Monday, May 9, 2022

संभा नामाजी कोतमिरे

एखाद्या प्रसिध्दीप्राप्त व्यक्तीचे टोपणनाव मिळाले की त्या नावाचा धारक कोण? हे शोधण्यासाठी मी अनेक प्रयत्न करतो, प्रयत्नांना यश आले नाही तर दुसरा उपाय, युक्ती योजून पाठपुरावा करतच राहतो. यश न आल्यास नाऊमेद न होता प्रयत्नशील राहतो. आणि यश आले तर आनंदाला पारावार राहत नाही. टोपणनावे संग्रहित करण्याच्या छंदाने मला छंदमय बनवून ठेवले आहे. छंदामुळे मला दुःख, वेदना, यातना, निराशा यांचे भानदेखील राहत नाही.

एका टोपणनावाच्या शोधाबद्दलचा माझा एक लेख ललित- एप्रिल ८७ च्या अंकात 'टोपणनाव- आनंदी रमण' हा गंभीर आणि गमतीदार या सदरात प्रसिध्द झाला होता. त्या लेखाबरेबर माझा पत्ता दिल्यामुळे अनेकांची पत्रे मला येऊ लागली. कोणी आपले टोपणनाव सांगे तर कोणी अमुक टोपणनावधारक कोण? अशी चौकशी करू लागले.

एका पत्राने मला चांगलेच गोंधळून टाकले. ते पत्र मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य नी. मा. डोंगरे यांचे होते. त्यांनी माझा लेख वाचून विचारले होते की तुकाराम शेंगदाणे व संभा नामाजी कोतमिरे ही टोपणनावे धारण करणाऱ्या लेखकांची नावे काय ते सांगू शकाल का? यातील तुकाराम शेंगदाणे हे टोपणनाव माझ्या संग्रही होते. ते प्रसिध्द साहित्यिक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी धारण केले. होते. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून हे व त्यांची इतर पण टोपणनावे मिळविली होतो. परंतु 'संभा नामाजी कोतमिरे' हे. टोपणनाव कोणाचे आहे हे ठाऊक नव्हते किंबहुना ऐकले पण नव्हते. मी बुचकळ्यात पडलो. परंतु प्राचार्य डोंगरे यांनी हे टोपणनाव कोठे वाचले होते याचा संदर्भ दिला होता आणि शोधाचा मार्ग सुलभ केला होता. संभा नामाजी कोतमिरे हे टोपणनाव ४० वर्षांपूर्वी पुण्याहून अमेरद्र गाडगीळ 'अनिल' नावाचे नियतकालिक संपादित करत होते, त्यात असायचे असे डोंगरे यांनी लिहिले होते. अमोरद्र गाडगीळ यांच्याशी यापूर्वी माझा दोन-तीन वेळा पत्रव्यवहार झाला होता. गाडगीळ, यांना फोनवरून माहिती सांगितली व विचारले की, 'आपण संपादित करत होता त्या अनिल नियतकालिकात संभा नामाजी कोतमिरे हे टोपणनाव असायचे ते कोणा लेखकाचे ते आपण सांगू शकाल का?' गाडगीळांनी क्षणाचाही विलंब न लावता ते पु. ल.देशपांडे यांचे आहे, असे सांगितले.
              
संभा नामाजी कोतमिरे हे टोपणनाव महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल, देशपांडे यांनी धारण केले होते, यावर माझा विश्वास बसेना; कारण यापूर्वी पु. ल॑. शी पत्रव्यवहार करून ते, मं. वि. राजाध्यक्ष व रा, वा. आलुरकर यांनी सामुदायिक टोपणनाव 'पुरुषराज आलुरपांडे मौजे पारलई', असे धारण केल्याचे पत्राने कळविले होते. पण या टोपणनावाचा उल्लेख नव्हता. त्यांनी एकट्याने पण टोपणनावाचा आश्रय घेतल्याचे सहसा कोणास ठाऊक नसेल. पु. ल॑. नी आपले नाव सांगणे का टाळले असावे? काहीच उलगडा होईना.

मी डिरेक्टरी घेतली पु ले.वा फोन नंबर शोधला अ/णि तेथूनच त्यांना फोन केला. फोनवरून एक स्त्रीचा आवाज येत होता.मी विचारले 'भाई' (पु. ल.) घरी आहेत का? त्यांच्याशी बोलायचे आहे.' फोनवरून थोडा वेळ थांबून सांगितले गेले की, 'ते (पु. ल.) घरी नाहीत आज सकाळीच मुंबईला गेले. १५/२० दिवस येणार नाहीत.'

एका मान्यवर व पु. लं. शी जवळीक असलेल्या साहित्यिकाने) सांगितले होते की *पु. ल॑.ना कधी फोन केला तर पु. ल. फोन उचलत नाहीत दुसरे कोणीतरी फोन घेतात, 'कोण बोलते आहे याची चौकशी करतात व पु. ल॑.ना सांगतात, पु. लं.ना बोलायचे नसल्यास ते घरी नाहीत म्हणून सांगितले जाते आणि पुन्हा लवकर फोनं,करू नये म्हणून 'दोन-तीन आठवडे परगावी गेले आहेत,' असे म्हणून फोन बंद 'होतो,

'मला या शब्दाची आठवण झाली. त्या 'साहित्यिकाचे म्हणणे खरे वाटले. तरी पण मला भाईकडून खात्री करून! घेणे आवश्यक होते. कारण अमोंद्र गाडगीळांनी सांगितले असले तरी तो पुरावा होऊ शकत नाही. कोणीतरी कोणाचे सांगितलेले टोपणनाव मी ग्राह्य मानत नाही. लेखी पुरावा नसतो. खोटे ठरण्याची जास्त शक्‍यता असते.

दोन-तीन आठवडे लोटल्यावर पुन्हा एकदा पुलंना फोन लावला. खात्री झाल्याखेरीज मला चैन पडत नव्हते. ते माझ्याशी बोलले व संभा नामाजी कोतमिरे हे टोपणनाव आपलेच. असल्याचे सांगितले. ४० वषांपूर्वी या टोपणनावाचा वापर केल्याचे त्यांनी काबुल केले.

ही सर्व खात्री झाल्यावर प्राचार्य नी. मा. डोंगरे यांना पत्र पाठवून संभा नामाजी 'कोतमिरे हे टोपणनाव पु. ल. देशपांडे यांनी धारण केले असल्याचे कळविले. त्यापूर्वी - तुकाराम शेंगदाणे हे टोपणनाव प्रसिद्ध लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे असल्याचे कळविले होते. संभा नामाजी कोतमिरे हे - टोपणनाव पु. ल. देशपांडे यांचे असल्याचे वाचून डोंगरे यांना आश्चर्य वाटले व माझ्या प्रयत्नांचे त्यांनी पत्र पाठवून कौतुक केले. त्यानंतर एकदा मी पु. लं.च्या घरी जाऊन भेटलो. ते बराच वेळ माझ्याशी गप्पा मारत बसले होते. एका थोर व्यक्तीचा सहवास लाभल्याचा आनंद अजूनही मला मोहरून टाकतो.

- स. बा. यशवंत

0 प्रतिक्रिया: