Wednesday, August 15, 2007

केसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त

मैत्र
केसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त

केसरबाई केरकर ह्या नावाला भारतीय अभिजात संगीताच्या जगात काय अर्थ होता . हे सांगायला केसरबाईंच्या गानप्रतिभेच्याच उंचीची लेखनप्रतिमा हवी . संगीताच्या जगातला तो एक चमत्कार होता . म्हणावे , तर त्या जन्मजात प्रतिभेच्या जोडीला त्यांनी केलेल्या असामान्यत तपश्चर्येला गौणत्व येईल . बरे , नुसतीच जिवापाड मेहनत केली म्हणावे , तर त्यांच्या बुध्दि - मत्तेचा अनादर होईल . एक थोर गायनपरंपरा निष्ठेने उज्ज्वल करणाऱ्या होत्या म्हणावे तर त्यांच्यावर अंध गतानुगतिकेचा आरोप होईल , आणि त्या परंपरेची आणि अभिजात संगीताची निष्ठेने आणि डोळसपणाने उपासना करणाऱ्या इतर चांगल्या गायक - गायिकांचा अकारण उपमर्द केल्यासारखे होईल . शेवटी शब्दांच्या शक्तींच्या मर्यादा ध्यानात घेऊन एवढेच म्हणता येईल की केसरबाई आणि त्यांचे गाणे हे काय होते हे त्याच्यांसमोर मेफिलीत बसण्याचा ज्यांना योग आला त्यानांच माहीत . इथे गौरवाची रूढ विशेषणे पोकळ वाटायला लागतात .साडेतीन मिनिटांच्या तबकडीतून केसबाईच्या गाण्याचा अंदाज करणे हे जवळ जवळ चित्रातले फूल पाहून त्याच्या सुगधांचा अंदाज करण्यासारखे आहे . ते गाणे आणि त्या गायिकेचे दर्शन ह्यांतच एक विलक्षण अभेद होता . मेफिलीच्या स्थानी केसरबाईचे ते डौलदार - पणाने येणे म्हणजेच अर्धी मेफिल चजिंकून जाण्यासारखे असे . त्यांच्या गायकीचा भारदस्तपणा त्यांच्या वागण्यातून दिसे . केसबाईच्याविषयी बोलताना अनेकांना त्यांचे हे लोकविलक्षण` सम्राज्ञी ' पण जाणवल्याचे सतत आढळून येते . केसरबाई आणि त्यांचे गाणे सहजपणाने आणि चकाट्या पिटायच्या ओघात बोलायचा विषय नाही . कालिदास , भवभूती यांच्यासारख्यांच्या - विषयी शिळोप्याच्या गप्पांच्या वेळच्या सेलपणाने बोलता येत नाही . तेही कवी आणि नाटककारच . पण त्यांच्या निर्मितीतल्या गंभीरतेचा आपल्या मनावर असा काही संस्कार झालेला असतो की ते मनात शिरले तरी त्यांच्यात आणि आपल्यात आदरापोटी निर्माण

होणारे एक अंतर राहिलेले असते . केसरबाईच्या बाबतीतही तसेच होते . कलेच्या क्षेत्रातह` तपा ' चा म्हणून काही एक स्वतःचा अधिकार असतो . त्या तपाची साक्ष केसरबाईच्या पहिल्या षड्रजावरच्या ` आ ' कारातच पटायची . तेजःपुंज षड्रज . तंबोऱ्याच्या काही क्षणांच्या गुंजनानंतर पहिला षड्रज लागला की सारी मेफिल कुठल्यातरी अनिर्वाचनीय अनुभूतीचे दान आपल्या पदरी पडणार आहे ह्या अपेक्षेने आधीच कृतार्थ झालेली असायची .मध्यम उंची , गौरवर्ण , विलक्षण तेजस्वी डोळे , करारी जिवणी , ओठांच्या कडा पानाने किंचित अधिक आरक्त झालेल्या . कानांत हिऱ्याची कुडी , हातांत हिऱ्याच्या बांगड्या , बोटात हिऱ्यची आंगठी , गळ्यात फक्त एक मोत्यांची माळ , राजघराण्यातल्या स्त्रीसारखी उंची पण
शुभ्र किंवा मोतिया रंगाची साडी - डोकीवरून पदर घेतलेला , चालण्या - पाहण्यात त्या वेषाला साजेल असाच डौल , मेफिलितल्या एखाद्या परिचिताला ओळख दाखवलीच तर त्यातून मेहेरबानीच दिसावी अशा ढंगाची खानदाणी लकब - एकूण ` दबदबा ' हाच त्या साऱ्यातून साधला जाणारा परिणाम . हे दर्शन पुढल्या गाण्याच्या कोंदणासारखेच असायचे . ते गाणे
ऐकायला येणारा श्रोताही प्रत्यय तपःपूत कलाच देऊ शकते .माझे भाग्य मोठे म्हणून त्यांचे गाणे ऐकण्याचा आणि त्यांच्या पिरचयाचा योग लाभला .मला भास्करबुवा ऐकायला किंवा पाहायलाही मिळाले नाहीत . वझेबुवा त्यांच्या उत्तर वयात का होईना पण पाहायला मिळाले , ऐकायला मिळाले . मंजीखां आणि बूर्जीखां पाहायला आणि ऐकायला मिळाले . केसरबाई मात्र ऐकायला मिळाल्या , गप्पागोष्टी करायला मिळाल्या - मन मोकळे करून त्या माझ्याशी बोलल्या . त्यांचा पाहुणचारही लाभला . हे भाग्यच नाहीतर काय? इंग्लंडच्या महाराणीची आणि माझी ओळख होण्याची योग आहे असे जर एखाद्या ज्योतिषाने मला त्या काळी सांगितले असते तर त्याच्यावर मी विश्वास ठेवला असता एकादे वेळी ; पण केसबाई "" अरे खा रे पान . चुन्याने भाजली जीभ तर भाजू दे "" म्हणत मला पान जमवून देतील , त्यात भरपूर तंबाखू घालतील आणि "" मार पिचकारी त्या गॅलरीतून . . . कुणाच्या डोक्यावर पडणार नाही तेवढं बघ "" म्हणतील , हे साक्षात ब्रम्हदेवाने येऊन मला सांगितले असते तरी त्याच्यावर मी विश्वास ठेवला नसता . कसा ठेवणार ?
केसरबाईचे पहिले गाणे एका लग्नात ऐकले त्या वेळी मी बारा - तेरा वर्षांचा असेन . पण संगीत म्हणजे लेकुराच्या गोष्टी नव्हेत हे ठसवणारे त्यांचे बाह्यरूप आणि अंतर्दर्शन मनावर आनंदाच्या जोडीला एक भीतीचा ठसाही उमटवून गेले होते . हल्ली मी पाहतो , मेफिलीत येणारे कलावंत नम्रपणाने येतात , आदबीने येतात , शालीनतेने येतात . पुरूष कलावंतसुध्दा -विशेषतः तंतकार - अगदी ` बनठनके ' येतात . पण फेय्याझखां , थिरखवाखांसाहेब आणि गायिकांच्याच केसरबाई यांच्यासारखे नुसत्या येण्याने दबदबा निर्माण करणारे कलावंत क्वचित दिसतात . इथे नुसत्या देखणेपणाचा प्रश्न नाही ; एक प्रकारच्या डौलदार ` बेअरिंग ' चा आहे . दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वीची गायनप्रेमी मुंबई काय होती हे ज्याने पाहिले असेल त्यालाच त्या मुंबईत केसरबाईचे संगीतक्षेत्रात काय स्थान होते ते ठाऊक असेल . मेफिलीत
तलम धोतर , डगला , डबल घोडा सिल्कचा शर्ट , त्याच्या कॉलरच्या काजाशी एखादे हिऱ्याचे बटण , काळी किंवा वेलबुट्टीची टोपी , पायांत पंपशू - असल्या वेशभूषेलाच मान्यता असलेला तो काळ . शास्त्रीय संगीत लोकाभिमुख करायला हवे वगेरे घोषणा सुरू होण्याआधीचा . त्या वेळी संगीत लोकाभिमुख नव्हते . संगीताभिमुख लोक गायक - गायिकांच्या शोधात असायचे .त्या काळातले सर्वच गायक आणि गायिक श्रेष्ठ होत्या असे मुळीच नव्हते .प्रत्येक काळात त्या त्या क्षेत्रांतील शिखरे असतात . आजही आहेत . पण एकोणीसशे तीस सालापासून ते अडतीस - एकुणचाळीसपर्यंतची आठ वर्षे ही जुन्या मुंबईच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची शेवटची वर्षे .युध्द आले . मग रेशनिंग , काळाबाजार , भयानक संहार , अनेक उलथापालथी - केवळ मुंबईतच नव्हे तर साऱ्या जगातच एक प्रचंड सांस्कृतिक - राजकीय - आर्थिक परिवर्तन झाले . अठरा पगड मुंबई अठराशे पगड झाली . जुन्या मुंबईत डोक्यावरच्या पगडीवरून माणसाची जात सांगता येत असे . पगडीने डोक्याच्या वरच्याच नव्हे तर आतल्या भागाचाही ताबा घेतला होता . इंग्राजाच्या गुलामीमुळे हॅट आणि जातीच्या गुलामीमुळे पगडी . त्यातच ` खानदाना ' च्या कल्पना साठलेल्या होत्या . त्या फारशा शहाणपणाच्या होत्या असे नव्हे . पण ज्यांच्या गाण्याला जाण्यामुळे त्या खानदानीपणाला बाध न येता तो वाढतो अशा ज्या काही मोजक्याच
गायिका होत्या . त्यांत माझ्या लहानपणी केसरबाई अग्रगण्य होत्या . त्यापूर्वी अंजनीबाई मालपेकर यांना असाच मान होता .श्रीमंतांघरच्या लग्नांत ` केसबाईचे गाणे ' ही एक अट होती . वरमाईच्या रूबाबाला खाली पाहायला लागेल अशा थाटात केसरबाई गायला यायच्या . दिवसभर मांडवात व्याही -विहिणींनी काय मानपान करून घ्यायचे असतील ते घ्यावे ; रात्री एकदा केसरबाईचे गाणे सुरू झाले की त्या मांडवातील अनभिषिक्त राणी म्हणजे केसरबाई . लग्नाच्या मांडवातल्या आयाबायांना कळणारे ते गाणे नव्हते , किंबहुना जे मातबर यजमान ते गाणे ठरवीत त्यांनाही त्यात गम्य असेच असेही नाही . त्यांच्या आवडीचे गाणे निराळे असले तरी तसली फर्माइश

ह्या गायिकेला चालणार नाही याची त्यांना खात्री असे . आणि समोर बसलेल्यांच्या आवडी

निवडी ध्यानात घेऊन गाणे , हा प्रकार केसरबाईनी आयुष्यात कधी केली नाही . खानदा -

नाविषयक तत्कालीन कल्पनेचाच हा भाग . चिवडा आणि बनारसी शालू एका ठिकाणी विकत

घ्यायची सोय असणारी . डिपार्यमेटल स्टोअर्स त्या काळी निघाली नव्हती . चिवडेवाला आपले

खानदान सांभाळून आणि बनारसी शालूवाला आपले .



मी केसरबाईंना प्रथम पाहिले ते ग्रांट रोडजवळच्या मुझफराबाद हॉलमध्ये . अशाच एका

लग्नातल्या गाण्यात . श्रीमंत घरातले लग्नसमारंभ ह्या मुझफराबाद हॉलमध्ये होत .

हंड्या - झुंबरे - गालिचे - रूजामे असा नबाबी थाट तिथे असायचा . अंगणात ` पीकॉक ' किंवा

पोलीस ब्यांड ` इट्सस ए लॉग लॉग वे टु टिपरारी ' हे गाणे पहिले महायुध्द संपले तरी वाजवणारा .

असल्या त्या मुझफराबाद हॉलमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे केसरबाईच्या आयुष्याला किती विलक्षण

कलाटणी मिळाली होती ह्याची हकीकत त्यांनीच मला सांगितली होती .



एका विलक्षण योगामुळे केसरबाईच्याबरोबर रोज पाच - सहा तास असे दहा - बारा दिवस

दादरच्या शिवाजी पार्कजवळच्या त्यांच्या घरी मला घालवायला मिळाले . सात - एक वर्षांपूर्वीची

गोष्ट . शांतिनिकेतनातील श्री . शर्वरी रायचौधुरी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार संगीताचे

परमभक्त . अक्षरशः चार - पाचशे तासांचं ध्वनिमुद्रित संगीत त्यांच्या सग्रंही आहे . केसबाईशी

माझा परिचय आहे हे कळल्यावर ह्या माझ्या मित्राने माझ्या मागे टुमणे लावले : "" काहीही

करा आणि केसरबाईना मला सिटिंग द्यायला सांगा . मला त्यांचा अर्धपुतळा करायचा आहे . ""

हे म्हणजे धर्मसंकट . केसरबाईना ` तुम्ही अमुक एक करा ' असे सांगणेही असक्य कोटीतली

गोष्ट .



पान नं . 4

मेफिलीत फोटोग्राफर आला तर त्याला गावाबाहेर घालवा म्हणायला कमी न करणाऱ्या

माईना तुम्ही माझ्या शिल्पकार मित्रासाठी ` पुतळ्यासाठी रोज पोज देऊन बसा ' म्हणायचे

म्हणजे माझ्या धेर्याची कसोटीच होती . पण त्यापूर्वी अशाच स्वरूपाच्या धाडसी कृत्यांत माझा

वाटा होता . हिराबाई बडोदेकरांची पार्ल्याला म्युझिक सर्कलतर्फे टिळक मंदिराच्या पटांगणात

एकसष्टी साजरी करायची ठरली असताना केसरबाईना अध्यक्ष करायचे ठरवले होते . त्याच्या

बंगल्याचे तीन मजले चढून जाताना रामरक्षा पाठ नसल्याचे मला दुःख झाले होते आणि

केसबाईनी मात्र आश्चर्याचा धक्काच दिला होता .



"" अरे , मी चंपूला धीर देऊन कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये गायला लावली होती . भयंकर

भित्री होती . मी समारंभाला येते . पण ती भाषणंबिषणं तू कर . तो फाजीलपणा तुला चांगला

जमतो . मी नुसती येईन . चंपूच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देईन . ""



डोळे दिपवून टाकणाऱ्या त्या तेजस्वी पण टणक हिऱ्याच्या आत असला , ज्याला कोकणीत

` मायेस्तपणा ' म्हणतात तो त्या दिवशी मला दिसला . साठी उलटलेल्या हिराबाई बडोदेकर

केसरबाईच्या लेखी . कॉन्फरन्सेस मध्ये आणि राजेरजवाड्यांच्या घरच्या आणि

दरबारच्या उत्सवप्रसंगी केसरबाई , हिराबाई आणि फेय्याझखासाहेब असा संगीताचा त्रिवेणी

संगम झालाच पाहिजे अशी परिस्थिती होती . हिराबाईच्या सत्काराला केसरबाई आल्या .

त्यांच्या हस्ते हिराबाईना वाढदिवसाची भेट दिली . हजारो लोकांपुढे हिराबाईनी माईच्या

पायांवर आपले मस्तक ठेवले आणि माईनी चंपूला पोटाशी घट्ट धरून मिठी मारली .

मेफिलीतल्या मंचावर स्वतःचा आब एवढासासुध्दा बिघडू न देणाऱ्या केसरबाईचे ते दर्शन .

एका सर्वस्वी निराळ्या घराण्याची गायकी गाणाऱ्या हिराबाईंविषयी वाटणारी आपुलकी त्या

मिठीतून जशी सिध्द झाली तशी हजार शब्दांनी व्यक्त झाली नसती . इतके प्रभावी अध्यक्षीय

मूक वक्तव्य त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही मी ऐकले नाही . भारतीय संगीतातल्या

गंगायमुनांचा संगम पाहिला असेच सर्वांना वाटले .



मुंबई विद्यापीठाच्या संगीत - विभागाचे उद््घाटन त्यांच्याच हस्ते झाले . म्हणजे

अक्षरशः हस्ते . पुन्ही एकदा केसरबाईना विनंती करण्याचे काम माझ्याकडे आले . रीतसर मी

त्यांचे रागावणे सहन केले . "" मी भाषण करणार नाही , सांगून ठेवते . "" ही अट मान्य केली .

उद््घाटनाच्या दिवशी रंगमंचावर फक्त एक तंबोरा जुळवून ठेवला होता . "" आता सुरश्री

केसरबाईनी ह्या संगीतविभागाचे उद््घाटन हा तंबोरा छेडून करावे , "" अशी मी त्यांनी विनंती

केली . माई खूप थकल्या होत्या , तरीही वेशभूषेत आणि रूबाबात कुठे उणेपणा नव्हता .

तंबोऱ्याच्या दिशेला मी त्यांना घेऊन जाता जाता मला विचारतात , "" अरे , तो तंबोरा नीट

सुरात लावलाय ना रे बाबा ? "" कुणीतरी आपल्या मगदुराप्रमाणे तो लावला होता . त्यांनी तारा

छेडल्या आणि माझ्याकडे असे पाहिले की ` धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं , ' असे

मला वाटायला लागले . लोकांनी वाजवलेल्या टाळ्यांचा कडकडाटात तो तंबोरा कुणाला ऐकू

आला नाही हे नशीब . त्यानंतर खूप दिवसांनी एकदा भेटल्यावर मला म्हणतात , "" अरे , तुझ्या

त्या युनवर्शिट तंबोरा लागायला लागला की अजून तसाच ? ""



अध्यक्षपदाचे वगेरे ठीक होते , पण ` पुतळ्याला पोज देता का ? ' हे कसे विचारायचे ? त्यांचा

मेफिलीतला दरारा इतक्या परिचयानंतरसुध्दा कायम होता . लक्ष्मीबागेतल्या त्या मेफिली



पान नं . 5

मुंबईतले छगलांसारखे बॅरिस्टर , नामवंत सॉलिटर्स , निष्णात डॉक्टर्स , सर्जन्स धनिक

भाटिये , नाना घराण्यांतले उस्ताद , त्यांचे शागीर्द , केसरबाईंचे मराठी , गुजराती , पारसी भक्त

त्यांतच विरोधी भक्ती करणारे काही लोक , गाण्यातील जागान््जाग टिपणारे निर्मळ मनाचे

रसिक श्रोते . . . आणि भटवाडीतल्या लक्ष्मीबागेतल्या हॉलपुढल्या फुटपाथवर मांडी गालून

बसणारे आमच्यासारखे , मुंबईच्या भाषेत , ` कडका कंपनी ' तले लक्ष्मीचे सावत्र पुत्र .



आतल्या बेठकीतला दरारा बाहेरच्या फुटपाथवरच्या गर्दीपर्यंत पसरलेला . कुठे हूं नाही की

चूं नाही . दादसुध्दा जायची ती महाराणींना नजराणा पेश केल्यासारखी . अनवट राग सुरू

झाला की जाणत्यांच्या दिशेने अजाणत्यांच्या भिवया प्रश्नार्थक होईन उंचावलेल्या . बाईना

रागाचे नाव विचारायची हिंमत मुंबईच्या गोऱ्या पोलिस - कमिशनरालासुध्दा नव्हती . फालतू ,

उडाणटप्पू दादीला तिथे स्थान नव्हते . एक तर ते ` आहाउहू ' करायला लावणारे गाणेच नव्हते .

धारापुरीतल्या त्रिमूतीपुढे उबे राहिल्यावर मनाची जी भावना होते तशी त्या गायकीला कान

आणि मन देऊन बसल्यावर अवस्था होत असे . बाई कुणाची भीडमुवर्त बाळगणाऱ्या नव्हत्या ,

ते केवळ स्वभाववेशिष्ट्यामुळे नव्हे . हा दबदबा त्या गायकीचाच होता . तशा त्या विलक्षण

हजरजबाबीही होत्या . गोव्यातल्या मत्स्य - संस्कृतीमुळे काटे काढणे उत्तम जमायचे . मेफिलीत

कुणी आलतूफालतूपणा किंवा गेरसलगी दाखवली तर तिथल्या तिथे काटा काढीत .

उतारवयातल्या त्यांच्या एका मेफिलीत त्यांच्याच वयाच्या पण किंचित आगाऊ श्रोत्याने त्यांना

ठुमरी गाण्याची फर्माइश केली . खास मुंबई वळणाच्या गुजरातीत त्या गृहस्थांना त्या म्हणाल्या ,

"" शेटजी , ठुमरी ऐकायचं तुमचं वय निघून गेलं आणि ठुमरी गायचं माझं वय निघून गेलं .

आता भजनं ऐका . "" नाशिकला झालेल्या एका मेफिलीत मी त्यांची बनारसी ढंगाची अप्रतिम

ठुमरी ऐकलेली आहे . पण ठुमरीची फर्माइश ? अब्रम्हण्यम्् !



आता अशा ह्या माईंना ` पुतळ्यासाठी पोज देऊन बसा ' हे सांगायचे कसे ? पण त्यांचा

पुतळा व्हावा आणि कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये किशोरवयापासून त्यांचे गाणे ऐकून त्या

गायनातल्या शिल्पाचे वेड्या झालेल्या शर्वरीबाबूंच्याच हातांनी ती मूर्ती घडावी असे मलाही

वाटत होते . त्यात केसरबाईंचे वय झालेले . मधुमेह , रक्तदाब यांसारख्या वार्धक्यातल्या शत्रूंनी

शरीरावर हल्ले सुरू केलेले . हे भारतीय संगीताच्या सोन्याच्या पिंपळावरचे पान केव्हा गळून

पडेल याचा नंम नव्हता . मी हिय्या केला .



"" माई , तुमच्याकडे एक काम आहे . ""



"" अध्यक्षबिध्यक्षाचं काय काढलं असशील तर चहा घे , पान खा आणि घरी जा . ""



"" तसंल काही नाही . शांतिनिकेतनात माझा एक शिल्पकार मित्र राहतो . त्याचं काम

आहे . ""



शांतिनिकेतन म्हटल्यावर ते वृध्द डोळे चमकले . "" ते बघ , "" भिंतीवरच्या तसबिरीकडे बोट

दाखवित त्या म्हणाल्या . रवींद्रनाथ टागोरांच्या हस्ताक्षराताला तो मजकूर होता .

"" रवीन्द्रमाथांसाठी माझं गाणं ऐकून काय लिहिलंय ते वाच . ""



रवींद्रनाथांसाठी 1938 सालच्या एप्रिल महिन्यात केसबाई गायल्या होत्या . गुरूदेव त्या

वेळी सत्याहत्तर वर्षांचे . माई पंचेचाळीस वर्षांच्या . ते गाणे ऐकून रवींद्रनाथांनी लिहिले होते :

"" हे गाणे म्हणजे अप्रतिम परिपूर्णतेचा एक कलात्मक चमत्कार आहे . केसरबाईंचे गाणे

ऐकण्याची संधी मला साधता आली हे मी माझे भाग्य समजतो . त्यांच्या आवाजातली जादू ,



पान नं . 6

विविध प्रकारच्या ( मॉड्यूलेशन्स ) संगीतातली वेशिष्ट्ये दाखवणे , आणि तेही

केवळ तंत्राला शरण जाऊन नव्हे किंवा यांत्रिक अचूकपणाने किंवा पढिकतेच्या प्रदर्शनाने

नव्हे , संगीतातला हा चमत्कार प्रकट करणे जन्मजात प्रज्ञावंतांनाच ( जिनियस ) शक्य असते

हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिध्द करून दाखवले आहे . आज संध्याकाळी ह्या अनमोल अनुभूतीची

संधी मला दिल्याबद्दल केसबाईंना माझे धन्यवाद आणि आशीर्वाद . "" ` सूरश्री ' ही पदवी

त्यांना रवींद्रनाथांकडूनच मिळाली होती .



ज्याचे सारे व्यक्तिमत्व सुरांनी भरलेले असा महाकवी श्रोता आणि तपःपूत सुरांनी

अंतर्बाह्य प्रज्वलित झालेली अशी ही महान कलावती गायिका . प्राचीन काळातील पुराणकार

म्हणाले असते की , त्या समयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली .



"" अरे , चित्रासारखे बसून गाणं ऐकत होते . "" माई म्हणाल्या .



रवींद्रनाथांच्याच अदृश्य बोटाला धरून मी पुतळ्याचा विषय काढला .



"" माझा म्हातीरचा पुतळा ? तुला चेष्टा करायला सापडले नाय आज कोण ? ""

मनाने मोकळ्या झाल्या की माई कोकणीतून बोलायच्या . ` बटाट्याटी चाळ , ' ` वाऱ्यावरची

वरात ' वगेरे माझ्या लीला त्यांनी पाहिलेल्या असल्यामिळे त्यांच्या लेखी ` वात्रटपणा ' हाच माझा

स्थायिभाव होता .



"" चेष्टा नाही माई . तुम्ही एकदा संधी द्या माझ्या मित्राला . तुमचा परमभक्त आहे .

युरोप - अमेरिकेत नाव झालेले शिल्पकार आहे . स्वभावाने लहान मुलासारखा आहे . ""



"" काय नाव म्हणालास ? ""

"" शर्वरी . ""

"" हे कसलं नाव मुलीसारखं ? ""

"" आता ते नाव काय मी ठेवलं . ? पण अश्राप माणूस - आणि उत्तम आर्टिस्ट . मग ? ""

"" अरे मला फार वेळ बसवत नाय रे . ""

"" तुमच्या तब्येतीला सांभाळून बसू या . ""

"" पण माझी अट आहे सांगते . तो पुतळा होईपर्यंत तू रोज येऊन बसायला हवं ""

"" मी काय करू बसून ? ""

"" बस माझ्याकडे गप्पा मारत . त्या बंगल्याशी मी काय बोलणार ?

"" त्याला हिंदी येतं . ""

"" येऊ दे . ""

"" ठीक आहे . पण एका अटीवर . तुमच्याकडे तुमच्या गाण्यांच्या तुम्ही टेप्स करून घेतल्या

आहेत , त्या तुम्ही ऐकवल्या पाहिजेत . ""

"" ऐकवीन . ""

माझ्या कुंडलीतले सारे शुभग्रह त्या क्षणी केसरबाईंच्या ` पराग ' बंगल्यातल्या त्यांच्या त्या

तिसऱ्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात एकत्र जमलेले असावेत .



मी शर्वरीला तार ठोकली . तो बिचारा तिथूनच पुतळ्याला लागणारी कसलीशी ती पोतेभर

माती मळूनच घेऊन आला . त्याला घेऊन मी माईच्या घरी गेलो . शर्वरीने त्यांच्या पायाशी

लोटांगण घातले . आणि त्यानंतरचे दहाबारा दिवस ही एक पर्वणी होती . इकडे शर्वरीची बोटे

मातीतून केसबाईंची प्रतिमा आकाराला आणीत होती आणि माई आयुष्यातल्या असंख्य



पान नं . 7

आठवणी सांगत होत्या . काही सुखाच्या , काही दुःखाच्या . मधूनच फळणीकर डॉक्टर यायचे .

एवढे नामवंत भिषग्वर्य . धिप्पाड देहामनाचे . पण माईपुढे लहान होऊन वागत . माई त्यांना

एकदा म्हणाल्या , "" डॉक्टर , अहो , थोड्या दिवसांसाठी तरी मला एकदा बरी करा . एकदा

गाऊनच दाखवते . "" माईवर परमभक्ती असणाऱ्या फळणीकर डॉक्टरांना अश्रू लपवावे

लागायचे .



खुर्चीवर अधूनमधून स्वस्थ बसायच्या . शर्वरी आपल्या कामात दंग . मी त्या वार्धक्यातही

तो अंगभूत डौल न गमावलेल्या पण आजाराने जर्जर होत चाललेल्या माईकडे पाहत बसलेलो

असताना मनात विचार यायचा ; ह्या बाहेरून थकलेल्या देहाच्या रंध्रारंध्रात कसा एक अनाहत

तंबोरा वाजत असेल . मनातल्या मनात किती रागांची , किती बंदिशींची , किती सुरावटींची

किती तांनाची , बेहेलाव्यांची भेट घडत असेल . सूर असे मनात दाटलेले असताना वार्धक्यामुळे

ते बाहेर फुटणे बंद व्हावे . - कसल्या यातना ह्या . ! त्या सुरांसारख्याच असंख्य मेफिलींच्या

आठवणी .



अशाच आठवणी सांगताना त्यांनी मला सहज विचारले , "" तू माझं गाणं पहिल्यांदा कुठे

ऐकलंस ? मी काय कधी गणपतिउत्सवात नाय गायले . "" आमची मुख्य श्रवणसाधना कुठे

झाली त्याचा माईना बरोबर पत्ता कोणी दिला देव जाणे .



"" मुझफराबाद हॉलात . एका लग्नात . ""

"" मुंबेकर शेणव्याचं लग्न असणार . त्या हालची तुला काय गोष्ट सांगू , "" म्हणत त्यांनी

गोष्ट सांगितली . माई गोष्ट सांगायला लागल्या की शर्वरी त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाह्यचा .

त्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून म्हणायचा ,

"" पुलदा , की शुंदर , की शुंदर ! ""

"" ह्या वेड्याला माझ्या चेहऱ्यात सुंदर काय दिसतं रे - तो फोटो पहा . "" माईंच्या

तरूणपणीचा एक फोटो तिथे भिंतीवर होता . "" ए , तसला पुतळा कर . म्हातारी करशील तर

याद राख . "" पुतळ्यासाठी पोज द्यायला बसतानासुध्दा मेफिलीचा थाट करून बसायच्या .

"" चालवून घ्या . भागवून घ्या . "" ही भाषा मेफिलीतच नव्हे तर रोजच्या दिनचर्येतही चालू शकत

नव्हती .

"" ती मुझफराबाद हॉलची गोष्ट सांगा ना , "" मी म्हटले .



माई तरूण होत्या त्या काळची ही गोष्ट . वझेबुवा , बर्कतुल्ला - कदाचित भास्कर -

बुवांचीही - तालीम मिळाली होती . ही मुलगी पुढेमागे निश्चित नाव काढील असा लौकिक

होऊ लागला होता . ह्याच सुमाराला मुझफराबाद हॉलमध्ये या काळातल्या एका प्रख्यात

गायिकेचे गाणे होते . ते गाणे खाजगी होते . ते ऐकायला केसरबाई गेल्या असताना कुणीतरी

सुरूवातीला त्यांनी गावे म्हणून आग्रह केला . केसरबाईंनी नम्रपणाने सांगितले की एवढ्या

मोठ्या गायिकेच्या मेफिलीत मला गायला लावू नका . मी मूल आहे तिच्यापुढे . शेवटी खूप

आग्रह झाला . आणि सुरूवातीला केसरबाई गायल्या . तरूण वय , समोर ऐकणारी मंडळी

मातबर , त्यात ती गायिका , तिचे चाहते . . . मनावर विलक्षण दडपण आलेले . तरीही "" मला

त्या काळात जे येत होतं ते गायले . लोकांनीही कौतुक केलं . माझ्यामागून त्या बाईचं गाणं .

मी उठल्यावर सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने त्या बाई म्हणाल्या , ` थोडा वेळ थांबा

इथे लागलेले सगळे बे - सूर हॉलच्या बाहेर जाऊ द्या . मग मी गाते . ' ""



पान नं . 8

केसरबाईंनी ती रात्र रडून काढली . आणि त्या दिवशी ठरवले की ` एक दिवस अशी गाईन

की ती बाई झाली होती की नाही याची कुणाला आठवण राहणार नाही . ' अल्लादियाखांसाहेब

हे त्या काळी संगीताच्या दुनियेतील प्रातःस्मरणीय नाव होते . भास्करबुवांसारखे प्रतिभासंपन्न

गायक त्यांच्यापुढे नतमस्तक होत . खांसाहेब त्या काळी छत्रपती श्रीशाहूमहाराजांच्या

दरबारात कोल्हापूला . त्यांना मुंबईला येऊन राहणे शक्य नव्हते . पण शिकेन तर

अल्लादियाखांसाहेबांपाशीच अशी जिद्द धरून केसरबाई बसल्या . आपल्या प्रथम पत्नीच्याच

मानाने केसरबाईंना वागवणाऱ्या गोपाळदासांनीही त्यांच्या ह्या प्रतिज्ञेमागली जिद्द ओळखली .

मनात सापत्नभाव न बाळगता , कालिदासाच्या शब्दांत , ` प्रियसखी वृत्ती ' ने वागणाऱ्या गोपाळ -

दासांच्या पत्नीनेही साथ दिली . केसरबाईंनी कोल्हापूरच्या छत्रपती श्रीशाहूमहाराजांचे बंधू

कागलकरसरकार यांची भेट घेतली . कागलकरसरकार गाण्याचे खूप चाहते . त्यांनी त्या तरूण

गायिकेला शाहूमहाराजांच्या पायांवर घातले . धिप्पाड मनाचा तो राजा म्हणाला , "" तुला काय

हवं आहे ते सांग . ""



"" मला तुमच्या दरबाराचे गायक अल्लादियाखांसाहेब गुरू म्हणून हवे आहेत . ""



महाराजांनी ` तथास्तु ' म्हणून अल्लादियाखांसाहेबांना केसरबाईंना गाणे शिकवायला

मुंबईत जाऊन राहण्याची परवानगी दिली . दरबारी नोकरीचा अडसर काढून टाकला .

