेखनही करतात" मॅडमनी निलमच वाक्य पूर्ण केलं.
"पण मॅडम हे तुम्हाला कसं माहीत? ते स्टोरी लिहीतात व पेपरवाले छापतात सुद्धा"
"हो, हो, आमच्या टिचर्सरुम मध्ये त्यांनी आम्हाला "अभिरुची" मासीकांचे अकं दाखविले होते. त्यात त्यांचे लेख छापून आले होते. मॅडम म्हणाल्या.
"बर मॅडम मी येते हं. "असं म्हणुन नीलम लगबगीने निघून गेली.
देशपांडे संराबद्दल बोलतांना सुनीता ठाकुर मॅडमचा चेहरा खुलला होता हे चाणाक्ष नीलमच्या नजरेतुन सुटले नाही. दिवस सरत होते. विद्यार्थी वर्गात देशपांडे सरांची लोकप्रियता वाढत चालली होती. शाळेचे गॅदरीगं जवळ येत चालले होते. देशपांडे संरानी मुलांचे "बेबंदशाही" नाटक बसविलं होत. सरांच्या कुशल दिग्दर्शनामुळे नाटक यशस्वी झाले. नाटकात काम करणाऱ्या कलाकरांसाठी चहा पाण्याच्या कार्यकम झाला. त्यावेळी सर्व टीचर्सही उपस्थित होते. त्यावेळी देशपांडे सरांनी पेटीवाचन केले. राजा बढेंच 'माझिया माहेरा जा" व काही निवडक भावगीते म्हणुन दाखविली.
पार्ल्याचा मुख्य रस्त्यावरुन एक गोरीगोमटी तरुणी हातात एक करंडी घेऊन आत गल्लीत वळली. जिथे गल्ली संपते, तिथेच असलेल्या एका बंगलीत शिरली. रेल्वे स्टेशनवरुन पायी येताना करंडी हातात धरुन जड झाल्यामुळे ती दुस-या हातात घेतली व तिनं बेल वाजवली. "आई नमस्कार, मी सुनीता!", आई म्हणाली. "मी नागपुरला गेले होते, कालच आले.. सरांसाठी संत्री आणली आहेत. हातातील करंडी खाली ठेवत ती म्हणाली. "बाळ भाई झोपला आहे. रविवारच उशीरा जेवण झालं एवढ्यात उठेलच. तू बसनं. चहा टाकते हं," आई. "नको, मी संत्री ठेवुन जाते! " "अगं बस की, चहा होईपर्यंत तो उठेलच," असं म्हणुन आई चहा करायला आत गेल्या. थोड्या वेळाने सर उठेलच . हॉलमध्ये बसलेल्या सुनीताला हसतच विचारले "केव्हा आलीस ? मी काल स्टेशनवर गेलो होतो. पण गाडी बरीच लेट असल्यास समजले, म्हणुन थांबलो नाही, संत्री आणलेली दिसताहेत.!" "हो मी आता निघते." " थांब, आईने चहा टाकला आहे. चहा घेऊनच जा!" चहा घेतल्यावर आईंना सांगुन सुनीता निघाली. गोऱ्यापान, लोभस व्यक्तिमत्त्वाच्या सुनीताकडे बघतच राहील्या. भाई दादरच्या ओरीएंट शाळेत नव्यानेच ओळख झालेल्या सुनीता बाबत अधुनमधुन आईला सांगत असत तरी प्रत्यक्षांत त्या दोघींनी एकमेकींना पाहीले नव्हते. आज नागपुरी संत्र्यांनी भरलेल्या करंडीच्या निमित्ताने ती संधी दोघींना मिळाली. सुनीताला पाहिल्यावर आईला मनोमन आनंद झाला. भाईंची पहीली पत्नी लग्नानंतर थोड्या दिवसातच अचानक अल्पशा आजाराने देवाघरी गेल्यामुळे त्यांच्यावर दुसरेपणाचा शिक्का बसला. या दुःखद घटनेनंतर भाईनी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नव्हता असे नाही. परंतु परीस्थीती अनुकुल नव्हती. भाई पितृछ्त्राला अकाली पारखे झाल्यामुळे कुटुबांची जवाबदारी त्यांच्यावरच होती.
भाई भावगीत गायनाच्या मैफली, नाटक कंपनीतील नोकरी, गाण्याच्या शिकवण्या करुन अर्थाजन करीत. कधीकधी संगीत शिक्षकाचे पैसेही बुडायचे. या कारणामुळे कुटंबातील उपवर मुली भाईकडे संगीत, नाटक, साहीत्य हे अनमोल गुण असून सुद्धा त्यांना जन्माचा जोडीदार म्हणून कशा स्वीकार करणार होत्या? आता सुनीताला पाहील्यावर भाई तिची पत्नी म्हणुन निवड करणार अस आईंना वाटल खरं. गॅदरीगं, नाटक अशा शाळेच्या उपक्रमांमुळे देशपांडे सर व सुनीता ठाकुर एकमेकांच्या जवळ आले. 'सत्तेच्या गुलाम' या नाटकात सरांनी कान्होबाचे पात्र रंगविले तर सुनीताबाई क्षमेच्या भुमीकेत रंगमंच्यावर आल्या. त्यावेळी सुनीतामॅडम माटुंगा भागात राहत होत्या. अनेकदा देशपांडे सर त्यानां भेटण्यासाठी जात असत. कधीकधी ती दोघेजण हॉटेलमध्ये चहा घेत. बिलाचे पैसे मॅडम देत असत. मॅडम स्वताःसाठी खाणावळीतुन जेवणाचा डबा घरी घेऊन येत तेव्हा अनेकदा सर त्यांना सोबत करीत. वाटेत दोघांच्या गप्पागोष्टी चालत. अशा रितीने दोघांच्या परिचय वाढत गेला व ते दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडली.
मॅडममध्ये एक आर्कषक असा लोभसपणा व नेटकेपणा होता. त्याच्यांत प्रचंड उत्साह, खुप काम करण्याची जिद्ध होती. या शिवाय मॅडममधील काटकसरीपणाचा गुण सरांनी हेरला होता. प्रियाराधनच्या दिड- दोन वर्षाच्या काळात मॅडमनी स्वतःबद्दल अनेक रोचक किस्से सरांना सांगितले. त्यांतील १९४२ च्या स्वांतत्र्य चळवळीत पुढाकार घेऊन संगिनी रोखलेल्या गोऱ्या शिपायांना मॅडमनी मोठ्या धर्याने कसे तोंड दिले याचे वर्णन ऐकून सर प्रभावीत झाले होते. तसेच पुस्तकातल्या कृती वाचून बॉंम्बच्या साहाय्याने ब्रिटीश सरकारचे शस्त्रागार उडवुन देण्याच्या धाडसी कृत्यात त्यांचा सहभाग होता, थोडक्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण सर्वस्व ओतुन काही करत आहोत यात सर्व जण धन्यता मानीत, यामुळे सरांना वाटले की, सुनीता आपली जन्माची जोडीदार होण्यास पूर्ण लायक आहे. तसं झालं तर आपली पती पत्नीची जोडी कुणीही हेवा करावा इतकी भाग्यवान व आर्दश होईल. भाई लग्न करुया असे म्हणू लागले. मॅडमची वृत्ती जरा वेगळीच असल्यामुळे सुरवातीला लग्नाच्या बंधन स्विकाराव्या त्या राजी नव्हत्या. परंतु भाईचा विसर करणे त्यांना जमेना. "माझ्यासाठी हो म्हण", या भाईच्या मोजक्या लाघवी शब्दांनी मॅडम वर जादू केली व त्यांनी लग्नाला होकार दिला. "बेटा, तुझी निवड चुकणार नाही याची मला खात्री आहे. GO AHED!,"आप्पा सुनीताला म्हणाले. मॅडमने त्यांना भाईबाबत कळवल्यानंतर मुलीला भेटण्यासाठी ते रत्नागिरीहून मुबंईला आले. "आप्पा मी तुम्हाला भाईबद्दल काय काय सागूं! आणि किती म्हणून सागूं? आणि सुरुवात तरी कुठुन करु? त्याला लेखन, गायन, नाटक, वक्तृत्व, विनोद अशा विविध कला अवगत आहेत. पार्ल्याला राहतो व तेथुनच शाळेत येतो." "त्यानां संगीताची आवड कशी निर्माण झाली?" आप्पांनी विचारले."भाई गाणे रेडिओवर घरीच शिकला. रेडिओ सतत ऐकुन त्यांचे गाणे तयार झाले. त्यांच्या आजीचा गळा फार गोड होता. हा गाण्याचा वारसा आजीकडुन त्यांच्या मातोश्रींकडे व पुढे त्यांच्या कडे आला. आईचा गळा मोकळा व सुरेल होता. घरी रोज संध्याकाळी गाण्याची मैफल व्हायची. भाई पेटीवर व धाकटा भाऊ तबल्यावर. भाई पेटी वाजवण्यात तरबेज आहे. त्यांच्या आईला संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी भाईना पेटीच्या क्लासला पाठवले. वयाच्या दहाव्या वर्षी पार्ल्याच्या टिळक मंदीरात बालगंधर्वासमोर त्याने 'सत्य वदने वचनाला' हे नाट्यगीत वाजवुन शाबासकी मिळवली. त्यांच्या वडलांबरोबर नाटकाला जायचा. आम्ही दोघे अधुन मधुन चहासाठी होटेल मध्ये जायचो त्यावेळी तो बोटांनी टेबलावर सरगम करायचा मला आठवतं. " मी सुराच्या साथीन वाढलो" असं तो म्हणला होता. त्याच्या नकला करण्याकडेही ओढा होता. त्यावेळी तो जोगेश्वरीच्या सरस्वती बाग नावाच्या सोसायटीत राहत होता. आई बरोबर देवळात किर्तन ऎकुन आल्यावर दुस-या दिवशी तो त्याची नक्कल करीत असे. थोडक्यात घरातील वडीलधा-या मंडीळीनी त्याला कलोपासनेत प्रोत्साहन दिले."
"काय ग, देशपांडे कुठले राहाणार? त्यांचा गाव कुठला?" आप्पांनी सुनीताचे बोलणे मध्येच खंडीत करत विचारले. " देशपांडे तसे बेळगावचे असले तरी त्यांचे मातुल घराणे कारवारचे. त्यांच्या आजोबांचे नाव दुभाषी पण लेखणासाठी त्यांनी 'त्रूग्वेदी' हे टोपण नाव वधारण केले. त्यांच्याकडे वक्तृत्वाची कला व विनोद बुद्धी होती. अनेक भाषांचे ते जाणकार होते. ते रविंदनाथांचे वाडःमय आवडीने वाचत. 'गीतांजली' चे मराठी रुपांतर 'अभंग गीतांजली' या नावाने लिहीले व प्रकाशीत केले. त्यांनी मला आजीच्या अनेक गमती जमती, विनोद किस्से सांगीतले. घरी मासे आणले की, माश्यांना 'मोरोपंत' व खेकडे-कुर्ल्यांना 'घाटकोपर अशी अचूक टोपण नावे तिने ठेवली होती. भाईनाज़ विनोदाचा वारसा त्यांच्या मातुल घराण्यातुन मिळाला. त्यांच्या समाधीटपणा आहे. स्टेज फियर नाही, हे मला आम्ही शाळेचे नाटक बसवले त्यावेळी समजले. भाई बालपणी आजोबांना किर्तनात पेटीवर व पद्यात साथ करायचा. त्याने आजोबांप्रमाणेच लेखनासाठी 'पुरूषराज अलुरपांडे' हे टोपण नाव घेतले. आप्प मी तुम्हाला सांगते एका बाबतीत त्याने माझ्यावर कुरघोडी केली. "ती कशी?" आप्पांनी विचारले. "अहो, साहीत्य क्षेत्रातला त्याचा अधीक आवडता प्रकार म्हणजे कविता! "सुनीता. "अस्सं, तुला सुद्धा काव्याच वेड आहेच की१" आप्पा. "अहो, त्याचे आवडते कवि म्हणजे कुसुमाग्रज, गोविदंग्रज, बी.तांबे 'गर्जा जयजयकार' ने त्याला अगदी झपाटले होते." "वा! वा!, तो काळ तसाच होता बेटा. पण आता पुरे, जावईबापू हरहुन्नरी आहेत. पोरी तु नशीबवान आहेस." आप्पा शांतपणे म्हणाले. " आप्पा, तुमचा दोन दिवसाचा मुक्काम आहे नं, उद्या रविवार आहे. शाळा नाही. भाई संध्याकाळी येणार आहेत तुम्हाला भेटायला. त्याची भेट घेऊन जा."
भाई सुनिताच्या वडिलांना म्हणजे आप्पांना भेटायला चालले होते. ते दादर रेल्वे लाईनला समांतर असलेल्या तुळशीपाईप रोडने पुढे निघाले. सुमारे एक मॆल अंतर तोडल्यावर सुनिताच्या घरा जवळ पोचले. आपल्याला एका निष्णात फोजदारी वकीलाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यायचे आहे याची मनाशी गाठ बांधुनच सर्व धेर्य एकवटुन त्यांनी घराचे जिने चढायला सुरुवात केली. घरात प्रवेश करताच आप्पांनी त्यांचे स्वागत केले व आपल्या जवळ बसविले. फोजदारी वकीलाची कठोर प्रतिमा त्यांच्या अंतःचकुक्षुसमोर उभी होती. परन्तु प्रत्यक्षात आप्पांचे सोम्य दर्शन झाल्यावर ते चित्र धुसर होत गेले. ते तसे खुपच प्रेमळ आहेत, व आपल्या लग्नाला त्यांचा विरोध नाही असे एकदा सुनीताने भाईना सांगीतले होते. लग्न नोंदणी पद्धतीने करायलाही त्यांचा विरोध नव्हता, आप्पांनी भाईच्या पाठीवर हात फिरवीत गप्पा सुरु केल्या. काही वेळ बसुन भाई निघाले. घरी आल्यावर ते आईला म्हणाले," आई, मी सुनीताशी लग्न करण्याचे ठरवीले आहे. लग्न तिच्या माहेरी रत्नागिरीला नोंदणी पद्धतीने करणार आहोत. १२ जुन १९४६ ही तारीख ठरली आहे. तिचे वकील आप्पा फोजदारी वकील आहेत रत्नागिरीत." नोंदणी पद्धतीच्या लग्नाला भाईचा विरोध होता असेही नव्ह्ते. परंतु आपल्या भारतीय जीवन प्रणालीत विवाह हा करार नसुन एक पवित्र संस्कार मानला गेला आहे. काही अनीष्ठ वृत्तीने कुटुंब संस्थेचा पाया उद्ध्वस्त होऊ नये म्हणुन वॆदिक संस्कृतीने संस्काराचे बधंन निर्माण केले आहे. त्यांत पती-पत्नीचे हे पवित्र नाते अंतर्भूत असुन त्याचे पावित्र अबाधित राखणे हे पवीत्र नाते अंतर्भूत पद्धतीच्या विवाहातही तशीच जवाबदारी दोघांवर असते. नोंदणी पद्ध्तीने विवाह झाल्यावर हे नाते भाई व सुनीता या दांपत्यांने आयुष्यभर अभंग टिकवले का ते आता आपण पुढील पानातून पाहणार आहोत.
लग्न झाल्यावर काही महिन्यांनी सुनीताबाई व पु.ल. रत्नागिरीला गेले. त्यावेळी त्यांच्या बरोबर भाईच्या मातोश्री होत्या. विहिणबाईची ओळख करुन घ्यायला आलेल्या कांही महिलांपॆकी एक म्हणाली," तुम्हाला छान सुनबाई मिळाली!" यावर भाईच्या मातोश्री लक्ष्मीबाई लगेच म्हणाल्या," आमचा भाई काय वाईट आहे? लहानणी किती गोरा होता. सॆदेव प्रसन्न व टवटवीत असासचा मोठा झाला तरी प्रसन्नता कायम आहे." असे मोजकेच शब्द त्यांच्या मुखातुन बाहेर पडले, तरी त्यापेक्षा अधिक कितीतरी त्यांना बोलुन दाखवायचे होते. पण ते त्यांनी मनातच ठेवले. भाईच्या वडिलांनी आपल्या अखेरचा काळात जे काही सांगीतले होते ते त्यांना आठवले, "तुझ्यापोटी रत्न आले आहे. तू त्याचे मोठे मान सन्मान बघशील!" एखाद्या व्यक्तीत एकच गुण असला तरी त्याला ब-यापॆकी प्रसिद्धी मिळते. पु.ल. च्या बाबतीत सांगायच झाल्यास त्यांना अनेक गुण एकाच वेळी लाभले होते. साहित्य, संगीत, नाटक, विनोद व वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रात लाभलेल्या गुणांमुळे त्यांचे स्थान जनमानसात खुप उचांवले व त्यांना जीवनात अनेक उच्चामान सन्मान मिळाले. लहानपणासुन पु.ल. चा नकला करण्याकडेही ओढा होता. जोगेश्वरीतील 'सरस्वती बाग' या सोसायटीत राहत असतांना ते आई बरोबर कीर्तनास जायचे व घरी आल्यावर कीर्तन करायचे. वक्तृत्वात तर प्राथमिक शाळेपासुन भाग घ्यायचे. सोसायटीच्या गणेश उस्तावात नकलाकार कामात त्यांच्या नकला पाहील्यावर त्यांच्यात नकलांची आवड निर्माण झाली. नरसोबाच्या वाडीला सकाळी पु.ल. ची मुंज झाली. संध्याकाळी भटजींनी मुजं कशी केली याची पु.ल. नी नक्कल करुन दाखवीली. ते पाहुन भटजीची हसता हसता पुरेवाट झाली.
पु.ल. चा पिंड तसा खोडकरपणा, लहानपणापासुन ते खोडकर होते. घरी कुणी आल्यावर त्यांच्या आईंना वाटायच की, ते काही तरी खोडकरपणा करणार म्हणुन ती माउली त्याना डोळ्यांनी दटावत बाहेर घालवायची. एकदा जाहीर कार्यक्रमांत पु.ल. नी न.ची. केळकरांनी प्रश्नोत्तरांच्या वेळी राजकारणावर प्रश्न विचारला असता. ते म्हणाले. " बाळ, मुलांना हा विषय कळणार नाही. तेव्हा तुला समजेल असा प्रश्न विचार!" या पु.ल. नी विचारलं. "हल्ली पुण्यात अंजीराचा भाव काय आहे?" कॉलेज मध्ये शिकत असतांना पु.ल. चा खोडकरपणा कायम होता. पु.ल. चा एक साधा भोळा मित्र कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहात होता. तो मित्र कॉलेज मधील एका मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पु.ल. व त्यांची मित्रमंडळी त्या मुली वरुन त्याची फिरकी घेत असत. एक दिवस ते सारेजण त्याच्या खोलीला कुलुप असतांना गेले व शेजारच्या मित्राकडुन हलवाहलव केली. फराळाचा डबा फस्त केला. नंतर बाहेर जाण्याच्या आधी पु.ल. नी त्या मुलीच्या नावे एक चिठ्ठी लिहुन ठेवली. त्यात त्या मित्राला दुपारी दोन वाजता लक्ष्मीरोड वरील गोखले हॉलच्या बसस्टॉपवर भेटायला बोलावले. त्या बसस्टॉपसमोर पु.ल. तळमजल्यावर राहत असल्यामुळे, तो भाबडा दोन तीन वेळा बस स्टॉपवर चकरा मारून गेला हा सारा प्रकार पु.ल. खोलीतून मिष्कील पणे पाहात होते. एकदा पु.ल. च्या खोडकरपणाचा प्रसाद श्री जयवंत दळवी व काही लेखकांना मिळाला.त्याच असं झालं एका संध्याकाळी गेले होते. कामाची बोलणी संपल्यावर पु.ल. च्या वरळी येथील निवासस्थनी गेले होते. कामाची बोलणी संपल्याव्र पु.ल. नी विचारलं, "मंडळी काही घेणार का?" दळवींनी होकार देताच, पु.ल. नी सुनीता बाईना फ्रेंच वाईन आणायला सांगीतले. थोड्या वेळाने सुनीताबाईंनी ट्रेमधून लाल रंगाच्या वाईनने भरलेले काचेचे नाजूक चषक उचलल्यावर पु.ल. म्हणाले, "एकदम पिऊ नका. सिप करा!" प्रत्येकाने चषक ओठाला लावले, पण फ्रेंच वाईन त्यांच्या जिभेवर न आल्याने एकाने चषक तोंडात उपडा केला. दळवींनी आत जीभ फिरवून आस्वाद घेण्याचा खटाटोप केला. पण सारे व्यर्थ, हे सारे पाहुन पु.ल. मोठमोठ्याने हासत राहिले. या संदर्भात दळवी लिहितात, " ते चषक नाट्य प्रयोगासाठी पु.ल. नी पॅरीसहून आणले होते. त्याच्या कडा पोकळ होत्या व त्यात वाईनसारखे दिसणारे लाल द्रव भरले होते. प्रत्यक्षात चषक रिकामेच असल्याने ते ओठाला लावल्यावर वाईन तोंडात येत आहे असे भासायचे ! असा हासवणूकीचा प्रयत्न खरं तर व्रात्य, खोडकर मुलांनी करायचा!"
थोडक्यात पु.ल. चा खोडकरपणा लहान मुलाला शोभणारा परंतु निष्पाप होता. पु.ल. मराठीतले अव्वल विनोदकार होते. त्यांना विनोदी लेखक व विनोदी वक्ता म्हणुन अमाप लोकप्रियता लाभली. परंतु ते भाबडे होते व शेवटपर्यंत भाबडेच राहीले. त्याचं असं झाल. पु.लं. वरळीला श्री. चांदोरकर याच्या मालकीच्या 'आर्शीवाद' या नावाच्या बिल्डींगमध्ये राहात होते. त्या वेळची ही घटना आहे. चांदोरकरांचा लाडूचा धंदा होता. त्यांत त्यांनी भरपूर कमाई केली. पण ते व्यवहारात सरळ मार्गाने जाणारे नव्हते . आपला भाडेकरु एक नावाजलेला लेखक, कलाकार आहे या महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करुन त्यानी पु.लं. ना राहात्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. याचं कारण काय तर पु.लं. नी ए मुबंई सोडुन पुण्याला वास्तव्य केलं असं त्याचं म्हणणं होतं. चे घनीष्ट मित्र सरन्यायाधीश श्री. यशवंत चंद्र्चुड्यांनी त्या जागेचा ताबा न देण्याचा सल्ला दिला. पण पु.लं. नी तो मानला नाही. याचे कारण त्यांना कोर्ट कचे-या नको होत्या. पु.लं. नी जागेचा हव्यास धरला नाही व आपणहून ती घरमालकांच्या ताब्यात दिली. थोडक्यात घरमालक महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तीमत्वाकडे अनेक वर्ष आपला भाडेकरु एकाच दृष्टिने पाहात होते. पु.लं. चा शेजार म्हणजे एक पर्वणी असायची, पुण्याची 'रुपाली' मधील त्यांचा निवास्थानाच्या शेजारी विनय हर्डीकर काही वर्षे राहात होते. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक जण प्रथम पु.लं. च्या घराकडे पाहुनच आत येत असे . पु.लं. चा एक शेजारी म्हणुन हर्डीकरांना खूप अभिमान होता.
आयुष्याच्या या सफरीत माणसाला अनेक जण भेटत असतात. तसे पु.लं. ना सुद्धा भेटले. त्यांच्या संचार अनेक क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे गणगोतही मोठे होते. त्यांना अनेक मातब्बर मंडळींचा स्नेह लाभण्याचे भाग्य लाभले होते. मॆत्री करायची व ती टिकवुन ठेवण्याचे कसब पु.लं. ना लाभले होते. पु.लं. चा वसंतरावांची देशपांडे याची मॆत्री पुण्याला अलका टॉकीज जवळ असलेल्या गाण्याच्या एका क्लास मध्ये झाली. १९४०-४१ साला मधील ही गोष्ट आहे. त्यावेळी पु,लं. फर्गसन कॉलेज मध्ये शिकत असतांना भावगीताचे कार्यक्रम करीत. अशाच एका मॆफलीत त्यांचा गायन क्लासचे मालक सारंगिये महमद हुसेन खॉ साहेबांशी परीचय झाला. खॉसाहेब अतिथ्यशील असल्यामुळे कॉलेजमधील गाणे, बजावण्याची हेस असलेली तरुण मंडळी त्यांच्या क्लास मध्ये एकत्र येत. तिथे अशाच एका संध्याकाळी पु.लं. कुठलेतरी एक पद म्हणत असतांना, नागपुरी रुंद काठाचे धोतर, डोक्याला टोपी, भेदक डोळ्याचा व शेदुंर लावलेला एक विशीतल्या जवानाच्या एंट्री मुळे त्यांचे लक्ष वेधुन घेतले, "आई ये वसंतराव म्हणाले, "असे म्हणत खॉ साहेबांनी त्यांचे स्वागत केले. पु.लं. चे गाणे थांबले यावर वसंतराव म्हणाले, "भय्या, बंद क्यो हो गये? चलने दो." कांही मिनीटे गाणे एकल्यावर वसंतराव यांची पहीली वहीली भेट. वसंतराव तबल्याची साथ करीत. पुण्यात या जोडीने अनेक कार्यक्रम केले. पुढे वसंतराव गवयी व पु.लं. पेटीवर असा बदल झाला. एकदा एका शहरात वसंतराव देशपांड्यांचा गायनाचा कार्यक्रम होता. पु.लं. काही कारणामुळे त्या शहरात एकटेच गेले. स्टेशनवर हजर असलेल्या स्वयंसेवकांना पु.लं. नी स्वतःची ओळख करुन दिली, "मी वसंतराव देशपांड्याचा पेटीवाला. अमुक अमुक गावावरुन आलो आहे." कार्यक्रमाला पु.लं. येणार आहेत हे त्या स्वयंसेवकांना माहीत नव्हते. त्यांच्या कानांवर पु.लं. ची कीर्ती आली होती. तरी पु.लं. ना या आधी पाहीले नव्हते. त्यामुळे पेटी वादकाचे यशोचीत स्वागत झाले नाही. पु.लं. कार्यक्रमाच्या स्थळी पोहचले. कार्यक्रमात पु.ल. पेटीची साथ करणार आहेत अशी घोषणा झाल्यावर ही सारी मंडळी खजील झाली. पु.लं. च्या चेह-यावर कशी गंमत केली असा खोडकर भाव होता.
वसंतराव फक्त गायकच होते असे नव्हते तर ते एक उत्तम नटही होते. पु.लं. चे 'तुका म्हणे आता' या नाटकात त्यांनी संतूतेली या पात्राची भूमिका समर्थपणे साकारली होती. एवढेच नव्हे तर संगीताची जवाबदारी उचलुन अभंगांना व पदांना सुंदर चाली दिल्या होत्या. पु.लं. च्या 'दुधभात' या चित्रपटात वसंतरावांनी खानादानी गवयाचं काम उत्तम रितीने वठवले होते. पु.लं. नी संगीत दिलेल्या सर्व चित्रपटात वसंतराव गायले होते. एकदा नागपुरच्या मॆफिलीत रात्रभर गाणे झाले. दुस-या दिवशी बाबुराव देशमुखांकडे चहा घेऊन अकराच्या गाडीने मुंबईला जायचे होते. गाडीला अवकाश असल्यामूळे संपली. सूराच्या दुनियेतील या वेड्यापीर कलावंतांना गाडीचे भान राहिले नव्हते. पु.लं. च्या पुणे येथील बि-हाडी वसंतराव देशपांडे, मधू गोळवळकर, भीमसेन जोशी, मधू ठाणेकर, अशी गुणी मंडळी जमत व अधुन मधुन जात. सतत दोन शनिवारी गाण्याच्या अप्रतीम दोन मॆफली झाल्या. त्या अविस्मरणीय झाल्या असा उल्लेख सुनीताबाईच्या 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात आढळतो. त्याचं असं झालं एका शनीवारी भीमसेन जोशी उत्तम गाउन गेल्यावर दुस-या शनिवारी वसंतराव गाणार होते. शाहू मोडकांनाही आमंत्रण होते. त्यांना वसंतरावांचे गाणे ऎकायचे होते. पण वेळ कमी असल्यामुळे तासभर बसुन जाईन. अशी बोली मोडकांनी केली होती. परंतु वसंतरावांच्या अप्रतिम गाण्याचे त्यांना मॆफल संपेपर्यत खिळवून ठेवले. एवढेच नव्हे तर गाण्यानंतर झालेल्या संगीताच्या गप्पागोष्टीतही ते सामील झाले. पहाट झाल्यावर सर्वजण घरी गेले. परंतु सकाळीच भीमसेन जोशी पु.लं. च्या घरी परत आले. त्यांचं कारण अस होते. की, आदल्या रात्रीच्या गाण्यात वसंतरावांनी त्यांच्यांवर कुरघोडी केल्यामुळे ते बॆचेन झाले होते. आल्यावर ते पु.लं. ना म्हणाले. "आता हे माझे गाणे ऎका! " दिवाणखाण्यातील बॆठक तशीच होती. तिथेच असलेले तंबोरे भीमसेन जोशी लावू लागले. मॆफलीला रसिक श्रोते हवे होते. तसेच साथीलाही तबलजी. तेव्हा या कामगीरीवर पु.लं. सायकलस्वार होऊन लगेच निघाले. मंडळी जमल्यावर सकाळी आठच्या सुमारास दुर्मीळ स्पर्धेतून सुरु झालेली ती मॆफील भीमसेन जोशींनी तीन-साडेतीन तास अप्रतीम रंगवली. थोडक्यात असे म्हणता येईल की, कलांवत कितीही मोठा असो अगर छोटा असो तो दुस-या कलांवतावर बाजी मारण्याची संधी शोघत असतो. हे पु.लं. च्या घरी झालेल्या मॆफिलीने दाखवून दिले.
पु.लं. कॉलेज मध्ये शिकत असतांना नाटकातून कामे करीत असत. त्यावेळी त्यांचा कॉलेजचा संबंध हजेरी पुरताच असायचा. सकाळी नऊ पासून संध्याकाळपर्यंत नाटकाच्या व नंतर रात्री नऊ-दहा वाजे पर्यंत गाण्याच्या तालमी असा चिंतामणराव कोल्हटकरांच्या ' ललितकलाकुंज' या नाटक कंपनीतला भरगच्च कार्यक्रम असायचा . कंपनीच्या बाहेरगावच्या दॆ-याबरोबर पु.लं. ही पाठीवर बि-हाड घेऊन निघायचे . एकदा कंपनीचा मुक्काम कोल्हापूरला होता. त्यावेळचा प्रसंग आहे. राजाराम कॉलेजचे विद्यार्थी गॅदरींग साठी आचार्य अत्रे कृत 'लग्नाची बेडी' हे नाटक रंगपटाच्या एका हॉल मध्ये बसवत होते. हॉलच्या बाजूला पु.लं. चा अभ्यास चालू असतांना त्यांनी हॉल मध्ये चुकूनही डॊकावले नाही. तालमी संपल्यावर पु.लं. आत गेले व कलाकारांना उद्देशून म्हणाले , "अवधुतचा रोल कोणी केला? त्याचं नाव काय?" हे ऎकताच एक पोरसवदा तरूण पुढे आला व म्हणाला,"मी, मीच, मी राम". त्याच्या कडे पाहून पु.लं. म्हणाले," एवढाच एक समजून बोलतोय!" अशी ही पु.लं. देशपांडे व राम गबाले यांची पहिली वहीली भेट. पुढे या दोघांचा चित्रपट क्षेत्रात एकत्र केलेल्या कामातून निकटचा मित्रत्वाचा संबंध आला. सुरुवातीच्या काळात गबालेंनी दिग्दर्शित केलेल्या 'वंदे मातरम' या चित्रपटात पु.लं. व सुनीताबाईंनी नायक नायिकेच्या भुमीका केल्या. १९४२ च्या स्वातंत्र संग्रामावर आधारलेला हा चित्रपट १९४८ साली पु.लं., सुनीताबाई, सुधीर फडके, ग.दि.माडगूळकर. अशा निष्ठावान मंडळींनी अल्पावधीतच पुर्ण केला. 'वदं मातरम' चे वास्तव चित्रण, अत्यंत तन्मयतेने केलेला अभिनय, आकर्षक संवाद, ग.दि. मांची चॆतन्य पूर्ण स्फूर्ती गीते या मूळे हा चित्रपट आवर्जून पाहिला. वंदे मातरम नंतर पु.लं. च्या रूपेरी कारर्किदी च्या यशाच्या आलेख उंचावत गेला. चंदेरी दुनियातील कलाकाराबद्दल अनेकांच्या काही वेगळ्या असतात. 'वंदे मातरम' प्रदर्शित होण्याआधी नुकताच पु.लं. च्या विवाह झाला होता. रत्नागिरीला आप्पांना म्हणजे सुनीताबाईच्या वडिलांना कुणीतरी हटकले "अहो आप्पा, तुमचे जावई व मुलगी सिनेमात काम करणार म्हणे, तिथं चांगली माणसं नसतात," परंतू आप्पांनी त्यांना समर्पक उत्तर दिले.
एकदा पु.लं. रत्नागिरीले गेले असतांना तेथे असतांना तेथे एका परिचीताने आपली स्वतःची तर्जनी नाकपुडीला लावीत सिनेमातील नट्यांबद्दल एक कुत्सिक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला पु.लं. नी उत्तर दिले नाही. पु.लं. नी अनेक क्षेत्रात संचार केला. त्यांचे वॆयक्तीत चरित्र अतिशय स्वच्छ होते. त्यांचा समाजातील सर्व थरांची सर्पक होता. चित्रपटसुष्टीच्या आपल्या कारर्किदीत पु.लं. ना वसंत पवार हा एक कलंदर भेटला. पवार हा एक कुशल सतार वादक, नृत्य दिग्दर्शक , संगीत दिग्दर्शक, चतुर सभांषण करणारा होता. पु.लं. च्या स्वभावात उत्स्फूर्तपणे भारुन जाण्याचा एक गुण होता. साहजिकच पु.लं. च्या सहका-यांत वसंत पवार सामील झाले. एकदा स्टुडीओत पवार हंसाबाईना नाचाची तालीम देत होते. त्या तालमी पाहातांना पु.लं. ची काय प्रतिक्रिया झाली, ती आपण जाणून घेऊ या. या संदर्भात पु.लं. लिहीतात, "त्या नाचाच्या तालमी पाहातांना मराठी तमाशाच्या नाचाचे खानदान मला पाहायाला मिळाले. हिडीसपणाचा तेथे स्पर्श नव्हता. उत्कटता व उत्तानता यांची सीमा रेषा पवारला कळली होती. पु.लं. च्या संगीत दिग्दर्शनाच्या सुरुवातीच्या काळातला हा प्रसंग आहे. नवयुग स्टुडिओत एका गाण्याची चाली ऎकण्याची इच्छा व्यक्त केली. पु.लं. नी त्यां ऎकवल्या. निर्वीकार चेह-याने त्या चाली ऎकल्यावर वितरक म्हणाले, "अहो, नौशाद सारख्या चाली करा. मला तुमच्या चाली पसंत नाहीत. "त्या वितरकाचे पारडे जड असल्यामुळे पु.लं. ना स्वतःची बाजू मांडण्यास वावच नव्हता, पु.लं. खिन्न होऊन सिगारेट ओढत बसले असतांना त्यांच्या जवळ वसंत पवार आले व म्हणाले, "पी.ल. साहेभ, मी सांगतो, चाल मस्त आहे. पण या सिने इंडस्ट्रीत वितरकांची पैशाची थैली बोलते." पु.लं. नी चित्रपटांसाठी अनेक प्रभावी कथा पटकथा लिहील्या. अशा कथांतून जिवनातल्या संवेदनांच्या, अनुभूतींचा, अनुभव प्रेक्षकांना मिळत असे. त्यांचे संवाद अतिसय नैसर्गिक व बोली भाषेत असायचे पु.लं. चे देवबाप्पा व दुधभात हे कौटुंबीक जिव्हाळ्याचे चित्रपट करूण रसाने ओतप्रत भरलेले होते. चित्रपटाच्या कथानकाचे महत्व विषद करतांना एकदा पु.लं. म्हणाले, " उत्तम चित्रपटांचे यश हे प्रतिभासंपन्न लेखकांनी लिहीलेल्या कथा-कादंब-यावर आधारलेले असते. आपल्या भारतीय भाषेत अशा अनेक उत्कृष्ट कथा आहेत की, ज्यांच्यावर उत्तम चित्रपट तयार करता येतील." पु.लं. नी मोठी माणसं, देव पावला, नवरा बायको, मानाचे पान, आपलं घर, दूध भात, देव बाप्पा, गुळाच्या गणपती अशा अनेक चित्रपटांना संगीत दिले. 'दूधभात' या चित्रपटाची पटकथा पु.लं. व राम गबालेंनी बेळगावला रावसाहेबांच्या थिएटरच्या एका सुंदर खोलीत तयार केली. मूळ कथा पु.लं. ची होती. पु.लं. बेळगावला १९५० साली मराठीची प्राध्यापकी करीत होते. त्यावेळी कृष्णराव हरिहर उर्फ रावसाहेब या रसिक व भावनाप्रधान व्यक्तीबरोबर त्यांची मैत्री झाली. पटकथेचे काम चालू असतांना रावसाहेब खोलीत अधून मधून डोकावून जात. "ष्टोरी सुरु केली काय ? अहो, आज नको. कारण अमावस्या आहे नं, तेंव्हा उद्या सुरु करा, दोस्तांचे पिक्चर चालले पाहीजे, " असे सांगायचे. पटकथेत एका क्षेत्राच्या गांवातील देवळातल्या भटजींची मुलगी जी नायिका असते. तीला 'सतार वादक दाखवा' अशा एक ना अनेक सुधारणा रावसाहेब सुचवायचे व त्यांच्या दृष्टीने त्या बेस्ट असायच्या. भटजीबुवांच्या भुमिकेत वसंतराव देशपांडे होते. त्यांच्या सोबत सुलोचना, उषा किरण , चित्तरंजन कोल्हटकर, विवेक अशा नामंवत कलाकारांनी आपल्या भूमीका प्रभावीपणे केल्या.
पु.लं. चे संवाद अतिशय प्रभावी होते. वसंतराव देशपांड्यांनी गायलेल्या तोंडी ऎकून पु.लं. नी चित्रपटातून रागदारी संगीताचा यशस्वीपणे उपयोग केला असे दिसून आले. 'दूधभात' चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. 'दूधभात' चे मराठी भाषेपुरतेच हक्क निर्मात्यांना देण्यात आले होते. याचा अर्थ असा होता. की, अन्य भाषेत हा चित्रपट निर्माण करायचा असेल तर मुळलेखकाची परवानगी घेणे अत्यावश्यक होते. 'दूधभात' ची कथा, पटकथा, संवाद, पु.लं. चे असल्यामुळे त्यांची रीतसर परवानगी घेणे जरुरीचे होते. परंतु मराठीच्या निर्मात्यांनी परस्पर विकले. वर्तमान पत्राकातून ही बातमी पु.लं. व सुनीताबाईंनी वाचली तेव्हा त्यांनी संबंधीत व्यक्तींना नोटीस पाठवली. ही सारी कहाणी सुनीताबाईंनी 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात विस्ताराने कथन केली आहे. 'आहे मनोहर तरी' चा पहिला श्रोता वाचक पु.लं. होते. लेखन पुरे झाल्यावर ते वाचून पु.लं. नी काही सुचना केल्या. असे विजया राजाध्यक्ष यांनी 'पडद्यामागचे पी.ल.' या लेखात लिहीले आहे. तसेच विजयाबाई व श्रीनिवास कुलकर्णी यांनी आस्थेने हस्तालिखीत वाचले व काही सूचना केल्या. गोविंदराव तळवळकर यांनी 'महाराष्ट्र टाईम्स' च्या १९८८ च्या दिवाळी अकांत सूनीताबाईच्यां मातोश्री व आप्पांबद्दल काही मजकूर प्रकाशित केला. त्यानंतर पुस्तकाचे लेखन यथावकाश पुर्ण झाले. एखाद्या पुस्तकाची निर्मीती होत असतानां लेखकाने कुठला मजकूर लेखनात समाविष्ट करावा, कूठला गाळावा या बद्दल अनेकजण त्याला सल्ला देतात. परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे लिहीण्याच्या संकल्प त्याने तडीस न्यावयास पाहीजे. 'आहे मनोहर तरी' या पुस्तकाचे लेखन चालु असतांनाचा 'मौज प्रकाशगृहाकचे' श्री पु. भागवत यांनी ते पुन्हा पुन्हा वाचुन लेखिकेला प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुस्तकाचे लेखन पुर्णत्वास गेले. सुप्रसिद्ध कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांनी लेखिकेत पुस्तक लिहीण्याबाबत आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन हे पुस्तक साकार झाले. आत्मचरित्र लेखनासाठी वेगवेगळ्या त-हेच्या पद्धती आहेत. त्यातील एक अशी की, स्वतःच्या जन्म तारखेपासुन प्रारंभ करुन आपण जे जीवन जगलो हे सारं क्रमाक्रमाने कथन करायचे. ही पद्धत तशी आकर्षक नसल्यामुळे सुनीताबाईंना एक आगळ्यावेगळ्या पद्धतीचा अवलंब केला आहे. एखादी कल्पना व्यक्ती किंवा विषय डोळ्यासमोर ठेऊन तिच्या भोवती स्वतःचे विचार आठवणींची माला गूंफायची अशी नाविण्यापुर्ण पद्धती त्यांनी अंगिकारली आहे.
