मेंढे पाटलांच्या बंगल्यात दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्याने शिष्टमंडळाचे भरगच्च स्वागत केले. प्रथम द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव त्याने घेऊन पाहिली, त्यानंतर सोकरजींना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि बाबा बर्व्याचा पंचा ओढला. (बाबांचा पंच्यापासून काचा सुटला, पण कमरेपासून पंचा सुटला नाही!!) काही वेळाने एक गुरखावजा भय्या अगर भय्यावजा गुरखा घावत आला आणि त्याने नुसत्या "अबे टायगर--" एवढ्या दिन शब्दांनी त्या भयानक जनावराला लोळण घ्यायला लावली.
भय्याच्या (अगर गुरख्याच्या) थाटावरून हेच मेंढे पाटील अशी सोकरजी त्रिलोकेकरांची समजूत झाली आणि त्यांनी त्याला गुड मॉर्निंग केले. मेंढे पाटलांच्या 'आश्वासनाच्या सभे'त सोकाजीराव हजर नव्हते. गुप्ते एक डोळा कुत्र्यावर व दुसरा गुरख्यावर ठेवून होते. शेवटी बाबांनी तोंड उघडले,
"नमस्ते---"
"क्या हे?" गुरखा.
"हम बटाट्याची चाळकी ओरसे शिष्टमंडळ के नाते श्रीमान मेंढे पाटीलजी के दर्शनके लिये आये है--" आचार्य.
"हम सोकाजी त्रिलोकेकर ओर बाबा बर्वे आचार्य होएंगा--" त्रिलोकेकरांनी हिंदीची चिंधी केली.
"जरा थांबा हं--" आचार्य बाबांनी त्यांना आवरले,
"हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेंढे पाटील हमें दर्शन देनेकी कृपा करेंगे!"
"हम करेंगे या मरेंगे--" गुप्ते उगाच ओरडला.
"गुप्तेसाहेब, जरा--" बाबांनी त्यांना थांबवीत म्हटले, "जनताकी मांग हम श्रीमानजी के प्रती निवेदन करने का स्वप्न-स्वप्न-
"हमारे ऊर मे बाळगते है!" त्रिलोकेकरांनी दुसरी चिंधी फाडली. इतक्या सभांषणानतंरही गुरख्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही.काय आहे राव, निट सांगा की--" गुरख्याच्या (अगर भय्याच्या) तोंडून अस्खलीत मराठी ऎकुन पाद्याने अथर्वशीर्ष म्हटल्याच्या धक्का तिघांनाही बसला, "माफ करा हं. मला वाटलं, आपण गुरखे आहा-- "किंवा भय्ये!"
"भ्रमण मंडळ"ह्या लेखातील एक प्रसंग
--काही वेळाने कल्याण आले. बाबुकाकांना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आठवण झाली. सोकाजी त्रिलोकेकरांनी कुठलासा डोंगर दाखवुन तिथे हाजी मलंगाची समाधी असल्याचा व्रतातं सांगतिला. काशिनाथ नाडकर्ण्यानां केव्हापासुन तहान लागली होती. त्यांच्या खिडकीसमोर चहावाला आला आणि कोचरेकरमास्तरांनी शेजारच्या मावळ्याशी दोस्ती केली.
"कुठं पुण्याला चाललात का?"
"आपुन कुटं चालला?" कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर द्यायचं नाही ह्या शेतकरीधर्माला जागुन त्याने उलट प्रश्न केला. "पुण्याला. तुम्ही?"
"आम्ही लोणावळ्याला. तिथं गाडी बदलून तळेगावला जायाचं."
"तळेगावाला असता वाटतं आपण?"
"नाही." कुठे असतो हे उत्तर नाही.
"मग?"
"दुसरंच गाव हाय!"
"कोणतं?"
"ढोरवाडी-- म्हंजी ही पिराची ढोरवाडी नव्हं. ती आली अंदा-या मावळाच्या अंगाला. आमची फकिराची ढोरवाडी."
"दोन ढोरवाड्या आहेत वाटतं?"
"तिन! येक पिराची, येक फकिराची, आन एक जंगमाची ढोरवाडी हाय. ती पार खाल्ल्या अंगाला हाय."
"खाल्ल्या अंगा" चे कोडे कोचरेकरानां उमगले नाही. परंतु "अस्सं!" असे म्हणुन जंगमाची ढोरवाडी कुठे आहे हे आपल्या नेमके लक्षात आल्याचा त्यांनी चेहरा केला.
"आपून काय ब्य़ांडात असता का पोलिसात?" कोचरेकरमास्तरांच्या 'ड्रेसा' कडे द्र्ष्टी टाकीत शेतकरीदादांनी सवाल केला.
"नाही, शिक्षक आहे मी."
"म्हंजी मास्तुर! पुन्याच्या साळंत?"
"नाही, मुंबईच्या."
"हा-- मोठी असल साळा! आमच्या गावाला गुदस्तसाली झाली साळा, परमास्तर लय द्वाड हाय. च्यायचं खुटायवढं कारटं धाडलय मास्तर करुन, काय पोरं हाकनार?"
असे म्हणुन बसल्या ठिकाणाहुन मास्तराच्या निषेधार्त त्याने एक तंबाखूची पिंक खिडकीबाहेर तोंड काढुन टाकली. 'पोरं हाकणं', 'खुटाएवढं कारटं'वगैरै शब्दप्रयोग कोचरेकरमास्तरांना तांदळांतल्या खड्यांसारखे लागत होते. प्रवासात पंडितमैत्री होते अशा अर्थाचा श्लोक त्यांनी पाठ केला होता. त्यांच्या वाट्याला मात्र हाशिक्षकांविषयी एकेरी उल्लेख करणारा इसम आला होता. परंतु पुण्यात 'पंडित' नक्कीभेटतील ह्या आशेवर ते तग धरुन काशीनाथ नाडकर्ण्यांच्या पेटा-यावर बसले होते.
"आपण ढोरवाडीला काय करता?"
"शेती हाय आमची!" विचारलेल्या प्रश्नाला सरळ असे पहीलेच उत्तर मिळाल्याचा कोचरेकर-मास्तरांना माफक आनंद झाला!
"जपानी भातशेतीविषयी आपलं काय मत आहे?" आणखी एक प्रयत्न कोचरेकरमास्तरांनी केला.
"जपानी?" "आपल्या देशात सध्या जो प्रयोग चालला आहे जपानी भातशेतीचा---"
"खुळ्याचा कारभार आहे समदा. त्यो आमचा पुतन्या कुठं शेती कालिजात शिकून शाणा झालाय, त्यानं चलविलंय काय तरी श्येतावर ह्यो जपानी खुळच्येटपणा--"
"पण आपण नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी? प्रयोग हा प्रगतीचा पिता आहे." वर्गाताल्या भिंतींवर लिहीलेल्या अनेक वाक्यांपैकी एकवाक्य कोचरेकरमास्तर म्हणाले.
"घ्या!" कोचरेकरमास्तरांच्या प्रश्नाला चोळलेली तंबाखु हे उत्तर मिळाले.
"नाही. तंबाखु खात नाही मी." "आमच्या साळंतला मास्तुर इड्या फुंकीत बसतो. नकायवढं मास्तुर--थुत!" ----------
5 प्रतिक्रिया:
Excellent!!!
khupach chhan !!
very nice
its Excellent
pu. la is great
superb........
avdala mala
खूप छान आहे
भाईंच लिखाण अप्रतिम!!! या blog मुळे पुन्हा एकदा वाचून तेवढंच हसू आलं.
Post a Comment