मूळच्या हिऱ्याला असे पेलू पाडलेल्या स्वरूपात भारतीय संगीताच्या दुनियेला केसरबाई लाभल्या ,

त्यामागे उत्तमम गुणांची तितकीच उत्तम पारख असलेल्या छत्रपती शाहूमहाराजांचा

वरदहस्त होता .



आणि इथून पुढे , केसरबाईच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे , "" माझा वनवास सुरू झाला .

पदरी तान्ही मुलगी , गळ्यात पूर्वीच्या गायनाचे संस्कार , मुळातला आवाज बारीक . पहिले

आठनऊ महिने नुसता आवाज खोलायची मेहनत . अरे , घसा फुटायचा . तरीही मेहनत

थांबता कामा नये . बरं , खांसाहेबांना मुंबईची हवा मानवली नाही की सांगलीला जाऊन

राहायचं . तिथल्या सांभारे वेद्यांवर त्यांची श्रध्दा होती . मग मुलीला घेऊन मी सांगलीला

बिऱ्हाड करायची . हाताखाली मदतीला कोण असलं तर असायचं , नसलं तर नसायचं . हवा

मानवायची नाही . तरीही तालमीत खंड नाही . ""



एक तर ह्या अत्रौली घराण्याचा गायकीचा आवाकाच मोठा . ह्या गायकीच्या वाटेला

जाणाऱ्यांनी दहा वेळा विचार करावा . छातीचा भाता लोहाराच्या भात्यासारखा हवा . पुरे

आवर्तन - तेही संथ लयीचेच - ते न तुटलेल्या सुरांनी भरत भरत समेवर यायचे . तेही धापा

टाकत नव्हे . निघताना ज्या उत्साहाने निघायचे त्याच उत्साहाने परतीचा मुक्काम गाठायचा .

इथे कुसरीला किंवा कल्पनेच्या वावड्या उडवायला वावच नाही . स्वरलीलेची प्रत्येक क्रिया

शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासून - तपासून घेतलेली . नसता लाडिकपणा केली की ते विजोडच

दिसायचे . असली ही गायकी आणि ती शिकवणारा महान पण असमाधानी गुरू . नुसता

शिकवणीचा रतीब घालणारा नव्हे . स्वतः मेहनतीचे पहाड फोडलेला . ध्रुपदगायकीची सुंदर

वेशिष्ट्ये ख्यालात खलून ख्यालगायकीचे नवीन रयायन करणारा तोही महान कलावंत .

चक्रव्यूह मांडल्यासारखे ते भारतीय संगीतातल्याचक्राकार गतीचे सतत भान ठेवून चालणारे

गाणे . आलाप असो वा तान , गतीची पध्दत चक्राकार . सुरांची जाडी गिरणीतल्या सुताच्या

नंबरासारखी . ज्या नंबराचे माप घेऊन निघायचे तो तिन्ही सप्तकांत कसा कायम ठेवावा



पान नं . 9

लागायचा ते केसरबाईंच्या गाण्यातून दिसायचे . मऊपणातही कुठे पोकळ फुसकेपणाला वाव

नाही . गाण्यात कुठे फोफसेपणा नाही की किरटे चिरचिरेपण नाही . आक्रमकतेच्या नावाखाली

आक्रस्ताळेपणा नाही की थिल्लर विभ्रम नाही . लयकारीच्या नावाखाली हापटाहापटी नाही .

लयकारीतले धक्केसुध्दा कसे लाटांच्या हेलकाव्यांसारखे , टक्करल्यासारखे नव्हते . आणि सारे

काही आखीवरेखीव असूनही अभिजाततेचल्या त्या चिरंतन ताजेपणाने दीप्तिमान , ग्रीक

शिल्पासारखे . - ही सारी वेशिष्ट्ये आत्मसात करण्याची केसरबाईंची साधना किती कठोर

असेल याची क्लपनाही करणे कठीण आहे .



कित्येकदा वाटते की , तरूण केसरबाईंचा अपमान करणाऱ्या त्या गायिकेचे उपकार मानले

पाहिजेत . हे सारे कष्ट त्या अपमानाच्या वेदनेपेक्षा हलके असावेत . पण नाही , हे अर्धसत्य

झाले . केसबाई त्या गायकीत संपूर्णपणाने रमल्या होत्या . केवळ कुणाला तरी पराभूत

करण्याची जिद्द एवढेच प्रयोजन आता उरले नव्हते . ती गायकी गाणे म्हणजेच जगणे असा

त्यांच्या जीवनाचा अर्थ झाला होता . किंबहुना त्याच ते गाणे होऊन गेल्या होत्या . त्या गाण्यात

उदात्ताविषयीची जी ओढ होती , क्षुद्र तडजोडींचा जो तिटकारा होता तोही त्यांच्या स्वभावाशी

जुळून आला होता . हा अहंकार नव्हे . जी गायकी त्यांनी शिकायला घेतली , जी आत्मसात

करण्यासाठी जीव मारून मेहनत केली , तिची महात्मता त्यांना पटली होती . ती पटल्यावर

` ब्रम्हज्ञान नव्हे लेकुरांच्या गोष्टी ' म्हणणाऱ्या तुकारामात जसा आपल्याला अहंकार दिसत

नाही तसा त्यांच्यातही दिसणार नाही . हे आत्मविश्वासाचे वागणे . आपल्या जीवनहेतूपुढे इतर

साऱ्या गोष्टींना गौण मानणाऱ्या उत्तम कलावंतालाच जी लाभते अशी एक विलक्षण निर्भयता

त्यांनी लाभली होती .



राजेरजवाड्यांच्या मिजाशी सांभाळण्याच्या काळात त्यांची गायनाची कारकीर्द चालली

होती . पण केसरबाईंना ` अमुक गा ' म्हणून फर्माइश करण्याची तत्कालीन संस्थानिकांची हिंमत

नव्हती . कुणालाही नुसतेच खूष करण्यासाठी त्या गायल्या नाहीत . त्यांचे कलावंत म्हणून जे

मोठेपण आहे ते गायनाचा व्यवसाय असूनही ` गिऱ्हाइकांचा संतोष हेच आमचे समाधान ' हे

सूत्र न मानण्यात . मनाला जे मान्य असेल तेच गाईन ही त्यांची प्रतिज्ञा . मान्यतेचा त्याखेरीज

स्वीकारलेला एकमेव शिक्का म्हणजे आपले गुरू अल्लादियाखांसाहेब यांचा .



मी एकदा त्यांना सहज म्हणालो , "" माई , तुम्ही अमुक अमुक राग गाताना मी कधी ऐकला

नाही . ""



असेच आणखी एकदा म्हणालो , "" तुमच्या काळात नाटकांतली गाणी इतकी पॉप्युलर

होती . तुम्ही का नाही कधी गायलात ? ""



नाटकांतली पदं नाटकांत म्हणायची . त्यांचे ख्याल कशाला करायला हवेत ? एक काय

ते नक्की ठरवा . ""



त्यांची सगळीच मते मला पटायची नाहीत . पण ती मते अशा मजेत सांगायच्या की

त्यांतल्या अचूकपणापेक्षा त्या सांगण्याचीच मजा अधिक वाटायची . एक गोष्ट खरी ; ` गाणे '

ह्याखेरीज त्यांना दुसरा कसालाही ध्यास नव्हता . घराण्याविषयी माझी मते निराळी असायची .

मग त्या माझी हजेरी घेतल्याच्या सुरात बोलत असत .



एकदा अशाच त्या ` पोज ' घेऊन बसल्या होत्या . त्यांच्या गाण्याची टेप चालू होती .