आपल्या प्रदीर्घ जिवनाच्या यशस्वी वाटचालीत लेखिकेने पु.लं. च्या सोबतीने जीवनाचे विवीध रंग पाहिले. स्वतःच्या व पु.लं. च्या विवीध क्षेत्रातील अनुभव व आठवणी लेखिकेने 'आहे मनोहर तरी' या आत्मकथेत ग्रथित केला आहे. व्यक्ती जेव्हां आपल्या आयूष्याच्या अखेरच्या टप्प्यावर येते, त्यावेळी तिच्या मनात जुन्या आठवणी येतात. त्यातील काही गोड तर काही कडु असतात. जीवनातील सूखदायक आठवणी त्या प्रत्यक्षात पुन्हा जगता येणे अशक्य असते. कल्पनासुष्ट्रीत ते जीवन पुन्हा जगण्याची संधी मिळून पुनःप्रत्ययाची आनंद घेता येतो. म्हणून आत्मचरीत्राची निर्मिती होते. लेखक आत्मकथेत स्वतःच्या आयूष्याबद्दल लिहीत असतो त्यामुळे त्याला 'मी' पणाचा स्पर्श होणे स्वभावीकच आहे. त्याने असे केले नाही तर त्याला आत्मचरीत्र लिहीणे शक्य होणार नाही. जीवनात अनेक व्यक्तींशी त्याचा वेगवेगळ्या परिस्थितीत संबंध आलेला असतो. म्हणून ज्या आठवणी कडु किंवा विस्मृतीत जमा झाल्या असतील त्या लेखनात समाविष्ट करणे शक्य होईल काय? तसेच स्वतःच्या खाजगी जीवनातील घटनांचे चित्रण कागदावर लिहून ते वाचकांसमोर आणणे कितपत योग्य ठरेल? ही आत्मचरीत्राची पथ्ये लेखकांनी पाळली नाहीत तर त्याच्या हातून अनेक परिचीत दुखावले जाण्याची शक्यता निर्माण होईल. पु.लं. नी आयुष्यात आत्मचरीत्र लिहायचे नाही असा संकल्प सोडला होता. असा उल्लेख 'अपूर्वाई' या गाजलेल्या पुस्तकात आढळतो. मात्र त्यांच्या विपूल लेखनातून पु.लं. चा आत्मचरीत्रात्मक भाग न्यात होतो. पु.लं. कोणाच्याही चुका दाखवित नसत. 'माणसांनी गुणां बद्दल बोलावे, उणेपणा काढु नये' असे त्यांचे मत होते. थोडक्यात दुस-याच्या मोठे पणा बद्दल दाद देण्याची दिलदार वृत्ती पु.,लं. मध्ये होती. स्वतःच्या व्यक्तीमत्वातील हा पैलू त्यांनी गानसंम्रानी केसरबाई केरकर यांच्यावर लिहीलेल्या 'एक तेजःपुंज स्वराचा अस्त' या लेखात दाखवला आहे. प्रसंग असा होता की, पु.लं. चा एक गूणी व संगीत प्रेमी शिल्पकार बंगाली मित्र शर्वरी यांनी केसरबाईंना दहा-बारा दिवस पोज साठी बसवून त्यांचा अर्थपुतळा प्लास्टरमध्ये तयार केला. या कामा साठी पु.लं. नी केसराबाईंना राजी केले. पुतळा तयार होईपर्यंत पु.लं. नी ती लगेच मान्य केली. याचे कारण त्यांना केसरबाईंच्या गायनाच्या टेप्स, मैफलीतील अनेक अविस्मरणीय आठवणी ऎकवण्याची संधी मिळणार होते. एके दिवशी झालेल्या गप्पागोष्टित पु.लं. नी केसरबाईंना एक प्रश्न विचारला, "संगीतीची विद्या आत्मसाद करायला गुरू आवश्यक आहे का? टेपरेकॉर्डवरुन तालीम घेता येणार नाही का?" पु.लं. च्या या प्रश्नाला उत्तर देतांना केसरबाई ठामपणे म्हणाल्या. "नाही. टेपरेकॉर्डवरुन चीज ऎकल्यावर ती गळ्यावर बराबर बसली नाही हे टेप सांगू शकणार नाही. स्वतःचे गाणे स्वतःच बसून ऎकतात, तुझ्यासारखे त्यांचे दोस्त कधी त्यांना त्यांच्या चुका सांगणार नाही. कशाला उगाच वाईटपणा घ्या? काय बरोबर आहे नं!"
एकदा मुलाखतीतून पु.लं. नी सांगीतले, "सर्व कलांत संगीत हे मला अधिक प्रिय आहे. संगीताच्या क्षेत्रात मला अंग आहे आसे समजले त्याच बरोबर याच क्षेत्रात आपण कूठपर्यंत मजल मारू शकू याबद्दल मी साशंक होतो. बालगंर्धव, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, अशा दिगज्जापंर्यत पोहचण्यापर्यंत आपल्या पंखात ताकद नाही हे मला समजले." आपल्या संगीताच्या प्रेमाबद्दल पु.लं. ना एकदा सांगीतलं होतं की आमच्या घरी बहिणीची मंगळागौर जागवतात. त्या रात्रीच्या कल्लोळाने मला आनंद दिला. आकाशवाणीतले आपले एक सहकारी श्री. मनोहर नगरकर यांना पाठवलेल्या पत्रात पु.लं. नी लिहीले, "मी मनापासून जर कशावर प्रेम केले तर ते संगीतावर त्या कलेने मात्र माझ्यावर अनुग्रह केला नाही. फक्त नादाला लावून ठेवले." पु.लं. नी सुर व लय यांच्यावर मनापासून प्रेम करतांना कुठल्याही घराण्याचा गंडा बांधला नाही. 'गणगोत' 'गुण गाईन आवडी' या गाजलेल्या लेख संग्रहात समाविष्ट केलेल्या अनेक लेखातून त्यांच्या संगीत प्रेमाचा अविष्कार जाणवतो. मुंबईतल्या गणपती उत्सवात सूरांच्या दुनियेमधील वेडेपिरांनी गिरगावातले रस्ते रात्रभर गजबजलेले असायचे. शनिवारी रात्री ब्राहण सभेत मास्तर कृष्णराव, आंबेवाडीतील मल्लिकार्जुन मन्सूर, चुनामेलन मध्ये हिराबाई बडोदकर, शाश्री हॉल मध्ये सवाई गंर्धव असे अनेक गाजलेले गवई आपली गायनकला पेश करीत. पु.लं. गाण्याच्या बैठकीला जाण्याच्या वयाचे झाल्यावर माधुक-यासारखे हिंडुन आपल्या कानाच्या झोळीत ते सुर गोळा करीत. गानहिरा हिराबाईचे गाणे ऎकायला चुनामलेन गायक प्रेमींची खचाखच भरलेली असायची. त्यातून काही मित्रमंडळींकडून बातमी यायची की शाश्री हॉलमध्ये सवाई गंधर्वाचा आवाज लागलाय पण त्यावेळी हिराबाईचा वरचा षडज लागलेला असायचा. म्हणुन कुणीही मैफल सोडुन जायचा राजी नसायचे. निरनिराळ्या वाड्यात गाजलेले गवई आपली कला सादर करीत. तेव्हा रसिकांना निवड करायला भरपूर वाव असायचा. यामुळे पु.लं. सारख्या अनेक गायक प्रेमी रसीकांची ओढाताण व्हायची. कुणा कुणाच्या गायनाला जायचे ? अशी धावाधाव पहाटेपर्यंत चालायची. नंतर जायफळाच्या कॉफी ऎवजी इराण्याच्या 'पावणा' बनमस्का खाऊनच गाण्याची सांगता होत असे.
पु.लं. चे चरीत्र म्हणजे संगीत, लेखन, वक्तृत्व, अभिनय अशा विवीध क्षेत्रांत नैपुण्य मिळवण्यासाठी केलेले तपश्र्चर्येचा इतीहास आहे. आपल्याला उत्तम साध्य झाले पाहीजे, न कंटाळता उत्तम आत्मसात केले पाहिजे अशी त्यांची अलौकिक जिद्द होती. तिथे अल्प संतोषाला वावच नव्हता. कुठलेही क्षेत्र असो, संगीत असो, लेखन असो, अभिनय असो, दिग्दर्शन असो, रेडिओवरचे भाषण असो, एक पात्री किंवा बहुरुपी प्रयोग असोत पु.लं. तिथे जिव तोडुन कामे करीत. इतीहासाने नोंद केलेल्या थोर व्यक्तींच्या जिवनातले असे अनेक प्रसंग पु.लं. च्या डोळ्यासमोर होते. अभिनयाबाबत पु.लं. नी चिंतामणराव कोल्हटकरांच्या तालमीबद्दल पु.लं. नी सांगीतले, "आम्ही तालमीला अभे राहिलो म्हणजे आमच्या कंबरा ढिल्या व्हायच्या पण चिंतामणराव शकत नसत." ललित-कला कुंज या नाटक संस्थेत पु.लं. नी व्यावसायिक नट व नाटककार म्हणुन आपल्या ध्येय साधनेच्या पूर्ततेसाठी उग्र तपस्या व धडपड केली. रंगभूमाचा साज-सजावट, नाटकाच्या तालमी, चिंतामणरावांच्या भूमीका एखाद्या निष्टावंत विद्यार्थ्या प्रमाणे पु.लं. नी डोळे उघडे ठेऊन पाहिल्या. गान संम्राग्नी केसरबाऊ केरकर यांनी कठोर साधना करून भारताच्या अभिजात संगीताच्या जगात आपले व गुरूंचे नाव कसे अजरामर केले या संदर्भात पु.लं. नी एका लेखात केसरबाईंचे उदगार उद्धुत केले आहेत. पु.लं. लिहीतात, "डोळ्यात तेल घालून शागीर्दाचे गाणे पाहाणारा, चुकले की कान पीळणारा गुरू लागतो, अरे, आठ-आठ दिवस तान घासली तरी अल्लादियाखाँसाहेबाच्या तॊंडावरती सुरुकुती हलायची नाही, वाटायचे, देवा नको हे गाणे," एव्हा प्रत्येक क्षेत्रातील अलौकिक गुरू आपली विद्या आपल्यांनतर टिकून राहावी अशिच्ग इच्छा मनात बाळगुन असतो. गायन क्षेत्राबाबत सांगायचे झाल्यास न्यानी गूरू आणि रियाझचे घंटे किती झाले ते न मोजणारा शिष्य असेच गाण्याचे शिक्षण व्हायला पाहिजे, केसरबाईंनी गायन साधनेसाठी अतिशय चिकाटेने अतोनात मेहनत केली. त्यांच्या आवाज रुंद, मोकळा, जोशपूर्ण व मेहनतीने लवचीक झाला होता. आपले गुरू अल्लदियाखाँ साहेबांच्या तालमीत अविरत मेहनत करून त्यांनी हा आवाज कमावलेला होता.
पु.लं. पधंरा वर्षाचे असतांना पार्ल्याला त्यांनी दहा वर्षाच्या एका बालकलांवताचे गाणे ऎकले होते. त्या बालगवयाबद्दल पु.लं. ना अतोनात उत्कंठा होती. याचे कारण काही दिवसांपूर्वी मुंबईच्या जिना हॉलमध्ये त्याने गाजवलेल्या मैफलीची रसभरीत वर्णने पु.लं. नी वर्तमानपत्रातुन वाचली होती. अनेक श्रोते मैफलीतून बाहेर पडतांना म्हणत होते, "हा दैवी चमत्कारच आहे," या बालकलाकाराचे नाव होते 'कुमारगंधर्व'. गतजन्मीची पुण्याई, दैवी देणगी अशा गुळगुळीत झालेल्या शे-यांनी कुमार गंधर्वाचा गौरव करणे हा त्यांच्यावर अन्याय करण्यासारखा आहे असा उल्लेख पु.लं. नी 'मंगल दिन आज' या कुमार गंधर्वावर त्यांच्या पंन्नासाव्या वाढ दिवसानिमीत्त लिहीलेल्या एका लेखात केला आहे . मौज प्रकाशनाच्या 'गुण गाईन आवडी' या पुस्तकात हा लेख समाविष्ट केला आहे. कुमार गंधर्वाचे गाणे त्यांच्या बरोबर जन्माला आले तरी त्यांना असामान्य जिद्द व डोळस परीश्रमांच्या साहाय्याने त्या गाण्याचे संवर्धन व सांगोपण केले व अभिजात संगिताच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले. एकदा पु.लं. व कुमार गंधर्व एकत्र बसले असतांना रेडिओवरुन कुणीतरी छायानटातील चिज गात असतांना त्या दोघांना त्या पेशकारी बद्दल नापंसती व्यक्ती केली. पु.लं. म्हणाले, "काय सुदंर चीज आहे पण हाल चालवले आहेत." यावर कुमार म्हणाले, "भाई, नुसते जरीची भारी कपडे असून चालत नाहीत. ते अगांला यावे लागतात. जरीची भारी टोपी डोक्यावर बसली नाही तर विचीत्र दिसते. परंतु स्वस्त गांधी टोपी नीट बसली तर शोभुन दिसते," कांही कांही गवयी गाण्याच्या आधी आपण कूठला राग गाणार हे सांगत नसत. कुमार गंधर्व मात्र तसं करीत नसत. कधी कधी असे व्हायचे मैफलीत रंगत वाढाली की, या रागांचा नाव अमूक अमूक आहे असे कुमार जाहीर करायचे. उलटपक्षी केसरबाई केरकर मैफलीत रागांची नांवे सांगत नसत. या संदर्भात पु.लं. लिहीतात, "एकदा राग सुरू झाल्यावर त्याचे नांव कळले नाही तरी त्याच्या आस्वादात काही फरक पडत नाही. मात्र रागाचे चलन ध्यानात आल्यावर त्या लाईनीवरुन गवई कसा चालतो ते मी पाहातो." पु.लं. ना कधी कधी रागाचे नांव समजले नाही तर ते आपली शंका गायक नाव गुप्त ठेवत असत, याचे कारण केसरबाई गाण्याच्या आधी रागाचे नाव गुप्त ठेवत असत, याचे कारण केसरबाईंच्या चरीत्रात वाचकांना आढळेल. हे चरीत्र केसरबाईंचे बंधु बाबूराव केरकर यांनी लिहीलीले आहे. एकदा मैफलीत एका जाणकाराने त्यांना विचारले, "आता या गायलेल्या रागाचे नाव काय?" केसरबाई मिस्कील पणे हसतं म्हणाल्या. "आपले संधेतईल नांव काय?" यावर ते गृहस्थ स्वस्थ बसले. त्या उत्तरात मेख अशी होती की, मुंज बंधनाच्या वेळी गुरू बटुच्या कानात मंत्र सांगतात, त्याचे संधेतील नाव सांगतात, ते नाव गुप्त ठेवायचे असते. गुरु मंत्र व गुरुने सांगीतलेले नाव जसे सांगायचे नसते तसेच गुरुने ठेवलेले नांव व संगीत मंत्र उघड करायचा नस्तो. ही गुरुची आग्न्या. केसरबाई गणपती उत्स्वात गायला नाहीय. त्यांच्या समोर मायक्रोफोन कधीच नसायचा. त्या कधी नाट्यगीत गायच्या नाहीत.
