ते कसब तेथेच न थबकता, पुढे अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले. एकेकसुद्धा भान हरवील असा; 'किमु यत्र समुच्चयम्' ? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा - आणि 'जन- साधारण' भारून जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की 'पु.ल.' म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाहीं! अशी आपुलकी. ललाटी असणारा कलावंत एखादाच !
देशपांड्यानी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातऱ्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मन॒ष्य-स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात. चांगल्यावाइटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात. आत कोठेतरी 'वल्ली' दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्यावांइटाचे अंतर्नाट्य देशपांड्यांनी सराइतपणे पकडले आहे, कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्याआमच्यांत आहे आणि लेखकातही !
अशा या वीस व्यक्ती आणि वल्ली!
पुस्तक खालील चित्रावर क्लिक करून मागवू शकता.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment