हे प्रभो,
हे जन्मदात्या,
जलधारांचा वर्षाव करीत ये
आणि
कडकडून भेट आम्हाला़
जलकुंभांनी भरलेल्या रथातून ये,
गडगडत ये,
गर्जत ये,
जीवदान दे.
तुझ्या पाण्यानी भरलेल्या
पखालीची तोंडं
उघडू देत पृथ्वीच्या दिशेनं
सारे खंदक जाऊ देत भरूऩ
उंच सखल सारं सारं
येऊ दे एका पातळीवऱ
भरून जाऊ देत सगळे झरे, सगळे पर्हे़
तुडुंब भरून जाऊ दे पृथ्वी आणि स्वर्ग
आणि
गाईगुरांना सतत लाभू दे
मुबलक पाणी
ह्या आहेत काही ओळी पर्जन्यसूक्ताच्या़ वेदकालीन अज्ञात कवींनी रचलेल्या़ हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतातल्या ह्या कविता आपल्यासाठी मराठीत कोणी आणलं ठाऊक आहे? आपल्या लाडक्या पु़ लं नी़. पु़ लं चा हा पैलू आम्हा मराठी वाचकांना कितीसा माहीत आहे?
कॅलेंडरच्या मागे छापलेल्या सखा श्रावण' या छोट्याशा लेखात पु़ लं. नी अनुवाद केला आहे पर्जन्यसूक्ताचा़ जीवनाला सर्वार्थानं आणि सर्वांगांनी परिपूर्ण रसिकतेनं भोगणारा सच्चा कलावंत म्हणजे पु़ ल़ समाजकारण आणि राजकारणातील विचारसरणीच्या बाबतीत पु़ ल़ जसे डावे-उजवे नव्हते, तसेच साहित्याच्या बाबतीत जीवनवादी कला की कलावादी जीवन या वादातही ते पडले नाहीत़ आपल्या रसिकतेला कोणत्याही संकुचित बांधिलकीची कुंपणं त्यांना कधी पडू दिली नाहीत़ ‘म्हणुनी ग्रंथाची आवडी' या लेखात त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्वच्छपणे मांडली आहे़ पु़ ल़ लिहितात, ‘साहित्याचे रोमँटिक, क्लासिकल वगैरे भाग करून त्यांची वजनं-मापं घेण्याची मला हौस नाही़. अजूनही कधीतरी पाल ग्रेव्हची ‘गोल्डन ट्रेझरी' उघडून“ब्रिज ऑफ साईज' सारखी कविता मी वाचतो़ केशवसुत हे माझे नित्याचे सोबती आहेत़ बालकवींची अधून-मधून भेट घेतो आणि मेघदूताबरोबरही हिंडतो़ कधी मर्ढेकरांना भेटावंसं वाटतं तर कधी ‘शीळ' घेऊन बसतो तर कधी ‘ऐसा गा मी ब्रह्म' बालकवींच्या फुलराणी' मला जसं वेड लावलं तशीच नारायण सुर्वेंची मनी ऑर्डर' मनुष्यनिर्मित दुःखानं पोळलेल्या कोण्या अभागी स्रीच्या सार्या वेदनांचे काटे माक्या मनात कायमचे रुतवून गेली आहे़.