एकदा पु.लं. सहज म्हणाले, "माई, तुमच्या कालात नाट्यगीते खूप लोकप्रीय होती तरी तुम्ही कधी गायला नाहीत," यावर केसरबाई उत्तरल्या, "नाटकातली पदे नाटकात म्हणायची, त्याला ख्याल कशाला करायला हवेत?" एकदा ब्राम्हण सभेत बालगंधर्वाच्या गाण्याला केसरबाई उपस्थित होत्या. त्यावेळी बालगंधर्व भजनेच गात, भजन संपल्यावर एक श्रोता म्हणाला , " नारायणरावांनी एखादे नाट्यगईत गात त्यावेळी ते 'लुग्ड्यात' असत. ते आता धोतरात आहेय. सर्व नाट्यगीते रागरागिण्यांवर बसविलेले असतात. तरी त्यांना त्या राग रागिण्यातून म्हणावयास सांगा!" केसरबाईंच्या 'ते लुगड्यात असत' या शब्दप्रयोगात स्वतः बालगंधर्व व सर्व श्रोते खळखळुन हसले. केसर्बाई चतुर संभाषणकार होत्या. त्यांचे संभाषण विनोदगर्भ असे. त्यांच्या बोलण्यात थट्टा मस्करीही असायची. त्या मैफलीच्या स्थानी डौलदारपणा येत असत. त्यांच्या नुसत्या येण्यानेच दबदबा निर्माण होत असे. मैफलीत कुणी फर्माईश केलेली त्यांना रुचत नसे. पु.लं. ना अनेक वेळा त्यांचे गाणे ऎकण्याचा योग लाभला. पु.लं. बारा तेरा वर्षाचे असतांना केसरबाईचे गाणी त्यांनी प्रथम मुंबईत एका लग्न समारंभात ऎकले. पुढे त्यांच्या परिचयाचा योग आला व पाहुणचारही लाभला. गप्पागोष्टीत त्या एखादे वेळी पु.लं. ना भरपुर तंबाखू घालून पान जमवून देताल व असेही म्हणतील, "अरे, पान खा ना ! जीभ भाजली तर भाजू दे आणि गॅलरीतून पिचकारी मारतांना खाली कोणाच्या डोक्यावर पडणार नाही तेवढं मात्र बघहं!" इति पु.लं. पु.लं. च्या लेखनात गवयांच्या वैशिष्ठांचे, लकबीचे अचुक चित्रण वाचकांना आढळते, गवयाच्या घरी तंबाखु, पान, सुपारी, सुवासिक तंबाखुचे विवीध प्रकार, मोहीनी, पानाचे तबक असा सरंजाम असायला पाहीजे. चीज घोळवणारा गवई पान घोळवुन थुंकतो त्या साठी पिकदाणी आवश्यकच असते. कुमार गंधर्वाना स्वतःची पिकदाणी इतर कुणी स्वच्छ करुन ठेवणे रुचत नसे. कुमार नेहमीच कामात व्यस्त राहत. कुठे तंबो-याच्या तारा स्वच्छ करुन ठेव, घरातील मोरी साफ कर, सुपारी कतरुन बाटलीत ठेव अशी एक ना अनेक कामे ते करीत. मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणा-या पु.लं. च्या घरी पानाचे तबक, पिकदाणी व तंबोरे जुळवणारी मंडळी पाहून राम भैय्या दाते उदगारले, "तुम्ही बॉम्बेचे आहात हे खरंनाही वाटत, भैया!" पु.लं. नी लिहीलेल्या 'पानवाला' हा लेख 'खोगीरभरती' या संग्रहात समाविष्ट केलेला आहे. पानवाल्याला मसालापान खाऊन गिळणा-या गि-हाईअकापेक्षा पान थुंकणारे गि-हाईकच आवडते, असे पु.लं. नी लिहीलेले आहे. पु.लं. ना त्यांचा नेहमीचा पानवाला ब-याच वर्षानी भेटला. तो. पु.लं. ना म्हणाला, "साब आपके बाल सफेद हुवे मगर आपका गाना............".
एक काळ असा होता की गणपती उस्तवात बायकांचे गाणे होत नसे. तसेच बायकांनी गाण्याला जाणे हे निषिद्ध मानले जाई. परंतु लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्स्वाने सामाजिक जीवनाला एक अनोखे वळण दिले. एकदा हिराबाई बडोदेकर पुण्यातल्या रास्तापेठेतच्या गणेशोत्सवात प्रचंड जनसमुदायासमोर गायल्या. त्यांनी १९२५ साली आर्यभूषण थेटरमध्ये तिकीट लावून अभिजात संगिताचा पहिला जलसा केला. यामुळे बायकांच्या गायनाला पोरीबाळींच्या समवेत उजळ माथ्याने जाणे शक्य झाले. हिराबाईंनी केलेली ही सामाजिक क्रांती मोलाची आहे असे पु.लं. नी लिहेलेले आहे. मणिक वर्मा म्हणाल्या. "हिरबाईंच्या प्रयत्नांमुळे गाणा-या स्रियांना प्रतिष्ठा मिळाली." पु.लं. चे चिंतामणराव कोल्हटकरांच्या 'ललित कला कुंज' या नाट्यसंस्थेंतर्फे रंगभूमीवर पदार्पण झाले. पु.लं. लहानपासुनच नाटकात कामे करीत त्यामूळे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच्या हालचाली मंचभयापासून मुक्त होत्या. तेथे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत नाटकांच्या तालमी, व रात्री नऊ पर्यंत गाण्याच्या तालमी असा पु.लं. चा भरगच्च दिनक्रम होता. ते ललिताकलाकुंजात जवळ जवळ एक वर्ष चिंतामणराव कोल्हाटकरांच्या सहवासात होते. त्यांनी आपल्या ध्येह साधनेच्या पुर्ततेसाठी उग्र तपस्या व धडपड केली. त्यांनी नाटकांच्या तालमी व चिंतामण रावांच्या भुमिका एखाद्या निष्ठावंत विद्यार्थ्याप्रमाणे डोळे उघडे ठेऊन पाहिल्या व शंका समाधानासाठी वितंडवाद न घालता चर्चा केल्या. चिंतामणरावांसारख्या एका कसबी नटाच्या व श्रेष्ठ दिग्दर्श्काच्या कडक शिस्तीत राहून पु.लं. नी नाट्यकलेत प्राविण्या मिळवले. पुढे नाट्यव्यवसायचे आसन डळमळीत झाले. १९४५ साली 'ललितकलाकुंज' ही नाट्यसंस्था बंद पडली. फक्त मो.ग. रांगणेकरांची 'नाट्य्निकेतन' ही नाट्यसंस्था आपले पाय रोवून उभी होती. अशा परिस्थितीत पु.ल. 'ललिताकुजांत' आत्मसात केलेली अनमोल नाट्यकलेची शिदोरी घेवून रांगणेकरांच्या 'नाट्य-निकेतन' मध्ये डेरे दाखल झाले. तिथे त्यांना 'वहिनी' या नाटकातील लाडक्या भावोजीची भूमीका देण्यात आली. वहिनीची भूमिका ज्योत्स्ना भोळे करीत असत. तिथे अल्पावधीतच पु.ल. आपल्या मिस्कील व खॊडकर स्वभावामुळे सर्वांचे लाडले झाले.
पु.लं. च्या नाट्यनिकेतनमधील प्रवेशामुळे कंपनीला एक हरहुन्नरी कुशल नट लाभला. एवढेच नव्हे तर ज्योत्स्ना भोळे यांना एक जिवलग मित्र मिळाला, व पु.लं. ना एक बालमैत्रिण मिळाली. ज्योत्स्नाबाई पु.लं. च्या पेक्षा वयाने चार-पाच वर्षानी जेष्ठ असल्यामुळे भावोजींची कान पकडण्याचा हक्क त्यांनी बजावला व पु.लं. नी ज्योत्स्नाबाईंना तो पकडूही दिला. नाट्यनिकेतन मधील पु.लं. चा तो प्रवेश क्षण 'भाग्याचा' होता. ज्योत्स्नाबाईंच्या साठी निमित्त पु.लं. नी 'माझी बालमैत्रीण' हा लेख लिहीला. त्याच सुमारास पु.लं. साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानिमित्त ज्योत्स्नाबाईंनी सुद्धा पु.लं. च्यावर लेख लिहिला. तो लेख वाचनात आल्यावर पु.लं. नी फोनवरून सांगितले, ज्योत्स्नाबाई, तुमचा लेख वाचून माझे डोळे भरून आले. मी तुमच्यावरही लेख लिहिला आहे. हे दोन्ही लेख वाचल्यावर अस वाटतं की आपण दोघांनी एकत्र बसून एकमेकांवर लेख लिहिलेत!" पु.लं. ची ही बालमैत्रिण त्यांच्याबद्दल लिहिते, माझ्याशी तो खुप लाडीगोडीने वागायचा. एक दिवस मी त्या हूड पोराला `ए~पी. एल' अशी हाक मारली. गंमत म्हणजे पुढे आयुष्यभर तशीच एकेरी राहिली. आपल्या लेखात पु.ल. लिहितात, "मी साठीला पोहचलो तरी माझं लहानपण जपण्याचे श्रेय माझी बालमैत्रीण ज्योत्स्ना भोळेचं आहे. एखादा चविष्ट पदार्थ केला तर माझ्यासाठी तो तीन-चार दिवस राखून ठेवणारी, माझ्यापेक्षा वयानं ती जेष्ठ आहे म्हणून मला `जादा गडबड करु नकोस' म्हणून दटावणारी, `वहिनी' नाटकातील गाणी मेहनत करुन नीट म्हण असं सुनावणारी आणि विशेष म्हणजे मला 'ए~ पी. एल' या नावाने लाडीगोडीने हाक मारणारी, जिच्या सान्निध्यात मला माझ्या मोठेपणाचा विसर पडतो अशी ही माझी बालमैत्रिण." पु.लं. चा नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेतील तो प्रवेश पाहून नियती उद्गारला." क्षण आला भाग्याचा!" १९८३ मध्ये पुणे आकाशवाणीवर पु.लं. नी ज्योत्स्नाबाईंची मुलाखत घेतली होती. मुलाखत घेणारा व देणारी व्यक्ती ही दोघेजण संगीतातील जाणकार असल्यामुळे मुलाखत श्रवणीय झाली. मुलाखतीत ज्योत्स्नाबाईंनी सांगीतलं ते असं-- मला ईश्वराने चांगला आवाज दिला. लहानपणापासून मी गाण्यात रंगून जात असे. साहजिकच माझे अभ्यासाकडे लक्ष लागत नसे. शाळेत बाई मला नेहमी रागावत असत. एक दिवस त्यांनी मला शाप दिला. "जा, जन्मभर गाण म्हणत बसं." शाळा बदल्यावर मी आंतरशालेय संगीत स्पर्धेत भाग घेतला व मला बक्षिसह निळाले. "मला बालगंधर्वाना जवळून पाहण्याची इच्छा होती. तसेच त्यांनी माझे गाणही ऎकावं असं मनोमन वाटत होतं. आमच्या शाळेत बालगंधर्वाच्या कुटुंबातील एक मुलगी होती. या बाबत मी तिला विचारलं. एक दिवस ती मला बालगंधर्वाच्या घरी घेऊन गेली. त्यांनी माझ गाणं ऎकलं व मला शाबासकी दिली. यावर पु.लं. म्हणाले, " ज्योत्स्नाबाई, लहानपणी मी पण बालगंधर्वाना पेटी वाजवून दाखवली होती व तुमच्यासारखी मलाही त्यांनी शाबासकी दिली." मुलाखतीत पु.लं. पुढे म्हणाले, "ज्योत्स्नाबाई, तुमच्या `कुलवधू' या नाटकाला प्रचंड यश मिळाले.
