Monday, February 26, 2007

"व्यक्ती आणि वल्ली" .....एक प्रसंग......

चितळे मास्तर

एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.

"हं, गोदाक्का, सांग वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"

"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?"

गोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.

"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.

"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या?
राम्या तु सांग."

मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--"

"का रे राम्या?" मास्तर दटावायचे.

"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?"

"तिचा पदर कशाला दिसायला हवा?"

"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?"

"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?"

मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचासंबंध.....?"

"ना~~~~ही!" पोरे ओरडायची.
---------------------------------

नामू परीट

कुठक्या तरी एका इंग्रजी चित्रपटाला मी आणि माझी पत्नी गेलो होतो. कुठल्याही मध्यमवर्गीयाच्या डरपोकपणाला साजेल असे वरच्या वर्गाचे तिकीट काढुन बसलो होतो. काळोखात काही वेळाने माझ्या मांडीवर कुणीतरी थापटल्याचा मला भास झाला. अंधारात मी चमकुन बाजुला पाहीले.

"पी. यल. साहेब, पान खानार?"

आवाज ओळखीचा वाटला. चित्रपटग्रुहातल्या अंधारात काही वेळाने आपल्याला दिसू लागते. शेजारी बुशशर्ट आणि पॅंट (अर्थात दुस-याची) घालून नामूराव बसले होते. मी निमुटपणे पान घेतले.

"तंबाकू देऊ?"

"नको ---थुकायची पंचाईत होते."

"खुर्चीखाली मारा पिचकारी." नामुचा सल्ला.

"चूप!" "शु~~~" समोरून कुणी तरी आवाज दिला.

"च्यायला--- डाकुमेंट्रीत काय बघायचं असतं? मेन पिक्चर इंटर्वल पडल्यावर सुरु होत."

काही वेळाने इंटर्वल झाला. नामुच्या शेजारी आमच्याच चित्रपटांतून काम करणारी, मध्यमवयाची एक्स्ट्रातंली बाई पदरविदर घेऊन मारे एखाद्या सरदारकन्येसारखी बसली होती. मला पाहील्यावर तिने मोठ्या थाटात नमस्कारही ठोकला.

"वैनी , आमची फ्यामिली!"

नामुचे आमच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. कोल्हापूरला एकदा त्याने आम्हाला सत्यनारायणाला बोलावले होते त्या वेळी हिने त्याची 'फ्यामिली' पाहीली होती.

"हो, कोल्हापुरला भेटलो होतो." आमची बायकोही नामूला नको त्या सभ्य पातळीवर आणीत म्हणाली.

"ती निराळी-- ही ष्टेपनी."

कुठेही संकोचाचा लवलेश स्पर्श नाही. मी आणि माझी पत्नी मात्र जागच्या जागी संकोचलो.

"नामू--" मी उगीच विषय बदलीत म्ह्टले, "इंग्लिश पिक्चरमध्ये काय समजतं रे तुला?"

"फुकट पास आहे !"

"ह्याही मॅनेजरचे कपडे तुच फाडतोस वाटतं?"

"नाही, डोरकीपरचे! साहेब, पण पिक्चर झकास आहे. लवशिन काय काय घातले आहेत. ट्रॉली निस्ती गार गार फिरवली आहे.

"माझ्या सुदैवाने अंधार झाला आणि पिक्चर सुरू झाला.


पहिल्या वीकलाच होल्डोर फिगरच्या खाली गेलं साहेब ! मिणर्वाच्या मॅनेजरचे कपडे आपल्याचकडे आहेत ना साहेब. त्यांणीच सांगितलं


"साहेब, काल अन्नासायबाला हातकड्या पडल्या !"


"कोण अण्णासाहेब..?"


"आपले नौयूगचे !"


"का ?" मी आश्चर्याने विचारले.


वास्तविक या 'अन्नाना' कधीतरी हा सोहळा भोगावा लागणार असा मला अंदाज होताच. पण तो मुहूर्त इतक्या लवकर धरला जाईल अशी कल्पना नव्हती. दुसऱ्या प्रोड्यूसरच्या मालकीचे रॉ स्टॉकच डबे चोरून विकणे, त्यांच्या जागी स्टोर मधे रिकामे डबे ठेवणे, कुणाचे काळे पैसे पांढरे करून देतो म्हणून सांगून देणाऱ्याचे डोळे पांढरे करणे, खोटे हिशोब मांडणे, एक्स्ट्रा लोकांचे पैसे हातोहात उडवणे वगैरे त्यांचे बरेचसे पराक्रम होते. -----------------------------------------

सखाराम गटणे

सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले. माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.

"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--"

"वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --"

"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.

आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला.त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो.

"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते."

"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?"

"केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"

मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे.तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसलीडोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांतछप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता.

"हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."

"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."

"कुणी?"

"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."

"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती. ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.
-----------------------------------------------

6 प्रतिक्रिया:

Hajaarekau said...

Great efforts man!!!!!!
This is such a nice compilation of PuLa's writings, I enjoyed it thoroughly.....Vachun Majja aali faar !!!!!!!

Anonymous said...

Simply great,I appreciate your efforts...!. Nice collection.
Thanks a lot...!

Unknown said...

Ek number!

sagle prasang khup chaan ekatra aanle aahet.
Mala Namu Parit purn vachayla aavdel. I hope kadhitari yach websitevar vachayla milel

Kumar Jawadekar said...

Great collection indeed! I also enjoyed the compilation
in the end.

manu said...

JIVNATALA PRATYEK KSHAN KITI RANGVUN SANGITALA AHE KHARACH KHUP AWADALI

Dhananjay said...

arre yar, wat to say...you are doing a great and painstaking job of transcription. I wish I had that kind of dedication ! If you need any help let me know. I'll be happy to contribute. You can contact me at dannykaye85@gmail.com
Thanks for the great work and keep em coming!!!