संतांच्या कवितेतून येणारा मराठमोळा थेटपणा पु़. लं. ना आपल्या काळजाचा कोपरा वाटतो़ पण देवाच्या आस्तत्वाविषयी साशंकता व्यक्त न करताही संतांना त्यांच्याच शब्दांत ते अचूकपणे पकडतात आणि एकप्रकारे संतांची पंचाईतच करून टाकतात़ पु़ ल़ म्हणतात, तुकोबाचा गाथा हा माझा लाडका ग्रंथ आहे़ पण माझा तुकोबा बडव्यांना दलाली देऊन पांडुरंगाची षोडषोपचारांनी पूजा करणारा नाही़ मला निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणारा आणि कधीतरी अननुभूत आनंदानं भरून येऊन भरल्या शेताचा । देतो मज वाटा । चौधरी गोमटा । पांडुरंग' म्हणणरा, विठ्ठलच विठ्ठल । वदवावी वाणी । नाही ऐसे मनी । ओळखावे' हे गुपित सांगणारा आणि गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' म्हणणारा तुका माझा वाटतो़''
ग़ दि़ माडगूळकरांचे गीत-रामायण जसे त्यांना आवडते तशीच त्यांची लावणीही त्यांना भावते़ कवितेच्या नवविध रसांपैकी कुठल्याही एखाद्या रसाला आधक भाव' देण्यापेक्षा प्रत्येक भाव रसिकतेने मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनुभवणे त्यांना आधक नैसर्गिक वाटते़ म्हणूनच ते लिहितात-
‘चांगली कविता आजही मला मनात तरंग उठल्याचा किंवा आत काहीतरी झंकारल्याचा जवळजवळ शारीरिक म्हणावा तसा संस्कार करून जाते़ कुसुमाग्रजांची एक-एक कविता भेटत गेली ती अशीच कायामनांतून एकसाथ कंपने उठवत़ मग त्यात रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हा भाव असो की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात'हा भाव असो़ पृथ्वीच्या पे्रमगीता' नं दिलेला हादरा हा मानसिकाइतकाच शारीरिक अनुभव होता़'' पु़ लं. ची साहित्यनिर्मिती जशी प्रयोगशील राहिली आहे तशीच त्यांची आभजात रसिकता परिवर्तनशील राहिली आहे़ या बाबतीत ते म्हणतात, मी वषानुवर्षे कुठलीही रेडिमेड मतांची झापडं लावून किंवा एकेकाळी आपलं मत अमुक असं होतं म्हणून त्याला हट्टानं चिकटून बसलो नाही़'' याचा प्रत्यय मर्ढेकरांच्या बाबतीत आला़ १९४६ मध्ये आभरुची' त मर्ढेकरांची पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता प्रसिद्ध झाली़ पु़ ल़ हे तेव्हाचे आभरुची' लेखक़ तोपर्यंत वाचलेल्या कवितांच्या पार्श्वभूमीवर मर्ढेकरांच्या या कवितेने त्यांना चांगलाच हादरा दिला़ पु़ ल़ ची टीका करण्याची पद्धत म्हणजे विडंबन करणे़ पु़ लं नी या कवितेचे विडंबन करून आपली टीका नोंदवली़ पुढे ही कविता तिच्यातल्या जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे' या ओळींनी चांगलीच गाजली़ तिच्यातल्या प्रतिमांचं नावीन्य अधोरेखित करणारं बरचंसं लेखनही झालं आणि पु़ लं नी आपल्या परिवर्तनशील रसिकतेने त्या एकट्या कवितेलाच नव्हे तर संपूर्ण मर्ढेकरांनाच मनापासून दाद दिली़ ते नुसती दाद देऊनच थांबले नाहीत तर मर्ढेकरांची कविता आधकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्या कवितांच्या आभवाचनाचे जाहीर कार्यक्रम त्यांनी सुनीताबाईंसोबत केले़. केवळ मर्ढेकरांच्या कवितांचेच नव्हे तर आरती प्रभू आणि बोरकरांच्या कवितांच्या आभवाचनाचे जाहीर कार्यक्रमही त्यांनी महाराष्ट्रभर केलेत़. बोरकरांच्या कवितांच्या आभवाचनाच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेलं नावही छान होतं-आनंदयात्रा़'
या आनंदयात्रेच्या निमित्ताने पु़. ल़. अकोल्यात आले होते़ किशोर मोरे, दिलीप इंगोले अशी आम्ही मित्रमंडळी त्यांना भेटायला गेलो़ मराठी कवितेला गझलने झपाटल्याचा तो काळ होता़ एकच भाव उलगडून दाखवीत असेल तर ती गझल नव्हे तर गझलच्या फॉर्ममधली कविता' असे आग्रही प्रतिपादन सुरेश भट करीत होते़ पु़लं नी सुरेश भटांच्या रंग माझा वेगळा' या संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली़ म्हणून त्यांनाच यातलं खरंखोट काय ते विचारावं म्हणून मी भीतभीतच या संदर्भात त्यांना विचारलं. तर ते दिलखुलासपणे म्हणाले, तसं काही नसतं हो़ एकच भाव उलगडून दाखवणार्या शेकडो गझला उर्दूत आहेत़ उर्दूत त्यांना गझल-ए-मुसल्सल म्हणतात़ मोमीनची वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो' ही याच प्रकारची गझल आहे़''
‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे' हे रंग माझा वेगळा' च्या प्रस्तावनेतील पु़ लं चे विधान अर्धवटपणे उद्धृत करणार्यांनी पु़ लं. वर खरे तर एक प्रकारे फार मोठा अन्यायच केला आहे़ कारण या अपुर्या विधानातून गझल-वृत्ती' म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट होत नाही़ एखादे चटकदार वाक्य हातात सापडल्यावर ते दांडपट्टयासारखे आपल्या तोंडपट्टयावर चौफेर फिरवून गुळगुळीत करून टाकावे तसे या विधानाचे झाले आहे़. ‘गझल-वृत्ती' ला स्पष्ट करणार्या नंतरच्या ओळींच्या संदर्भातच खरे तर या वाक्याचे महत्व, वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या अध्यात्मिक संकल्पनांना साध्या, सोप्या भाषेत पु़ लंऩी मांडून कवितेच्या जन्माचा क्षण अचूकपणे पकडला आहे तो असा ‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे़ एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे़ स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृत्ती मानीत आलो आहोत़ क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खर्या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही़ जीवनात नुसत्याच उंदीर-उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे़ निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण तया धावपळीच्या अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात़ असा एखादा क्षणच कवितेला जन्म देऊन जातो़''
ह्या परिच्छेदात पु़लं नी निवृत्तीला ‘सूक्ष्म' आणि‘सुंदर' ही दोन विशेषणे एकाच वेळी का लावली आहेत हे आपण लक्षात घेतले तर ‘गझल वृत्ती' चे अंतरंग आपल्यासमोर स्वच्छ आरशासारखे उघडे व्हावे़ आजकालच्या कवितांचा जमाना म्हणजे मुक्तछंदाचा आणि मुक्तशैलीचा जमाना आहे़ छंदवृत्तांशी कवितेने जवळ-जवळ फारकत घेतली आहे़ प्रसाद गुणाशीही ती फटकूनच वागते आहे़ दुर्बोधता हा जणु काही तिचा अलंकार होऊ पाहतोय़ गाण्याची तहान लागलेल्या मनाला मुक्त छंदातल्या ह्या कविता रुख्यासुख्या वाळवंटासारख्या वाटतात़. मधूनच छोटीशी हिरवळ डोळ्यात भरली की मन प्रसन्न व्हावे तशी एखादी गेय कविता भेटते़ पण तथाकथित समीक्षेतही तिला गीत म्हणून दुय्यम लेखले असते आणि तिच्या निर्मात्याला गीतकार म्हणून हिणवलेले असते़ ग़ दि़ माडगूळकर आणि ना़ घ़ देशपांडयांनाही हे भोगावे लागले आहे पण यातून किती मोठ्या परिमाणाची वजाबाकी झाली आहे याची तीव्र जाणीव फक्त पु़ लंच देऊ जाणोत कागदावरचे मुद्रण ही सोय आहे़ पण उच्चार हा शब्दांचा मूळधर्म आहे़ कवितेला कागदातच गुंडाळून ठेवणे म्हणजे शब्दांचा गळा आवळणे आहे़ कविता गेय आहे हे कवितेचे दूषण ठरावे हे दुर्दैव आहे़ आता छापखाना नैसर्गिक आणि गाता जिवंत गाळा अनेसर्गिक ठरला आहे़ जातिवृत्तांचे कवितेला ओझे वाटू लागले आहे़ आणि म्हणूनच कविता रसिकांच्या रंध्रारंध्रातून झिरपत न जाता, त्यांच्या मनात कायमची न मुरता कागदोपत्री जमा होत आहे़ पाठांतर हे खिशात खुळखुळणार्या रोकडीसारखे आहे़ आपल्या श्वासाइतकेच ते आपले स्वतःचे असते़'' पु़लं सारख्या जातिवंत आणि चोखंदळ रसिकाने दिलेला इशारा आमच्या कवी आणि समीक्षकांना केव्हा कळेल कोण जाणे !
पु़ लं च्या लेखनात कुठेतरी एक वाक्य आहे की, ‘आमच्या काळी बोलण्याची आणि लिहिण्याची भाषा एकच होती़' या वाक्यातील आमच्या काळी' या कालसंबोधनातून ती आज तशी राहिली नाही हे आपसूकच ध्वनित होते़.