एक दिवस असा आला होता की, धो धो पाऊस पडत असताना तिकीट विक्री चालू होती. आठ काऊंटर्स उघडले होते. मला आठवतं मी सुद्धा तिकीट विक्रीला बसलो होतो. `कुलवधू' च्या कांही प्रयोगात मी पण भूमिका केल्या होत्या." यावर ज्योत्स्नाबाई म्हणाल्या." `कुलवधू' मध्ये `भानुमती' ची भूमिका मी सतत पंचवीस वर्षे केली. माझ्या बरोबर `अविनाश' यांनी दहा वर्षे काम केले. कुलवधू चा पहिला प्रयोग ९-८-१९४२ रोजी ऑपेरा हाऊसला होता. परंतु शहरातील मिरवणूकींमुळे पहिला प्रयोग रद्द झाला. `आंधळ्याची शाळा' मध्ये माझ्या बरोबर केशवराव दाते यानी उत्तम काम केले." ज्योत्स्नाबाईंचे ५-८-२००१ रोजी वार्धक्याने निधन झाले. त्यांनतर पुणे आकाशवाणीने त्यांची सुकन्या वंदना यांची १९८३ साली घेतलेली मुलाखत पुन:प्रसारण केली. त्यांत ज्योत्स्नाबाईंनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीतील काही रोचक आठवणी सांगीतल्या. एकदा ज्योत्स्नाबाई दिल्लीला गेल्या होत्या. काकासाहेब गाडगीळ यांच्या निवासस्थानी त्यांचे गाणे चालू असतांना तिथे एक तार आली. त्यात हैदराबाद संस्थान खालसा केले असा मजकूर होता. ती वाचून काकासाहेब आनंदाने उद्गारले."ज्योत्स्नाबाई, गाणे थांबवा व क्षण आला भाग्याचा हे गाणं म्हणा." "रंगभुमीवरील गाजलेल्या भुमिकांपैकी `आंधळ्याची शाळा' व `कुलवधू' या नाटकाचा उल्लेख करता येईल. `आंधळ्यांची शाळा' मधील `एकलेपणाची आग लागली हुद्या' हे माझं गाणं सुरू झाल्यापासून चरणाच्या अखेरपर्यंत बरोबर असलेल्या केशवराव दांतेचा तो असामान्य मूक अभिनय या सा-यांनी प्रेक्षक धुंद होऊन जात. विशेष म्हणजे हे गाणे चालू असतांना केशवराव भोळे सेटिंगमागे गुप्तपणे आपला छोटासा वाद्यावृंद घेऊन उभे असायचे."
नाटक म्हणजे नेमके काय? नाटक हा एक साहित्य प्रकार असून या साहित्याला रंगमंचावर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न नाट्य व्यवसाय करीत असतो. नाटक ही समुदायापुढे उभी करून दाखवायची कला आहे. नाटक हे केवळ दृश्य आहे केवळ वाच्य नाही. फक्त पात्रांच्या संवादामार्फत कथन केलेली कथा अशी नाटकाची व्याख्या करता येईल. थोडक्यात नाटककाराने लिहीलेले नाट्यसंवाद प्रेक्षगारात सर्वांना स्वच्छ ऎकू जातील अशी कलापुर्ण व अभिनय कौशल्याने सादर करण्याची जबाबदारी पात्रांची असते. नाटक कंपनी म्हणजे विवीध व नानारंगी रसिक माणसांचा मेळावाच. नाट्यकलेत पारंगत असलेले नट व नट्या नाटककाराने मानवी स्वभावांच्या छटांना दिले नाट्यरुप रंगमंचावर सादर करतात. नाटक हे गर्दीपुढे करून दाखवण्यासाठी असतं यावर सर्व कलाकारांची नितांत श्रद्धा असते. मात्र नाटकाचे यश प्रेक्षगारात बसलेल्या प्रेक्षगारात बसलेल्या प्रेक्षकांना हा अविष्कार कितपत रुचला यावरच अवलंबून असते. प्रेक्षगारात विवीध रुची असलेले प्रेक्षक बसलेले असतात. त्या दृष्टीने समुदायाला चटकन आकलन होईल अशा कल्पनांचा व शब्दांचा खेळ नाटककाराला मांडावा लागतो. रंगमंच व प्रेक्षगार एक दिलाने एकत्र आले तर नाटकाचा प्रयोग यशस्वी होतो. नाटक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरुन सतत पुढे सरकत असते. रंगमंचावर चाललेले नाटक यशस्वी झाले किंवा नाही हे नाट्यगृहातच समजून येते. नाटक डोळसपणे कसे पाहावे व ऎकावे याचे सुंदर चित्रण पु.लं. नी `केशवराव दाते' या शीर्षकाच्या लेखात केले आहे. (संदर्भ: गुण गाईन आवडी). `आंधळ्याची शाळा' या संगीत नाटकात `बिंबाच्या' भूमिकेत ज्योत्स्ना भोळे व `मनोहर' ची भूमीका श्रेष्ट नट केशवराव दाते करीत. संगीत रंगभूमीवर गाणा-या पात्राच्या बाजूला असणा-या नटाला ते गाणे ऎकण्याचा मूक अभिनय करावा लागतो. परंतु हा मुक अभिनय मोजक्याच नटांना जमला. मात्र मनोहरच्या भूमिकेत केशवराव दात्यांनी आपल्या सुंदर मूक अभिनयामुळे ज्योत्स्नाबाईंनी आपल्या सुरेल स्वरांनी श्रोत्यांनी मंत्रमुग्ध केले. या बाबतीत केशवराव दातेंचे अभिनय पदुत्व श्रेष्ठ मानले जाते. `नाटकातल्या अभिनयात नटाची खरी गुंतवणूक ही बोलतांना जितकी असते त्याच्याहून कित्येक पट अधिक इतर पात्रांनी बोललेले ऎकण्यात असते. " असे पु.लं. नी लिहीले.
पुरूषॊत्तम लक्ष्मण देशपांडे ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती चार प्रमुख नावांनी ओळखली जात असे. पहिले नाव पुरुषोत्तम. या नावाचा वापर खूपच कमी असे. दुसरे नाव पु.ल. या केवळ दोन आद्याक्षरांतील सुटसुटीत व सुलभ संक्षेपात असंख्य मराठी वाचक त्यांना ओळखत असत. यात असामान्य आपुलकीचे प्रतिबिंबही दिसत असे. पी.एल हे तिसरे इंग्रजी आद्याक्षाराचे नाव. हे फारसे कुणाच्या वापरात नसे. `भाई' हे चौथे कौटूंबिक नाव. घरातल्या कुटुंबियांसाठी, निकटवर्ती यांसाठी सोयीचे होते. पु.लं. च्या मातोश्री त्यांना भाई म्हणत असत. हे घरगुती सलगीचे एकवचन सुनीताबाई देशपांडे यांनी `आहे मनोहर तरी' या आपल्या आत्मकथेत उपयोगात आणले आहे. पु.ल. हा एक ईश्वरी चमत्कार आहे. त्यांना नियतीने अनेक देणग्या दिल्या आहेत. विनोदाची देणगी, संगीताची देणगी, वक्तृत्वाची देणगी अशा अनेक देणग्या मिळाल्या. परंतु असे कौतुकास्पद शेरे किंवा उद्गार काढणे हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय करण्यासारखेच आहे. हे नेत्रदिपक यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. पु.लं. चे जीवन म्हणजे एक असामान्य जिद्द, डोळस परीश्रम यांची एक गाथा आहे. असे थोडक्यात म्हणता येईल. पु.ल. म्हणजे सतत वाहाणारा हास्याचा धबधबा, घरी सतत खो खो हसणारे पु.ल. अशी त्यांची एकांगी प्रतिमा तयार झाली. परंतु पु.लं. चा विनोद व संगीत ऎकणे, त्यांच्या लेखनाचा अस्वाद घेणे ही मनाला अल्हाद देणारी घटना होती. त्यांचे प्रत्यक्षात दर्शन फोटोतून, चित्रातून किंवा दुरदर्शनवरून घेणे हा एक विलक्षण अनोखा आनंद होता. पु.लं. ना मिळालेल्या अनेक देणग्यांपैकी एक सर्वात मोठी अमोल देणगी परमेश्वरांनी त्यांना दिली, ती म्हणजे सौ. सुनिताबाई, त्यांच्या `आहे मनोहर तरी' या पुस्तकातून पु.लं. चा बहुरंगी व्यक्तीमत्वाचं एक आगळच दर्शन वाचकांना घडलं. पु.लं. च्या मातोश्रींनी आपल्या गुणी सुनेच यर्थात चित्रण या शब्दात असं केलं, "सुनितानेच भाईच्या आयुष्याला वळण व शिस्त लावली. ती अगदी खंबीर भेटली म्हणून बंर नाही तर भाईची परवड झाली असती. हा कुठेतरी जातो, वाटेल तसे कार्यक्रम ठरवितो, नि मग तिला सर्व निस्तरांव लागतं. भाई सिनेमात काम करायचा. रात्री तो शुटींग संपल्यावर पहाटे चार वाजता घरी यायचा. भाई केव्हा परत येईल याचा अंदाज घेवून ती रात्री उशीरा स्वयंपाकाला सुरवात करी. तो आल्यावर त्याला आधी ती अन्न घेत नसे. अलीकडच्या किती मुली नव-यासाठी एवढे करतील?"
`आहे मनोहर तरी' या गाजलेल्या पुस्तकात सुनीताबाईंनी पु.लं. च्या व्यक्तीरेखेचे विविध पैलूंचे चित्रण केले आहे. १२ जून १९९० रोजी हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर वाचकांच्या अनुकूल-प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना दोघांमधील मतभिन्नता जाणवली. महाराष्ट्रात जणू काय एक वादळ निर्माण झाले. परंतु पु.लं. चा सतत समझोता करण्याचा स्वभाव असल्यामुळे पेल्यातील वादळपेल्यात शमले. सुनीताबाई `आहे मनोहर तरी' मध्ये लिहीतात, "माझ्या मनाविरुद्ध मी वागावे असा आग्रह त्याने चुकुनही कधी केला नाही. पण हे जे तो करतो ते कुणावरही दडपण आणणे सक्ती करणे, कुणाचेही व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणॆ हे त्याच्या स्वभावातच नसल्याचे लक्षण आहे." थोडक्यात पु.लं. च्या व्यक्तीमत्वातील या पैलूबद्दल. सुनीताबाईची पारख अचूक आहे, असं विजया राजाध्यक्ष यांनी एका लेखात नमुद केले आहे. या पुस्तकाने केसरी मराठा संस्थेचे पारितोषिक, व केशवराव कोठावळे पुरस्कार असे दोन मानाचे सन्मान पटकावले. पु.लं. ना सुनीताबाई बद्दल पत्नी म्हणून व लेखिका म्हणूनही प्रगल्भ कौतुक होते. स्वतः पु.लं. नी ही आनंदाची बातमी विजया राज्याध्यक्ष यांना फोनवरून कळवली. सुनीताबाईंचे हे लिखाण वाचकांसमोर आले पाहिजे असे पु.लं. चे मत होते. पुस्तक `मौज प्रकाशनातर्फे' प्रकाशित करण्याचे निश्चित झाल्यावर त्याला समर्पक शीर्षक शोधणे अत्यावश्यक होते. `तळ्यात मळ्यात'. `अशी ही एक' अशी काही नावे सुचली पण ती पटली नाहीत. लेखिकेच्या मनात योग्य नावांसाठी मनात सतत विचार चालू असतांना एक दिवस देशपांडे पती पत्नी गाडीतून जात असतांना सुनीताबाईंनी "मनोहर बेकरी" या नावाची पाटी पाहिली. घटना साधी होती पण त्यातून लेखिकेला तिच्या पुस्तकाला समर्पक शिर्षक मिळण्याची नामी संधी प्राप्त झाली. त्याचं असं झालं, `मनोहर' या शब्दातून सुनीताबाईनी `आहे मनोहर तर गमते उदास' ही सरस्वती कंठभरणा यांच्या कवितेची ओळ आठवली. यामुळे त्यांच्या पुस्तकांच्या नांवाचा पश्न लगेच सुटला. आपल्या पुस्तकाला हे नाव आवडल्यावर प्रकाशन श्री. पु. भागवतांबरोबर झालेल्या चर्चेनंतर `आहे मनोहर तरी' हे नाव कायम झाले. प्रकाशकांच्या मनात पुस्तकाचा जाहिर समारंभ करावा असे होते. याचे कारण पुस्तकाची जाहिरात होऊन विक्रीला हातभर लागतो. परंतु लेखिकेची या सुचनेला मान्यता मिळाली नाही. तेव्हा १२ जून १९९० रोजी मुंबईला एन.सी.पी.ए. मधील वातानुकूलित खॊलीत अनौपचारिक प्रकाशन समारंभ झाला. त्यावेळी पु.लं. व सुनीताबाईंचा आवडता दिनेश व त्याची पत्नी, गोविंदराव तळवळकर, राज्याध्यक्ष पती-पत्नी अशी मोजकी मंडळी हजर होती. पु.लं. व सुनिताबाईंच्या आयुष्यात १२ जून या तारखेला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
याच तारखेला रत्नागीरीला १९४६ साली सुनीता ठाकूर या सुनीता देशपांडे झाल्या. आपल्या भारतीय जीवन प्रणालीत विवाह हा एक पवित्र संस्कार मानला गेला आहे. त्याचे पावित्र्य १२ जून १९४६ पासून ५४ वर्षे भाई व सुनिताबाईंनी अभंग टिकवले. `आहे मनोहर तरी' प्रकाशित झाल्यावर वाचकांची शेकडो पत्रे आली. विशेष म्हणजे या पुस्तकाचा आढावा घेण्यासाठी पाच भागाचे एक चर्चा सत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. पु.ल. व सुनिताबाईंनी चर्चासत्रातील शेवटच्या भागाला येण्याचे कबूल केले, व त्याप्रमाणे उपस्थित राहिले. दोघांनी ते सत्र दुरच्या खुर्चीवर बसून अलिप्तपणे ऎकले. एकदा या चर्चासत्रा आधी पु.ल. गमतीने म्हणाले, "काय, न्याय आहे पहा. आम्ही जन्मभर लिहीलं. त्यावर चर्चासत्र वगैरे काही नाही. पण या पुस्तकावर मात्र........." `आहे मनोहर तरी' या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली. प्रकाशकांकडून घसघशीत रॉयल्टी येण्याआधी सुनीताबाईनी पु.लं. नी विचारले, "भाई, हे माझ्या कमाईचे पैसे आहेत. त्यातून तुला काय आणू?" भाई उद्गारले," तुझ्या कमाईचे कसे? माझ्यामुळे तर तुझे पुस्तक खपलं!" हे किस्से विजया राज्याध्यक्ष यांनी कथन केले. साहित्य-संगीत-नाटक व गप्पागोष्टी यांमधून पु.लं. च्या बहुढंगी व्यक्तीमत्वाचं आगळं दर्शन `आहे मनोहर तरी' मधून वाचकांना घडलं. या पुस्तकात थोडक्यात अस सांगता येईल की, सुनिताबाईना स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बांध घातला व वेळोवेळी अप्रियता पत्करुन सारण्याची भूमिका पार पाडली. या संदर्भात श्री. जयंत नारळीकर लिहीतात:- "या सारथ्यानं केवळ मागे बसलेल्या महारथ्याच्या सांगण्यावरुन रथ चालवला नाही तर स्वतःच्या व्यावहारिक दृष्टीकोनातून त्यला वेगळी दिशाही दाखविली व काही प्रसंगी त्या महारथ्याला व्यावहरिकगीता देखील सुनावली." १९७७ मध्ये लोकसत्ता निवडणूका जाहिर झाल्या. अन्य कोणाही व्यक्त्यापाशी नसलेले धारदार विनोदाचे शस्त्र हाती घेऊन पु.लं. नी जनता पक्षाच्या बाजूने प्रचारीत उडी घेतली. पु.लं. ची भाषणे ऎकण्यासाठी लाखोंनी अभूतपुर्व मिळालेला प्रतिसात पाहून सर्वांनाच समाधान लाभले. थोडक्यात रथाची वेगाने घोडदौड सुरू होती. पु.लं. च्या भाषणांचा जनतेवर मोठा प्रभाव पडला. परिणामी जनतापक्ष सत्तेवर येण्याचे निश्चित झाल्यावर पुण्याला एस. पी. कॉलेजवर विजयाची सभा ठरली. त्यांत पु.लं. चे भाषण तयार होते. परंतु सारण्यानं लगाम आवळले व म्हटले.:- "भाई त्या सभेला जाऊं नये असं मला वाटतं. ती सभा जनता पक्षाच्या विजयाची सभा आहे. आता भाईचं काम संपलं आहे." "मी माझा मोठेपणा सांगत नाही. पण आज लोक जमणार. त्यातले बरेचसे माझे भाषण ऎकण्यासाठीच. माझं नाव जाहिर झालयं. मी गेलो नाही तर त्यांना फसवण्यासारखे होईल." भाई. अखेरीस भाई सभेला गेले नाहीत. लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून भाईंनी आपले भाषण कॅसेटवर रेकॉड करावे व ते सभेत ऎकवावे असे ठरल्यावर या विषयावर पडदा पडला. कर्तूत्वान पुरूषांच्या घरात स्त्रियांचे सार्वभोमत्व असतं अशा अनेक नोंदी इतिहासात आढळतात.
