Thursday, March 10, 2011

(भाई)गीरी

अक्षरांची रत्ने खुलवत राजा होता अवतरलेला
गेली वर्षे सरली वर्षे दरवळ त्याचा पण उरलेला

राजा होता थोडा डांबिस थोडा अल्लड थोडा ग्यानी
ह्या राजाचा रुबाब होता एक मनोहरशी फ़ुलराणी

ह्या राजाची गोष्ट निराळी ह्या कुलुपाला नव्हती किल्ली
ह्या राजा दिसल्या होत्या काही व्यक्ती काही वल्ली

त्या वल्लीची बात निराळी नाथा,नंदा, अंतु बर्वा
ह्यातिल खरा नि खोटा कुठला तुम्हीच वाचा तुम्हीच ठरवा

ह्या राजाची कधी फ़सवणूक कधी उगाची खोगिरभरती
ह्या राजाने चालत न्हेले आम्हा तुम्हा चांळीं वरती

कधी जहाला धोंडो जोशी कधी बबडुचे लाडु वळतो
हया राजाचा थाट हे न्यारा ज्याला जुळतो त्याला कळतो

कधी असामी गुणगुणला तो कधी उगाचच शुन्य जहाला
ह्या राजाचा सुर गवसला ज्याला बस तो धन्य जहाला

-- मकरंद सखाराम सावंत

4 प्रतिक्रिया:

Rupak said...

Makarand has really done good job
It is clear that he too a great fan of our Bhai

I like it
really good

Rajesh Apte said...

क्या बात है! मस्त! एकदम छान!

prasaadjoshi@gmail.com said...

मकरंद लेका !
आजच तुझं लिखाण वाचायला मिळावं यासारखा योग नाही रे दोस्ता ...

prasaadjoshi@gmail.com said...

मित्रा मकरंद ...
दोस्ता ... आजच्याच दिवशी तुझी भाईगिरी वाचायला मिळावी यासारखं भाग्य म्हणू की ?
सुरेख रे सुरेखच