कविता ही आज बोलण्याच्या भाषेपासून किती दूर गेली आहे याचे प्रत्यंतर अलीकडच्या कविता वाचल्या की आपल्याला सहज लक्षात येते़ तिचा रसिकांशी संवादच होत नाही़ प्रतिमांच्या नावीन्याच्या हव्यासापायी घडवलेल्या कृत्रिम भाषेत ती बोलते आहे़
मर्ढेकरांच्या काव्यशैलीसंबंधी लिहितांना विजया राजाध्यक्ष या मुद्याकडे आपले लक्ष वेधतात-
बोलण्याची भाषा व (औपचारिक) लेखनाची भाषा यातील अंतर कमी करणे हा कवीचा प्रयत्न असतो़''
असा प्रयत्न आज किती कवींच्या कवितांत आपल्याला दिसतो? रसिकांनी कवीच्या पातळीवर यावं असे आवाहन करणार्यांचे ओ-रडणे केवळ अरण्यरुदन ठरते ते बोलण्या-लिहिण्यातील भाषेच्या दरीमुळेच़ पु़लंनी विद्रोही कवितेचं मनापासून स्वागत केलं दाद देताना तिला भरभरून झुकतं माप दिलं. यशवंत मनोहरांच्या उत्थान गुंफा' वर महाराष्ट्राच्या दर्जेदार वृत्तपत्रात कालचा पाऊस' शीर्षकाने हातचे काही न राखता लिहिले़ त्यातील शोषणसंबंधाचे वैश्विक चिंतन मुळातूनच वाचण्यासारखे आहे़ पण हे पाहून अनेक कवी असूयेने म्हणायचे की आम्ही दलित असतो तर आमच्यावरही पु़लं नी असेच लिहिले असते़' असे म्हणून पु़लं च्या सच्च्या रसिकतेला जातीयतेच्या मापानं जोखणार्या कवींनी आपली बौद्धिक दिवाळखोरीच खरे तर जाहीर केली होती़.
प्र.श्री़ नेरुरकरांना लिहिलेल्या पत्रात पु़ ल़ म्हणतात, नारायण सुर्वे, दया पवार वगैरे मंडळी साहित्यात आल्यानंतर मला जे काही वाटले ती माझी भावना मला टागोरांच्या एका दीर्घ कवितेत सापडली़''
रवींद्रनाथांच्या ह्या कवितेचे नाव ‘ऐकतान वृंदवादन'. पु़ लं. नी केलेल्या त्या कवितेच्या स्वैर अनुवादातील हा एक अंश-
मी जाणतो-
माझी कविता कितीही वेड्यावाकड्या वळणांनी गेली
तरी सर्वगामी नाही झाली़
शेतकर्याचे जिणे जगणारे हे बहुजन
श्रमातून आणि शब्दांतून
मिळवत असतात सत्याचे कण़
जो आहे मातीपाशी
त्या कवीच्या वाणीकडे
लावून बसलो आहे काऩ
साहित्याच्या ह्या आनंदभोजनात
मी जे नाही शकलो रांधू
जे नाही शकलो वाढू-
ते काढणार्यांच्या आहे मी शोधात,
ते सत्य यावे उजेडात़
उगीचच नसता आव आणणार्यांनी
फेकू नये धूळ डोळ्यात,
दाखवू नये खेटा दिमाख-खरे मोल दिल्याशिवाय़
असला आणून आव मिरवणं
ही आहे एक चोरी़.
बरे नाही-बरे नाही-ही आहे नकली-
षौकीन पद्यमजुरी़
ये
अज्ञात जनांच्या
मूक मनांच्या
कविराया-ये़
मर्मातल्या वेदना येऊ देत उफाळून
ह्या प्राणहीन देशात
जिथे चारी दिशा आहेत गानहीन;
अपमानांच्या तापाने
इथली भूमी झाली आहे
आनंदहीन, शुष्क, वैराण़
कविराया,
तू कर ती रसपूर्ण,
अंतरीची उर्मी
आता उरली आहे तुक्यातच़
तूच दे तिला प्राणवायू आणि पाणी़
साहित्याच्या ह्या वृंदावन-संगीत-सभेत
ज्यांच्या हाती एकतारी
त्यांचा आता व्हावा गौरव़
सुखे-दुःखे ज्यांची मुकी,
जगापुढे जे सतत उभे
खाली घालून माना-
ऐकव-अरे ऐकव,
जवळ असूनही जे दूर होते
आता त्यांच्या ऐकव ताना़
तुझी आणि त्यांची एक आहे जात,
तुक्या ख्यातीमुळेच ते होतील विख्यात़
-मी वारंवार
तुलाच नमस्कार करीऩ''
ना़ धों. महानोरांची तुलना करायला पु़लं ना रवींद्रनाथांशिवाय दुसरा कोणी का सापडत नाही याचे उत्तरही आपल्याला मिळते ते या कवितेतच़.
(अकोला आकाशवाणीच्या सौजन्याने)
-- श्रीकृष्ण राऊत

1 प्रतिक्रिया:
कविता आणि कवी यांच्या अंतरंगाचा ठाव घेऊन त्याचा भाव खऱ्या अर्थानं मांडणं हे पुलं शिवाय कुणाला जमणार. पुलं खरंच अवलिया. शब्दांचा कुबेर, स्वभावानं कबीर आणि खुल्या मनाचा खरा राजा माणूस.
धन्यवाद 🙏😊
Post a Comment