दुसरे महायुद्ध अखेरच्या पर्वात होते. ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान चर्चिल यांनी बर्लिनवरचे बॉम्बहल्ले पाहाण्याच्या हट्ट धरला. परंतु त्यांची पत्नी सारा म्हणाली, "यू नॉटी बॉय, यू विल नॉट गो!" आणि चर्चिल गेले नाहीत. सर डॉन ब्रॅडमनची पत्नी जेसी त्यांना सांगू शकत असे, "डॉन, डोन्ट बी सीली!" पु.ल. च्या बाबतीत सांगायचे झाल्यास एकदा विद्याधर पुंडलीक यांनी ललित मासिकातर्फे घेतलेल्या मुलाखतीत पु.लं. ना विचारले, "सुनिताबाईंच्या तुमच्या घरातील सार्वभोमत्वाचे रहस्य काय? " यावर पु.लं. उत्तरले, "कुणाच्या घरात बायकोचं सार्वभोमत्व नसतं?" पु.लं. पुण्याचे भूषण असल्यामुळे त्रिदल संस्था पुणे यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा `पुण्यभूषण' हा मानाचा किताब त्यांना ३० मे १९९३ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात समारंभपूर्वक बहाल करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, आदि क्षेत्रांमध्ये, कौतुकास्पद कामगिरी करणा-या व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जातो... याआधी भीमसेन जोशी, डॉ. बानु कोयाजी, शंतनुराव किर्लोस्कर अशा मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. रंगमंदिरात रसिक, पु.लं. चे चहाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकृति बरी नसल्यामुळे पु.लं. मोजकेच बोलले. पण नेहमीसारखीच श्रोत्यांनी भाषणाला मनापासून दाद दिली. त्यावेळी पु.लं. च्या घरी नातेवाईक मंडळी जमली होती. त्यांत सुनीताबाईंची घाकटी बहीण शालन पाटील होती. समारंभ झाल्यावर दुस-या दिवशी बहुतेक सर्व जण आपापल्या घरी गेली. शालनला सोबत म्हणून सुनीताबाईंनी काही दिवस राहण्याचा आग्रह केला. आणि एक दिवस अघटित घडले. भाई बाथरुममध्ये पाय घसरून पडले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य न झाल्याने घरातील मंडळींनी त्यांना उचलून पलंगावर झोपवले. संकट आले होते. डॉक्टर्सनी प्रयन्तांची शर्थ केल्यावर पु.लं. ना बरे वाटायला लागले. हे पाहून शालन माईंना म्हणाली, "भाई आता हिंडू फिरू लागले आहेत. तेव्हा मी आता घरी जाईन म्हणते." "शालन अगं काय घाई आहे? आणखीन थोडे दिवस राहा नं! मला एक छान कल्पना सुचली आहे. भाई आता पुर्वी सारखाच वावरायला लागला आहे, चालू बोलू लागला आहे. तेव्हा त्याच्या पुढ्यात टेपरेकॉर्डर ठेऊन त्यानेच आपल्याला त्याच्या आयूष्यातील महत्वाच्या घटना, प्रसंग त्याला आठवतील तशा कथन करायच्या, यामुळे काय होईल की तो बिझी राहिल आणि स्मरणशक्तीलाही चालना मिळेल. कशी कल्पना वाटते?" "माई वा नाईस आयडिया!" सुनीताबाईंची ही कल्पना पु.लं. नी उचलून धरली व प्रत्यक्षात सुद्धा आणली. कथानकाला प्रारंभ करण्याआधी पु.लं. म्हणाले, "मला जशा घटना आठवतील, तशा मी रेकॉर्ड करीन. या क्षणाला माझ्यासमोर `जयंत नारळीकर' आहेत. याचे कारण सकाळी लवकर जाग आली म्हणून रेडिऒ लावला. नारळीकरांचे `चिंतन' हा कार्यक्रम कानावर पडला. सहाजिकच नारळीकरांची मला आठवण झाली. त्यांच्याबद्दल मी आता सांगतो. "मी लंडनला टेलिव्हिजनच्या शिक्षणासाठी गेलो होतो. लंडनमधील प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर मी एडिंबरला नाट्य, संगीत महोसव पाहायला गेलो.
दर वर्षी त्या महोत्सवात नाटके, नृत्यनाटके, चित्रकला प्रर्दशने, कळसूत्री बाहूल्यांचा खेळ असे कार्यक्रम होतात. मी व सुनीता सकाळपासून एडिंबरात भरपूर भटकलो. दुपारी लंच घेतल्यावर तेथील गजबजलेल्या प्रिन्सेस स्ट्रीटवर आलो. तेथे एका दुकानाची शोकेस पाहात असलेल्या दोघां तरुणाकंडे माझे लक्ष गेले. माझ्या कानावर त्यांचे मराठी बोलणे पडले. तेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले, "हॅलो आपण कुठले?" ध्यानी मनी नसता अचानक मराठी शब्द कानावर आल्यामुळे ते दोघे जण जरा चमकले. मी त्यांना संभ्रमात न ठेवता माझी व सुनीताची ओळख करून दिली. त्या दोघापैकी एक होते आपल्या भारताचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. पुढे काही दिवसांनी मी आणी सुनीता केंब्रिज विद्यापिठात गेलो. तिथे नारळीकर भेटले. त्यांच्याबरोबर विद्यापीठ पाहून झाल्यावर मी म्हणालो, "चला, आता मी तुम्हाला `चितंन' वाचून दाखवतो. नारळीकरांच्या खोलीत मी वाचन केले. शालन तुला माहितच आहे `चिंतन' माझ्या बटाट्याची चाळ या बहुरुपी प्रयोगाचा शेवटचा भाग आहे. माझे काही विनोदी लेख हंस, सत्यकथा, किर्लोस्कर या मासिकांतून वेळोवेळी प्रकाशित झाले होते. १९५८ साली हे लेख `बटाट्याची चाळ' या नावाने मौज प्रकाशनने प्रकाशित केले. मी लंडनला महाराष्ट्र मंडळातर्फे या पुस्तकातील काही लेखांचे अभिवादन केले होते. त्याच सुमारास मी तेथे डिलन टॉमस या सुप्रसिद्ध वेल्श कवी याच्या साहित्यकृतीवर आधारलेला साभिनय कार्यक्रम पाहिला. अडिच-तीन तास चालणारा हा अश्रूंचा व हास्याचा खेळ ब्रिटीश नट एमलिन विल्यम्स रंगभूमीवर सादर करत असे. आपली स्वतःची अस्खलित वाणी, डिलन टॉमसची अलौकिक प्रतिभा व रंगभूमीवरची एक घडीची खुर्ची. या शिदोरीवर विल्यम्स प्रेक्षकांना जागेवर खेळवून ठेवत असे. विल्यम्सच्या दर्शनाने माझ्या बहुरुपी प्रयोगांना चालना मिळाली. सुनीता मला म्हणाली, "भाई, तुच हे काम का करत नाहीस?" नंतर `बटाट्याची चाळ' प्रयोगरुपाने रंगमंचावर सादर करण्याचा मी निर्णय घेतला. चाळीचे प्रयोग बंदिस्त नाट्यगृहातच मी करत असे.
खुल्या रंगमंचावर अनेक पात्रांच्या वेड्यावाकड्या हालचाली करणे मला शक्य होते तरी तसे केल्यास माझ्या आवाजावर परिणाम होण्याची शक्यता होती. चाळीचे पहिले दोन प्रयोग भारतीय विद्याभवन, चौपाटी येथे झाली. पुढे बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई व बालगंधर्व रंगमंदीर पुणे, येथे प्रयोग मी सादर केले. या प्रयोगात चेह-यावरच्या हावभावापेक्षा सबंध शरीराच्या हालचालवर माझा भर असे. भ्रमण मंडळाचे सभासद प्रवासासाठी बोरीबंदरला जाण्यसाठी निघतात त्यावेळच्या प्रसंगात व्हिक्टोरीयात बसलेल्या माणसांचे गचके मी देत असे. प्रेक्षक याला कडकडून टाळी देत. बेहोषीतल्या त्या टाळीचा कडकडाट काही निराळाच होता. "भाई, मी तुमचं बोलण थोडावेळ खंडीत करते, "शालन म्हणाली." तुमच्या `अपुर्वाई' मध्ये विल्यम्सच्या खेळाची तुलना तुम्ही आपल्याकडील जुन्या पट्टीच्या कीर्तनकाराशी केली आहे. निजामपुरकर बुवा, कवीश्र्वर बुवा केवळ ह्या अस्खलित शब्दासामर्थ्यावर श्रोत्यांना रात्ररात्र तरंगत ठेवीत. आपण पुढे असेही लिहीले आहे की व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या गोष्टी गावोगावी जाऊन कां सांगू नयेत? त्यांची कथनशैली सुंदर आणि त्यांच्या गोष्टीत गोष्टी आहेत, विनोदी आहेत, कारुण्य आहे.
मनुष्य स्वभावाचे शेकडो ह्र्द्य नमुने आहेत. मराठी रंगभूमीवर प्रयोगांची आवश्यकता आहे. ती ह्या अशा प्रयोगांची! बरं तुमचं कथन आता पुढे चालू करा." "हो, चाळीच्या प्रयोगात रंजकता व विनोद असल्यामुळे लोकांना तो आवडला. प्रयोगाचा शेवट मी करूण दाखवला कारण संपूर्णपणे वाईट मी पाहूच शकत नाही. केवळ `चिंतन' ऎकण्यासाठी माझ्या आईने `चाळीचे' सात-आठ खेळ पाहीले. आता तुर्त एवढेच पुरे. उद्या आकाशवाणी वरच्या आठवणी सांगेन!" पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये मी विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होतो. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत आम्ही निर्माते एकत्र बसत असू. त्यांत मी, कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग मला आठवतो. महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले मी म्हणालो गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले. बा. भ. बोरकरांचे घरगुती नाव होते. 'बाकीबाब'. ते ऑफीसमध्ये टेलिफोन खणखणल्यावर रिसिव्हर उचलून म्हणायचे. "धिस ईज पोएट बोरकर स्पीकिंग! बोरकर आकाशवाणीवरच्या वरच्या श्रेणीच्या त्यांची काव्यमैफिल व्हायची. ते नवी कविता म्हणण्याच्या रंगात आलेले असतांना साहेबांचा शिपाई देखील त्यांना निरोप सांगायला कविता संपायची वाट पाहात उभा राहायचा. त्यांच्या ओठात एक तर वेगळ्या स्टाईलने धरलेली सिगारेट असायची किंवा कवितेची ओळ असायची बोरकरांची कविता गात गात जन्म घ्यायची आणि मग कागदावर तिचे नुसते टिपण व्हायचे. गांधीजींवर त्यांची निस्सिम श्रद्धा होती. `महात्मायाम' पुरे होण्यासाठी त्यांनी दिल्लीची दर्जेदार जागा स्विकीरण्याचा मोह टाळला. दुर्देवाने तो संकल्प पुरा झाला नाही.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांच्या निमित्ताने व मुंबई आकाशवाणी वर नाट्यनिर्माता म्हणून काम करीत असताना मला अनेक कलाकारांचा सहवास लाभला. मी व सुनिता ओरीएंट हायस्कूल मध्ये शिकवत असतांना नीलम आमच्या शाळेत होती. नीलमचे वडील हिरामण देसाई नाट्यवेडे होते व ते माझ्या परिचयाचे होते. पुढे ती साहित्य संघाच्या नाटकातून भूमिका करू लागली. माझ्या `छोटे मासे मोठे मासे' मध्ये तिने तमासगीर बाईचा रोल केला. `वा-यावरची वरात' मध्ये आम्ही तिला सामील करून घेतले. आकाशवाणीच्या `पुन्हा प्रपंच' मुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. नीलमला तिच्या वडिलांकडून गोड आवाजाची देणगी मिळाली. (नीलम म्हणजे नीलम प्रभू) मी विजया मेहताला, तेंडुलकरांच्या `श्रीमंत' व इतर एकांकिकेत पाहीले. मला तिचा अभिनय खूप आवडला, नंतर मी तिला आमच्या नाटिकांमध्ये रोल करण्यासाठी बोलवले. `तुझ आहे तुजपाशी' लिहीत असतांना उषाची भूमिका विजयाकडे सोपवण्याचा निर्णय मी घेतला होता. `सुंदर मी होणार' मधील बेबी राजेची भूमीका विजयाला दिली. तिला विल्सन कॉलेजच्या महोत्सवासाठी एकांकिका हवी होती. तेव्हा मी `छोटे मासे मोठे मासे' लिहून दिले. या प्रयोगाचा दर्जा इंटरनॅशनल लेव्हलचा होता. या तरुण मंडळींचा उत्साह व उभारी पाहून मी त्यांना `सांर कसं शांत शांत' व `सदू आणि दादू' अशा दोन एकांकिका लिहून दिल्या. विजयाचा आमच्या वा-यावरची वरातीत काही प्रयोगातही सहभाग होता, तिने अल्काझीकडे नाट्याचे धडे घेतले होते. `तुझ आहे तुज पाशी' मधील काकाजीची व्यक्तिरेखा विलक्षण असल्यामुळे ती भूमिका कोणाला द्यावी यावर चर्चा चालू होती. काही नावे पुढे आली, पण मी पल्लेदार आवाज असलेल्या व राजबिंड्या दाजी भाटवडेकरांना ट्राय करण्याचे ठरवले. त्याने काकाजींची भूमिका खूप उंचीवर नेऊन ठेवली. या नाटकाचा पहिला प्रयोग होण्याआधी आचार्यांचा रोल करणारा एकन टनाटन सोडून गेला. प्रयोगाची तारीख तोंडावर आली होती. आचार्यांची भूमिका काकाजींच्या रोल इतकीच महत्वाची असल्यामुळे अनुरुप पात्राची निवड करण्यास वेळ होता. परंतु याच नाटकात भिकू माळ्याची भूमिका करणा-या राजा पटवर्धन यांना आचार्यांच्या रोल मध्ये रंगमंचावर आणले. माझी निवड त्यांनी यशस्वी करून दाखवली.
मी मुंबई आकाशवाणीवर नाट्यनिर्माता असतांना भक्ती बर्वे या बालकराकाराने `वयम मोठम खोटम' या नाटिकेत काम केले होते. ही नाटिका मी मुलांसाठी लिहीली होती. मी ती का लिहीली याचा एक गंमतीदार प्रसंग मी सांगतो. एकदा माझी छोटी भाची मला म्हणाली, "मामा, मला एक नाटक लिहून द्या की." मला लहान मुलांसाठी नाटक लिहीता येत नाही अस मी तिला सांगीतल्यावर ती म्हणाली, "अय्या! मग तुम्ही प्रोफेसर कसले? हुडत!" लहान मुलांना आपण मोठ्या माणसांप्रमाणे वागाव अस वाटत असतं व खरोखरच ती तशी वागतात. यातून मोठी फौज कशी तयार होते याचे चित्रण मी या नाटिकेत केले आहे. 'गणगोत' मध्ये मी माझा छोटा भाचा `दिनेश' याचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. `बटाट्याची चाळ' पाहून आल्यावर तो माई आत्याला म्हणाला, "भाईकाका `विदूषक' आहे की नाय गं! कारण लोक त्याच्याकडे बघून हसत होते." पुढे काही वर्षांनी मी `ती फुलराणी' हे नाटक लिहीले. ते `पिग्मॅलियन' चे मराठीकरण आहे. परभाषेतील उत्कृष्ट कलाकृती मराठीत जरूर यायला पाहिजेत असे मी नेहमीच सांगत आलो आहे. शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारांमुळे होणारा विनोद हा त्या नाटकाचा कणा होता. समाजातील उच्च थरातील व्यक्तिंची भाषा शुद्ध मानली जाते. व्यक्तीला समाजात मानाचे स्थान पाहिजे असेल तर आपली भाषा शुद्ध असली पाहिजे. शुद्ध बोलणारी व्यक्ती अशुद्ध उच्चार करणा-या व्यक्तिपेक्षा स्वतःला श्रेष्ट समजते. पाणी या शब्दाला `पानी' किंवा `आणि' या शब्दाला `आनी' म्हणणा-या व्यक्तिकडे ती तुच्छतेने पाहाते. मी `पिग्मॅलियन' चा `संतु रंगेली' हा गुजराथी नाट्यप्रयोग पाहिला. मूळ इंग्रजी कथेवर मराठी भाषेचा साज चढवून इंडियन नॅशनल थिएटर्तर्फे `ती फुलराणी' मोठ्या दिमाखाने रंगमंचावर आली. मी नाटकात बालकवीची `फुलराणी' या गाजलेल्या कवितेचा उपयोग केला. भक्ति बर्वे, सतीश दुभाषी, अरविंद देशपांडे या गुणी कलाकारांनी नाटकात भूमिका केल्या.
एकदा मी भक्तिला नाटकातील एक प्रसंग सांगत होतो. तो प्रसंग अधिक परिणाम कारक होईल असे तिला वाटून ती म्हणाली, "पी. एल. काका, हा प्रसंग तोंडात गोट्या ठेऊन करु का?" यावर मी तिला म्हणालो, "नको, भक्ति, तू चुकून गोटी गिळालीस तर? त्यापेक्षा तोंडात गोळ्या ठेव!" मला `फुलराणीतील' दगडोबा साळुंकेची भूमिका करायची इच्छा होती. पण सतीश मला म्हणाला, "भाई, तुम्ही सुरवातीच्या प्रयोगात दगडोबा उत्तम कराल. पण पुढे तुमच्या उत्तर व्यापांमुळे सवड मिळणार नाही. नाटकात भाई नाहीत तर आम्हाला कोण पाहायला येणार?" (`ती फुलराणी' वर आधारीत `पु.लं. फुलराणी आणि मी' हा प्रयोग वाई मध्ये १२/०२/२००१ रोजी सादर करुन भक्ती बर्वे मुंबईला परत येत असतांना मोटार अपघातात निधन झाले आणि फुलराणी अकाली कोमजली. या प्रयोगाची संहिता स्वतः भक्ती बर्वे यांनी तयार केली होती.) "शालन, हे बघ, आता मला थकल्यासारखं वाटत आहे. म्हणून रेकॉडर बंद करतेस का? उद्या मी बालगंधर्वाबद्दल बोलेन." माझ्या वडिलांना बालगंधर्वाचा सुरेल स्वर व अभिनय अतिशय आवडत असे. त्यांच्या बरोबर आम्ही दोघा भावंडांनी गंधर्वांची अनेक नाटक पाहिली. बालगंधर्वांचे गाणे व अभिनय देशपांडे कुटूंबाचे कुलदैवतच. रंगमदिरात ऑर्गनवर कांबळे. सारंगिये, कादरबक्ष व तबल्यावर अहमदजान हे ब्रम्हा, विष्णू, महेश बालगंधर्वांचा स्वर व व्यंजनेसुद्धां वाद्यातून उचलण्यास तत्पर असायचे. रंगभूमीवरचे ते मंतरलेले दिवस होते. ज्या प्रमाणे संताचे सहज बोलणे हे उपदेशपर असायचे त्याप्रमाणे बालगंधर्वांनी कुठलाही स्वर लावला तरी तो सुंदर असायचा. या डौलदार देखण्या राजहंसाने आपल्या जवळचा मोत्याचा चारा अनेकांना कित्येक वर्षे खाऊं घातला. त्यांच्या वार्धक्यात ते मला एकदा म्हणाले, "वीणा वाजत आहे. तारा गंजल्या आहेत, पण सुर न सुटता ते लांब जात आहेत, देवा!" वार्धक्याचा असह्य होणारा शाप तर प्रत्येकाच्या माथ्यावर ईश्वराने कोरलेला आहे. पण या शापाने खचत न जाता, नाऊमेद न होता. बालगंधर्व अपंग अवस्थेतही अडीचशे-तिनशे मंडळी घेऊन जंगी नाटक कंपनी काढून सर्वांचे मनोरंजन करण्याचे स्वप्न पाहात होते. वाढत्या वयाबद्दल बाह्य आकर्षणे शिथिल होत जातात. पण आतील गाभा मात्र चैतन्यमय राहतो. बालगंधर्वांचा हा आतला पिंड असामान्य कलावंताचा होता. थोर कलावंत सहजासहजी आपला पराभव मान्य करित नाहीत. एकदा मला तात्यासाहेबांनी (शिरवाडकर) नानासाहेब फाटकांनी हद्य हेलावून टाकणारी आठवण सांगितली होती. वृद्धावस्थेत हा नटसिंह एकाकीपणाच्या गुहेत खचत चालला होता. त्या अवस्थेत त्यांनी तात्यासाहेबांकडे एक नाटक मागितले. शेक्सपियर किंग लियरचं रुपांतर. शिरवाडकरांनी नानासाहेबांना नकार दिला नाही, ती मागणी पुर्ण करण्याचे प्रयत्न केले. पण ते जमले नाही. पुढे नानासाहेबांसारखा एखादा रंगभूमीवरचा राजाच नाटकाचा नायक होऊ शकेल असे कल्पून त्यांनी एक स्वतंत्र शोकांत नाटक लिहीले व ते `नटसम्राट' या नावाने रंगभुमीवर आले. त्यावेळी नानासाहेब पुर्णतः निवृत्त झाले होते. शालन, ही माणसे हरणारी नव्हती. मी बालगंधर्वांच्या भेटीला गेलो की त्या वृद्ध्मुर्तीकडे न बोलता पाहात बसायचो. मायबाप्पा! देवा! आमच्या अन्नदात्यांनी फार कौतुक केलं हो, आमच्या त्या वेळच्या आठवणी बालगंधर्व सांगत असतं. माझ मन मात्र वडिलांसमवेत बालगंधर्वांची नाटक पाहाण्यासाठी ऑपेरा हाऊसमध्ये शिरायचे. विश्वाचा पसारा अफाट आहे. या जगात मनातल्या सर्वच गोष्टींची, मनोगतांची, पूर्तता कोणी करू शकत नाही. तेव्हा मी अमूक एक करु शकलो नाही असं म्हणण कितपत योग्य आहे? आता हे सुंदर शरीर वार्धक्याने गलितगात्र झाले आहे. माझा गळा गेला, पायातील शक्ति गेली, डोळे निस्तेज झाले, वाणी कातर झाली. ही सारी वृद्धत्वाची लक्षणे आहेत. पण अजुनही असं वाटत कांही समाजिल गोष्टी करायच्या राहून गेल्या. संगीत हे माझ आनंदाच क्षेत्र, गरीबांच्या वस्तीतून, खेड्यापाड्यात जाऊन, तहान भूक हरपून गायला हवे होते. गायला सुरवात केल्यावर भराभर गायला पाखरं जमली असती. रंगबेरंगी कपडे घालून सुंदर दिसलो असतो. मोठ्यांसमोर नाचण्याची संवय झाली होती. मुलांचे मन रंजवण्यासाठी फार काही केलं नाही याची खंत वाटते. देवाने देणगी दिली आहे ती वार्धक्याने हरण केली. सुनीताबाई व शालन भाईंचे कथन लक्षपूर्वक ऎकत होत्या. अचानकपणे त्या दोघींना भाईंच्या सुरात फरक जाणवला. सुनीताबाईंनी पुढे येऊन पाहिले तर भाईंचा श्वासोच्छवास जोरात चालू असल्याचे त्यांनी दिसले. त्यांनी लगेच डॉ. प्रयाग यांना फोन केला. पु.लं. ना लगेच इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण सारे व्यर्थ झाले.
१२जून२००० रोजी पु.लं. ची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्रावर वज्राघात झाला....
-------------------!!-------------------------
2 प्रतिक्रिया:
Speechless...
Nilesh Bhosale
Your hard work for Pu la is very nice. Hearty congratulations for that!
But simultaneously i would like to notify that there are some typing mistakes and doubts about correctness of some informations too. Please check them out.
Best wishes.
-Harsh
Post a Comment