पान नं . 10

शांतपणे आम्ही ऐकत होतो . गाणे संपले . "" आणखी खूप गाणं टेप करून ठेवायची इच्छा

होती . राहून गेलं . ""



काही वेळाने माझ्या पत्नीने विचारले , "" माई , हा राग कुठला हो ? ""



"" तुझ्या नवऱ्याला विचार . तो स्वतःला गाण्यातला शहाणा समजतो ना ? ""



वास्तविक मी स्वतःला गाण्यातला शहाणा वगेरे काही समजत नाही . अनवट रागांशी मी

कधी लगट केली नाही . चांदनी केदार , जलधर केदार , मलुहा केदार , - ह्यांच्याखात्यांवर

कुठले सूर मांडले आहेत आणि कुठले खोडले आहेत यांचे हिशेब मी तपासले नाहीत .

एखादा राग सुरू झाल्यावर त्याचे नाव मला नाही कळले तरी त्याच्या आस्वादात काही फरक

पडत नाही . मात्र त्या रागाचे चलन ध्यानात आल्यावर त्या लायनीवरून गवई कसा चालतो

हे मी बारकाईने पाहतो . तो आनंद घेताना त्या रागाचे नाव कळले नाही तर दातात सुपारी

अडकल्यासारखा काही लोकांना त्रास होतो , तसा मला होत नाही . तरीही केसबाईंनी मला

छेडल्यावर मी म्हणालो , "" भूपनाट का ? ""

"" ही याची अक्कल . ह्याला भूपनाट आणि शुध्दनाटातला फरककळेनासा झालाय . ""

"" हल्ली मला भूप आणि शुध्द कल्याणातलासुध्दा फरक कळेनासा झालाय . ""

"" ऐकून ऐकून गाणं शिका , म्हणजे असंच होणार . ""

"" पण तुम्ही तरी मेफिलीत रागांची नावं सांगितलीत कधी ? ""

"" अरे , हा शुध्दनाट . ऐक . . . "" म्हणून शरीराच्या तसल्या त्या अवस्थेत त्यांनी शुध्दनाट

आणि भूपनाट ह्यांच्यातला फरक समाजवून देण्यासाठी ` आ ' कार लावला . पुन्हा एकदा त्याच

जुन्या तेजाने तळपणारा . तीनचारच मिनिटे गायल्या असतील . पण ते गुणगुणणे नव्हते .

अनमोल जडजवाहिर दाखवणारा जवहिऱ्या ज्या दक्षतेने पेटी उघडून जवाहीर दाखवतो ,

अत्यंत काळजीपूर्वक हाताळतो आणि तितक्याच दक्षतेने ती मिटून ठेवतो तसे त्यांनी ते दोन

राग उघडून दाखवले , पुन्हा मिटून घेतले . या क्षणी माझी पुन्हा पाटी कोरीच आहे ; आटवतात

ती तीनचार झगमगीत मिनिटे .

"" स्वर लावताना आता चक्कर येते रे मला . ""

त्यावरून मी सहज त्यांना कुठल्या पट्टीत गात असत हे विचारले .

"" पट्टी ? तुला पेटीवाल्याला काळजी , मला नाही . तीन सप्तकांत सहज जाईल ती षड्रजाची

पट्टी . ""



असल्या सहज चालणाऱ्या गप्पांतून त्यांची संगीताविषयीची मते कळायची . अभिजात

संगीताच्या सहजसाध्येवर , सुलभीकरणावर त्यांची अजिबात श्रध्दा नव्हती . विद्यालये -

बिद्यालये सब झूट . गाणारा जाऊ दे , ऐकणाऱ्यालाही ह्या कलांचा आस्वाद , जाता जाता ,

सहजपणाने घेता येईल हे त्यांना मान्य नव्हते . निदिध्यासाचा , नित्य अभ्यासाचा , चांगल्या

गुरूकडून कठोरपणाने होणाऱ्या चिकित्सेचा ज्ञानमार्गच त्यांना मान्य होता . एक ज्ञानी गुरू

आणि ` रियाझाचे घंटे ' किती झाले ते न मोजणारे दोन किंवा तीन गुणी हुशार शिष्य एवढेच

गाण्याचे शिक्षण असेच झाले पाहिजे . त्यांच्या बोलण्यात ` बुध्दी पाहिजे ' हे बऱ्याच वेळा आलेले

मी ऐकले होते . मेफिलीत उडत उडत कानी येणाऱ्या चिजा ऐकून गाणाऱ्यांचा त्यांना तिटकारा

होता . परंपरेच्या आग्रहामागे कलावंताने आपल्या मनाला लावून घेण्याचा शिस्तीचा आग्रह

होता . आणि शिस्त कुठली आणि आंधळे अनुकरण कुठले ह्यांतला फरक कळण्याइतकी तीक्ष्ण



पान नं . 11

बुध्दी त्यांना होती . त्यांच्यापूर्वीच्या पंरतु एका निराळ्या घराण्याच्या प्रख्यात गायिकेच्या

गाण्याविषयी मत देताना म्हणाल्या , "" तिचा आवाज मोकळा होता , सुरीली होती , पण

ख्यालाचे पाढे म्हणत होती . "" उगीचच सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणून ` आपपल्या जागी

सगळेच चांगले ' वगेरे गुळगुळीत बोलणे नसे . अप्रियतेची त्यांना खंत नव्हती . त्यांच्या मतांमुळे

त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात कटुता उत्पन्न व्हायची . पण त्यांच्या विलक्षण दृष्टीचा प्रत्यय

यायचा . गुण सांगताना पटकन वेगुण्याकडेही लक्ष वेधायच्या . "" बडे गुलामअली चांगला

गायचा . मूळचा सारंगिया . असेना का , पण गवई झाला . ""



अजिबात दोष न काढता जर पेकींच्या पेकी मार्क कुणाला त्यांनी दिले असतील तर ते

भास्करबुवा बखल्यांना . थोरले खांसाहेब तालीम द्यायला येताना कधीकधी भास्करबुवांना

सोबत घेऊन यायचे . एखादी पेचदार तान कशी निघाली पाहिजे ते बुवांकडून गाऊन घेऊन

दाखवायचे . मी विचारले , "" माई , भास्करबुवांचं मोठेपण कशात होतं , असं तुम्हांला वायतं ? ""



"" अरे , काय सांगू तुला ? भास्करबुवा त्यांचं जे गाणं होतं तेच गायचे , पण मेफलीतल्या

प्रत्येकाला वाटायचं की बुवा फक्त माझ्यासाठी गातायत . असा आपलेपणा वाटायला लावणारा

गवई पाहायला मिळणार नाही . . . मोठा माणूस , मोठा माणूस . . . . ""



माईंचे ते ` फेड आउट ' होत गेल्यासारखे मोठा माणूस . . . मोठा माणूस ' हे श्बद आजही

माझ्या कानांत आहेत . केसरबाईंची मान आदराने लवली नाही असे नाही , पण ` साहेबी

पाहोनि न्मस्कारानें ' ह्या समर्थवचनाला अनुसरून लवली . ` साहेबी ' म्हणजे देवत्व .



एकदा गुरूमुखातून मिळणाऱ्या विद्येबद्दल बोलत होतो . मी म्हणालो , "" आता टेपरेकॉर्डर

निघाले आहेत . टेपवर , समजा , अस्ताई - अंतरे बरोब्बर रेकॉर्ड केले तर त्यावरून तालीम घेता

येणार नाही का . ? ""



"" नाही . "" माईंचे उत्तर ठाम होते .

"" का नाही ? "" मी विचारले . त्यावर त्या काही बोलल्या नाहीत . मला वाटले , विषय संपला .

पण तो प्रश्न माईंच्या मनात घोळत होता .



काही वेळ इतर गोष्टी झाल्या आणि त्या एकदम मला म्हणाल्या , "" हे बघ , टेपरेकॉर्डरवरून

चीज ऐकल्यावर ती गळ्यावर बरोबर चढली की नाही हे काय तो टेपरेकॉर्डर सांगणार ? ""



"" आपण पुन्हा रेकॉर्ड करावी आणि तुलना करून पाहावी . ""



"" अरे , आपलंच गाणं परक्यासारखं ऐकता आलं असतं तर काय पायजे होतं ? रेडिओवर

आता टेपरेकॉर्डरच वाजवतात ना ? स्वतःचं गाणं स्वतः बसून ऐकतात . सुधारतात ?

