मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ
कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण
गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे
‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ
‘ खो खो खो ’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा - कुणी वंदा
कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच ?
हा लेकाचा शहाणा की खुळा ?
मग मी मारतो मलाच डोळा
(उरलंसुरलं)
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Thursday, October 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 प्रतिक्रिया:
Pula'chya kavita varun jari sadhya vatat aslyatari tyamadhe khol akdi khol arth bharlela asto.Mansala to antermukh karto. Kaljala haat ghalto. Mala tyanchya kavita kay sagle sahitya vachtanna asech vatat ale aahe.Tyanchya vinodi sahitya mage aa tatvadnya asto to satat manala sparsh karto.
P.L. astanna aapan hoto ha kitimotha aanand ahe.
हा ब्लॉग खूप छान आहे. फार आनंद मिळाला वाचून. पुलं म्हणजे दैवत आहेच. इतकी माहिती एकत्रितरीत्या संकलित केलेली वाचायला मिळाली. खूप खूप धन्यवाद !!
हा ब्लॉग खूप छान आहे. फार आनंद मिळाला वाचून. पुलं म्हणजे दैवत आहेच. इतकी माहिती एकत्रितरीत्या संकलित केलेली वाचायला मिळाली. खूप खूप धन्यवाद !!
व्वा व्वा व्वा 👌🏻 खुपचं मस्त 🤩😄😄
Post a Comment