तुझ्यासारखे त्यांचे दोस्तही कधी त्यांना त्यांच्या चुका सांगणार नाहीत . कशाला उगाच

वाईटपणा घ्या ? . . . काय ? ""

"" बरोबर . ""



"" म्हणून डोळ्यांत तेल घालून शागिर्दाचं गाणं पाहणारा , चुकला तर त्याचा कान पिळणारा

गुरू लागतो . अरे , आठ - आठ दिवस तान घासली तरी खांसाहेबांच्या तोंडावरची सुरकुती

हलायची नाही . वाटायचं , देवा , नको हे गाणं . . . ""



शिकवणी टिकवायला शिष्येचीच नव्हे तर तिच्या आईबापांचीही तारीफ करणारे अनेक

गुरू माझ्या डोळ्यांपुढून तरळून गेले . शिष्यांना वाट दाखवण्याऐवजी त्यांची वाट लावणारे

गुरू काय कामाचे ? "" माझी शिस्त परवडत असेल तर शिकवीन "" म्हणाणारे गुरू आमच्या



पान नं . 12

विश्वविद्यालयात राहिले नाहीत तिथे गायनमास्तरांना काय दोष द्यायचा !

आणि मग तालमीशिवाय , बंदिशीतली दमखम गळ्यावर नीट चढवल्याशिवाय एक चीज

गाणाऱ्या एका गायिकेची त्यांनी मला सांगितली . "" कलकत्त्याला लालाबाबूंची कान्फरन्स

होती . ह्या बाईंचं गाणं सुरू झालं . उगीच कान खराब करायला जाऊन बसायची मला सवय

नव्हती . तसाच कोणी फेय्याझखांबिय्याझखांसारखा असला तर मी जायची . मजा करायचा

फेय्याझखां . लालाबाबूंनी आग्रह केला होता म्हणून गेले होते . बाईंनी ` रसिया होना ' सुरू केलं .

आता ती काय त्यांच्या घराण्याची चीज नाही . तिला तालीम कशी मिळणार ? आणि मग , ` अरे

रसिया , हे रसिया , ओ रसिया - ' सुरू झालं . माझ्या शेजारी चंपू . मी म्हटलं , ` ऊठ , जाऊ

या . ' ती भित्री . ती म्हणते , ` माई , बरं दिसत नाही . ' मी उठले आणि हालच्या बाहेर आले .

लालाबाबू धावत आले मागून . मला म्हणतात , ` केसरबाईजी , कहॉचली आप ? ' मी म्हणाले

` ओ बाईजीका रसिया किधर खो गया हे - ओ रसिया , अरे रसिया करके चिल्लाती हे , सुना

नहीं ? उसका रसिया धुंडनेको जा रही हूँ . - ' ""



मला एक कथा आठवली : भर दरबारात राजाच्या एका लाडक्या कवीने कविता म्हटली

त्यातल्या एका ओळीत ` शीतं बाधते ' ऐवची ` बाधति ' असे त्याने म्हटले . दरबारातल्या एका

वेय्याकरण्याला राजाने विचारले , "" कविता कशी वाटली ? "" कवी राजाचा लाडका आहे हे

ठाऊक असूनही व्याकरणशास्त्री म्हणाले ` बाधति बाधते . ' त्या कवितेत आत्मनेपदी

क्रियापदाला परस्मेपदी प्रत्यय लावल्याचे त्या व्याकरणशास्त्रांना बाधले होते . त्यांची

भाषाविषयक तालीमच निराळी . आपल्या मताने राजा रागवेल याची भीती त्यांना नव्हती .

असली माणसे लौकिकार्थाने गोड , मनमिळाऊ राहूच शकत नाहीत . आपल्यालाला इष्ट वाटेल

ते साधण्यासाठी कलेत मानला गेलेला एखादा नियम जाणीवपूर्वक मोडण्यात एक मिजास

असतेही . पण अज्ञानामुळे नियम मोडणे निराळे , आणि कलेच्या सौंदर्यात मी भर घालीन ह्या

आत्मविश्वासाने नियम मोडणे निराळे . खुद्द अल्लादियाखांसाहेबांच्या तरूणपणात

ध्रुपदियांचा एवढा मोठा दबदबा असताना , त्यांनी , ज्याला विद्वान अंतःपुरातले गाणे म्हणून

नाके मुरडीत अशा ख्यालगायकीचाही दबदबा निर्माण केलाच की . याचे कारण त्यांना ध्रुपदाचे

सामर्थ्य आणि ध्रुपदाच्या मर्यादा ह्या दोन्हींचे पक्के ज्ञान होते . आंधळेपणाने नियम पाळण्याला

कोणीच किंमत देत नसतात . केसरबाईच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता .



अशाच एका कुठल्याशा संस्थानिकाच्या दरबारात संगीतोत्सव होता . केसरबाईना

संस्थानिकांनी नाटकातले पद म्हणायची फर्माइश केली . केसरबाईंनी त्या महाराजांना

सांगितले , "" थांबा , आपल्याला नाटकातलं पद कसं म्हणतात ते ऐकायचं आहे ? इथे

कृष्णामास्तर आले आहेत . ते म्हणतील . माझ्या गळ्याला त्या गाण्याची तालीमनाही . "" त्या

काळी काही संस्थानांत लग्नसमारंभांत ठिकठिकाणच्या गुणीजनांची गाणीबजावणी असायची .

मेहेरबानीचा स्वीकार करायचे . "" एकदा सकाळी माझ्या खोलीत हे बदामपिस्ते - मिठाईचं ताट

आलं . मी म्हटलं , हे कुणी सांगितलं होतं ? तो दरबारी नोकर म्हणाला , हे सगळ्या

गाणेबजावणेवाल्यांना वाटतात . मी म्हणाले , घेऊन जा ते ताट . असली दानं माझ्याकडे

आणायची नाहीत . "" केसरबाईचा हा खानदानीपणा ज्यांना कळला नाही त्यांना त्या गर्विष्ठच

वाटल्या असणार . ज्या गायकीच्या महात्मतेने त्यांच्या जीवनातले आनंदनिधान त्यांना



पान नं . 13

सापडले होते , त्या महात्मतेला लोकप्रियतेसाठी किंवा आर्थिक अभ्युदयासाठी बाधा आणणे ,

बदलत्या अभिरूचीचा अंदाज घेऊन गाणे बदलणे त्यांना मानवतच नव्हते . कालिदासात

रमणाऱ्या रसिकाला ` तुम्ही सिनेमातल्या गाण्यांचा पद्यावल्या का वाचीत नाही ? ' असे कोणी

विचारीत नाही .



काळ बदलला आहे , अभिरूची बदलली आहे , हे काय त्यांना कळत नव्हते ? त्यांच्या

घरातली नातवंडे ` विविध भारती ' वरची फिल्मी गाणी ऐकण्यात आनंद मानीत . केसरबाईंची

ऐकमेव कन्या सुमन आणि तिचे यजमान दोघेही डॉक्टर आहेत . मुले आधुनिक जमान्यातली

आहेत . एकदा आम्ही बसलो असताना आत मुलांनी सिनेमातली गाणी लावून धुमाकूळ

घातला होता .



"" ऐक . "" हसत हसत माई म्हणाल्या , "" दिवसरात्र डोकं उठवतात . ""

"" माई , तुम्हांला नाही मजा वाटत ? ""

"" अरे , त्यांच्याएवढी आज मी असते तर मीही हेच केलं असतं . त्यांना ऐकू नका म्हटलं

तर काय माझं ऐकणार आहेत ? रस्त्यातून वरातीचे ब्याडं वाजत जातात . त्या ब्यांडवाल्यांना

काय ख्याला वाजवा म्हणून सांगायचं ? ""



पुतळ्याचे काम पुरे झाले आणि आमच्या नशिबातले ते भाग्यशाली दहाबारा दिवस संपले .

त्यानंतर कानी यायच्या त्या माईच्या वाढत्या आजाराच्याच बातम्या . याच सुमाराला मीही

मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झालो . त्यांना भेटून आलेले लोक सांगायचे , माईकडे पाहवत

नाही . अंथरूणाला खिळून आहेत . वर्षा - दीडवर्षांनंतर शर्वरी पुतळा घेऊन त्यांच्या घरी गेला .

प्लॅस्टरमधला तो अर्धपुतळा त्याने केसरबाईमा अर्पण केला . त्या वेळी त्या बिछान्यावरच

होत्या . शर्वरीला त्या अवस्थेत म्हणाल्या , "" शर्वरी , जेवायला थांबायला पाहिजे . तू आज येणार

म्हणून डाळीच्या वरणात घालायला कारली आमली आहेच . "" दीड - दोन वर्षांपूर्वी मी सहज

म्हणालो होतो की कारली घातलेले डाळीचे वरण आणि भात हे ह्या शर्वरीचे जेवण . चहा नाही ,

कॉफी नाही , विडीकाडी काही नाही . शरपंजरी पडलेल्या माईंनी आईच्या मायेने शर्वरीचे

कारली घातलेले वरण लक्षात ठेवले होते . दूरदूर गेलेले सूर पाहत बसलेल्या गानसम्राज्ञीचा तो

पुतळा . शर्वरीची ओळख करून दिली त्या दिवशी माईंनी विचारले होते , "" तुझे गुरू कोण ? ""

शर्वरीने आपल्या शिल्पकलेतल्या गुरूचे नाव सांगतानादेखील हात जोडले होते . हा गुरूपंरपरा

असलेला , खानदान असलेला शिल्पकार आहे याची खात्री पटल्यावरच माई पोज द्यायला

तयार झाल्या होत्या .



मी त्यांचे शेवटले गाणे 1966 साली ऐकले . त्यांचीही मला वाटते ही शेवटलीच जाहीर

मेफिल . तो प्रंसगही एक पर्व संपल्याचे सुचवणाराच होता . पेडर रोडवर श्री . भाऊसाहेब

आपट्यांचा प्रासादतुल्य बंगला होता . आपट्यांच्या मुलीवर माईंचा खूप जीव . क्रिकेटर माधव

आपटेची ही बहीण . ह्या आपट्यांच्या बंगल्याच्या जागी आता अनेक दुमजी ` वुडलँड्रस

अपार्टमेंट ' उभे राहणार होते . मूळ वास्तूला कृतज्ञतेने निरोप देण्याचाच जणू काय तो प्रसंग

होता . जुन्या मुंबईतील एक जुनी वास्तु दिवसा - दोन दिसृवसांत दृष्टीआड होणार होती . पुरातन

असूनही सतेज राहिलेला तो वृध्द प्रासाद आणि वार्धक्यातही सुरांची तेजस्विता न गमावलेली



पान नं . 14

ही वध्द गानसम्राज्ञी . वाड्याला वास्तुपुरूष असतात अशी जुन्या लोकांची एक श्रध्दा आहे . त्या

वाड्याच्या वास्तुपुरूषालाही असल्या तपःपूत सुरांनी बांधलेली आपली उत्तरपूजा आवडली

असेल . त्या गाण्याला मुंबईतल्या नामवंत गायक - गायिकांप्रमाणे , सत्येनभाईसारख्या

केसरबाईंची गाणी ऐकण्याचा रेकॉर्ड मोडणाऱ्या रसिकापासून अनेक आमंत्रित रसिकांची

हजेरी होती . शिवाय अनेक अनाहूत . त्या प्रशस्त हॉलमध्ये , जिन्यात , खालच्या अंगणात ही

गर्दी . कुणीतरी आणून मायक्रोफोन ठेवला .



"" हा उचला आधी . "" बाईंनी हुकूम दिला . त्यांना टेपरेकॉर्डिंगची शंका आली होती . "" माझं

गाणं ऐकायचं असेल तर माझं गाणं ऐकण्याचे कायदे पाळून ऐका . "" हे त्यांनी कुणाचाही

मुलाहिजा न बाळगता आयुष्यभर सांगितले होते . त्यांची त्या सांगतील ती बिदागी देऊन गाणी

करणारेही ` माझ्या गाण्याला अमकेतमके दिसता कामा नयेत . ' ही त्यांची अटदेखील मान्य

करीत असत असे म्हणतात . खरेखोटे देव जाणे . पण केसरबाईंनी संगीतात असे काही

विलक्षण स्थान मिळवले होते की , माझ्या गाण्याला सर्व पुरूषांनी डोक्याला टोपी किंवा पगडी

घालूनच आले पाहिजे अशी अट त्यांनी घातली असती तरीही ती मान्य झाली असती . हे का

होऊ शकले याला माझ्यापाशी उत्तर नाही . सगळ्याच गोष्टींना तर्कसंगती लावून उत्तरे सापडत

नसतात . मायक्रोफोनचा प्रकार त्यांतलाच .



"" मायक्रोफोन असू द्या . खाली गर्दी आहे . ऐकू जाणार नाही . ""

"" ऐकू जाणार नाही ? खाली काय बाजार भरलाय ? माझं गाणं कुठपर्यंत ऐकू जातं ते मला

बरोबर ठाऊक आहे . हा मायक्रोफोन माझा आवाज खातो . उचला . ""



रात्री एक वाजेपर्यंत गाणे झाले . माणसे त्या सुरांना खिळून बसली होती . वार्धक्याचा त्या

गळ्याला आणि सुरांना जरा कुठे स्पर्श झाला नव्हता . आवर्तना - आवर्तनाला प्रदक्षिणा घालून

येणारी तशीच अखंड तान . श्रीपाद नागेशकर तबल्याला होते . मधूनच एक सुरेल तुकडा

लावायची त्यांनी हिंमत केली . जागच्या जागी मी घाबरलो होतो . पण तानेच्या योग्य अंदाजाने

आलेल्या त्या तुकड्यानंतर त्यांनी श्रीपादाकडे कौतुकाने पाहिले त्यात श्रीपादाला आपण

शिकलेल्या विद्येचे चीज झाल्यासारखे वाटले असेल . त्या मेफिलीत केसरबाईंना पुष्पहार

देण्याचा मान मला मिळाला . "" हा . कर तुझं भाषण . "" केसरबाईंनी तेवढ्यात मला चिमटा

काढला . त्या दिवशी केसरबाईंच्या गाण्यातल्या त्या वाहत्या प्रकाशमान धवलतेला उद्देशून मी

म्हणालो होतो की , "" अल्लादियाखांसाहेबांना बॅरिस्टर जयकरांनी . भारतीय संगीताचे

गौरीशंकर म्हटलं होतं . संगीतातल्या त्या गौरीशंकराच्या कृपेने आम्हांला लाभलेल्या सुरांच्या

धवलगंगेत आमची मनं न्हाऊन निघाली . - तेव्हा पहिलं वंदन अल्लादियाखांसाहेबांना आणि

दुसरं केसरबाईंना . ""



गणेशचतृर्थीच्या दिवशी केसरबाई गेल्या . 13 जुले 1893 साली गोव्यातल्या केरी

नावाच्या सुदंर खेड्यात त्यांचा जन्म झाला होता . गोव्याच्या मातीने भारतीय संगीताला अर्पण

केलेल्या देण्यांतले हे फार मोठया मोलाचे देणे . ज्या मुबंईनगरीला त्यांच्या सुरांचे स्नान घडले

होते त्या मुंबईतल्या दादरच्या समुद्रतीरावर त्यांच्या पार्थिव देहावर ऋषिपंचमीच्या दिवशी

अग्निसंस्कार झाला . भारतीय संगीतातल्या ऋषींचे ऋण आजन्म संगीतव्रती फेडणाऱ्या

केसरबाईसारख्या गानतपस्विनीचा ऋषींच्या मालिकेतच कृतज्ञतेने अंतर्भाव करायला हवा .



त्यांच्या निधनाची वार्ता रात्री आठच्या सुमाराला मुंबईहून त्यांच्या नातवाने मला



पान नं . 15

फोनवरून सांगितली . सात - सव्वासाताच्या सुमाराला त्या अलौकिक दमश्वासातला शेवटला

श्वास टाकून इथली मेफिल केसरबाईंनी संपवली होती . माझा चेहरा उतरलेला पाहून मला

भेटायला आलेला माझा एक मित्र म्हणाला , "" काय झालं ? ""

मनात म्हणालो : "" एका तेजःपुजं स्वराचा अस्त . ""

त्याला सांगितलं , "" केसरबाई गेल्या . ""

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

एखाद्या दैवी देणगी लाभलेल्या कलाकाराच बर्यावाईट गुणांसह वर्णन करण हे देवाचा वरदहस्त लाभलेल्या लेखणीलाच शक्य आहे....पुलंच्या शब्दकुंचल्याने साकार झालेली व रंगलेली व्यक्तिचित्रे ही त्यांच्या सर्व स्वभाववैशिष्ट्यासह आपल्या डोळ्यासमोर अशीच सजीव होतात आणि आपल्या जवळच्या स्नेह्यासारखी आपल्या आयुष्याचा भाग बनुन जातात....